Yugendra Pawar लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. नणंद विरुद्ध भावजय अशी थेट लढत बारामतीत लोकसभेला झाल्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचंच नव्हे तर संपू्र्ण देशाचं लक्ष लागलं होतं. त्यातच शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर बारामतीत सुप्रिया सुळे यांचा मोठ्या मताधिक्यांनी विजय झाला तर सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे तीन दिवसांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान बारामतीमधील काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेत मोठी मागणी केली आहे. या संदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अधिक वाचा: शरद पवारांचं बोट पुन्हा धरणार का? छगन भुजबळांचं उत्तर, “मी…”
कार्यकर्त्यांनी नेमकी काय मागणी केली?
“आम्हाला आता बारामतीचा दादा बदलायचा आहे. बारामतीत शांत दादा आणायचा आहे. गाव पुढाऱ्यांपुढे आमचं काही चालत नाही. युगेंद्र पवारांना संधी द्या, आमचं त्यांच्यावर लक्ष आहे, पण तुमचंही लक्ष असूद्या एवढीच आमची इच्छा आहे. त्यांना तुम्ही ताकद द्या, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे”, अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी शरद पवारांकडे केली. “उमेदवारीची चर्चा आता करु नका. लवकरच काय ते होईल. संयमी राहा”, असा सल्ला शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीसारखं विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार का?, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित यांनी १.९५ लाख मतांनी मतदारसंघ जिंकला होता. १९९१ पासून सात्यत्याने विजय मिळवत आलेल्या अजित पवारांना पुतण्याकडून मात मिळणार का? याबाबत आता बारामतीच्या राजकारणात चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार कोण आहेत आणि का महत्त्वाचे याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरणारे आहे.
कोण आहेत युगेंद्र पवार?
३३ वर्षांचे युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांचे पुत्र आहेत. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत. ते उद्योजक असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील ते व्यवसायिक आहेत. अजित पवार हे आपल्या आयुष्यातला प्रत्येक महत्त्वाचा निर्णय श्रीनिवास पवारांशी चर्चा करुन घेतात असं कायमच सांगितलं जातं. श्रीनिवास पवार हे राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते कायमच दिसतात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांची साथ सोडली.
युगेंद्र पवार काय करतात?
कौटुंबिक शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या युगेंद्र यांनी कालांतराने बारामती शहरात समर्थकांचे जाळे निर्माण केले. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचे ते विश्वस्त आणि खजिनदार आहेत तसेच ते बारामती तालुका कुस्तिगीर परिषदेचेही प्रमुखही आहेत. याच परिषदेद्वारे त्यांनी २०२३ च्या डिसेंबर महिन्यात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती येथे कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. युगेंद्र हे फलटणस्थित शरयू ऍग्रो इंडिया लिमिटेडचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. शरयू साखर कारखाना त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. आपल्या आजोबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना एकत्र आणून स्थापन केलेल्या महाराष्ट्र ऑरगॅनिक रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (MORFA) च्या माध्यमातून सेंद्रिय आणि शाश्वत शेतीला चालना देण्याचे काम ते करतात.
अधिक वाचा: अजित पवारांच्या राष्ट्रवादीत छगन भुजबळ नाराज आहेत?; उत्तर देत म्हणाले, “मी स्पष्टच सांगतो..”
सामाजिक कार्यातून जनाधार
युगेंद्र हे शरद पवारांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. बऱ्याचदा ते बारामती शहरातील NCP (SP) च्या कार्यालयात असतात. जिथे ते परिसरातील लोकांना भेटतात आणि त्यांच्या समस्या सोडविण्यास मदत करतात, असे पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. लोकसभा निवडणुकीपर्यंत, युगेंद्र हे बारामती आणि सभोवतालच्या परिसरात शिक्षण, संस्कृती, आरोग्य, क्रीडा, कृषी आणि सिंचन क्षेत्रात कार्यरत असले तरी राजकीय वर्तुळात फारसे प्रसिद्ध नव्हते. शरयू फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोफत विहिरी खोदल्या आणि बारामती शहरातील दुष्काळी भागात पाण्याची टँकर सेवाही दिली. ते सध्या शरद पवार यांच्यासोबत शहरातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत.
मुंबईत शालेय शिक्षण तर अमेरिकेतून पदवी
युगेंद्र यांनी आपले शालेय शिक्षण मुंबईत पूर्ण केले आणि बोस्टन- अमेरिकेतून येथून वित्त आणि विमा या विषयात पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते शरयू ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक म्हणून त्यांच्या वडिलांच्या व्यवसायात सहभागी झाले. ही कंपनी लॉजिस्टिक्स, ऑटोमोबाईल डीलरशिप, कृषी-आधारित उद्योग, सुरक्षा सेवा आणि रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहे.
समर्थकांच्या मागणीवर युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया काय?
लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुळे यांनी पवार कुटुंबातील एक हुशार आणि उच्चशिक्षित तरुण सदस्य म्हणून युगेंद्रचे कौतुक केले होते. त्यांनी निवडणूक लढवावी या त्यांच्या समर्थकांच्या मागणीबद्दल विचारले असता, युगेंद्र म्हणाले, “आमच्या लोकसभेतील कामगिरीने उत्साहित होऊन, कार्यकर्त्यांनी मला बारामती विधानसभेतून उमेदवारी देण्याची विनंती राष्ट्रवादी (एसपी) प्रमुखांना केली. पण आम्हाला पवार कुटुंबात भांडणे नको आहेत आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी परिस्थिती सुधारेल अशी आशा आहे”. “मी बारामती तालुक्यात काम करत आहे आणि मला खूप काही शिकायचे आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी तालुक्यात सक्रिय होतो, कारण राष्ट्रवादीच्या (एसपी) प्रमुखांच्या विचारसरणीला आव्हान दिले जात होते. जेव्हा जेव्हा अशी आव्हाने येतील तेव्हा मी हे करत राहीन, परंतु मी निवडणूक लढण्याचा कोणताही विचार केला नाही,” निर्णय साहेब (शरद पवार), पाटील साहेब (राज्यप्रमुख जयंत पाटील) घेतील, पक्षाचे कार्यकर्ते आणि सुप्रिया ताई (सुळे)घेतील. अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी व्यक्त केली.