-संदीप कदम

आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे महिला क्रिकेट वर्तुळात ‘लेडी सेहवाग’ अशी ओळख असलेली भारताची सलामीवीर शफाली वर्मा ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये जलद हजार धावांचा टप्पा पार करणारी सर्वांत युवा फलंदाज बनली. पदार्पणातच शफालीने आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधले. तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा घेतलेला आढावा..

maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Arshdeep Singh Becomes India Most Successful T20I Fast Bowler Surpasses Jasprit Bumrah and Bhuvneshwar Kumar with 92 Wickets IND vs SA
IND vs SA: अर्शदीप सिंगने बुमराह-भुवनेश्वरला मागे टाकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा

शफालीने ट्वेन्टी-२० मधील विक्रम कधी रचला?

सध्या सुरू असलेल्या महिला आशिया चषक स्पर्धेत शफाली वर्माने ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये हजार धावांचा टप्पा पार केला. बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात ४४ चेंडूंत ५५ धावांची अर्धशतकी खेळी करीत तिने हा विक्रम आपल्या नावे केला. १८व्या वर्षी शफालीने जागतिक विक्रमाची नोंद केली. तिने आपल्याच देशाच्या जेमिमा रॉड्रिग्जला मागे टाकले. जेमिमाने गेल्या वर्षी ती २१वर्षे आणि ३२ दिवसांची असताना हा विक्रम नोंदवला होता. दरम्यान, शफालीने विक्रम केला, त्यावेळी तिचे वय १८ वर्षे आणि २५३ दिवस इतके होते.

दोन विक्रम शफालीच्या नावावर आहेत, ते कोणते?

सर्वांत कमी वयात जलद हजार धावा करण्यासोबतच पदार्पणानंतर सर्वांत कमी वेळेत या धावा करण्याचा विक्रमही रचला. शफालीने आपल्या ट्वेन्टी-२० पदार्पणापासून हा विक्रम करण्यासाठी तीन वर्षे आणि ८७ दिवस इतका वेळ घेतला. तिने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मेग लॅनिंगचा (तीन वर्षे आणि ८७ दिवस) बराच काळ असलेला विक्रम मोडीत काढला. यासह ट्वेन्टी-२० मध्ये हजार धावा पूर्ण करण्यासाठी तिने सर्वांत कमी चेंडू खेळले. तिने ७३५ चेंडूंचा सामना केला.

शफालीचा आजवरचा आंतरराष्ट्रीय प्रवास कसा राहिला?

शफालीने २४ सप्टेंबर २०१९ मध्ये आपला पहिला ट्वेन्टी-२० सामना खेळला. त्या वेळी तिचे वय १५ वर्षे २३९ दिवस इतके होते. ती सर्वांत कमी वयात पदार्पण करणारी भारतीय महिला खेळाडू ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत सर्वात कमी वयात अर्धशतक झळाकवण्याचा विक्रमही शफालीच्या नावे आहे. तिने २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ४९ चेंडूंत ७३ धावांची खेळी केली होती. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतही आपल्या फलंदाजीने तिने सर्वांचे लक्ष वेधले. देशांतर्गत क्रिकेटमध्येही शफालीने हरयाणातर्फे खेळताना २०१८-१९च्या हंगामात खोऱ्याने धावा काढल्या.

शफालीची क्रिकेटच्या सर्व प्रकारातील कामगिरी आतापर्यंत कशी राहिली?

शफालीने आजवर दोन कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिने २४२ धावा केल्या आहेत. तिने यादरम्यान तीन अर्धशतके झळकावली. शफालीने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीत ५३१ धावा केल्या असून त्यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ७१ ही तिची सर्वोत्तम एकदिवसीय खेळी आहे. ट्वेन्टी-२० प्रकारात तिचे ४४ सामने झाले असून एकूण १०४४ धावा तिच्या खात्यात आहे. ७३ ही या प्रकारातील तिची सर्वोत्तम खेळी आहे. ट्वेन्टी-२० तही तिच्या नावे चार अर्धशतके आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटची अंतिम फेरी गाठणाऱ्या भारतीय संघातही शफालीचा समावेश होता. शफालीने द हंड्रेड आणि महिला बिग बॅश लीगमध्येही छाप पाडली आहे.