Sarat Chandra Chatterjee पश्चिम बंगाल म्हणजे प्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकरांचे माहेरघरच, इतकेच नाही तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बंगाली लेखकांची कामगिरी अतुलनीय होती. त्यांच्या प्रत्येक शब्दातून देशातील, समाजातील अन्यायाला वाचा फुटली असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. याच बंगाली कादंबरीकरांच्या यादीतील एक प्रसिद्ध नावं म्हणजे ‘शरतचंद्र चॅटर्जी’. आज त्यांची ८६ वी पुण्यतिथी आहे, त्याच निमित्ताने त्यांच्या लेखानातून साकारालेल्या व भारतीय साहित्यात गाजलेल्या स्त्री पात्रांचा हा आढावा.

जन्म आणि शिक्षण

१५ सप्टेंबर १८७६ रोजी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात शरतचंद्र यांचा जन्म झाला. त्यांना लहानपणापासूनच गरिबीची जाणीव होती. ते खेड्यातील शाळेत शिकले, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षणही सोडावे लागले होते. लहानपणापासूनच त्यांना लिखाणाची आवड होती. त्यांच्या बालपणीच्या काही लिखाणात कोरेल आणि काशिनाथ इत्यादी साहित्याचा समावेश होतो.१९०३ साली वयाच्या २७ व्या वर्षी, ते रंगून (आता यंगून, म्यानमार) येथे सरकारी कार्यालयात कारकून म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी त्यांची पहिली लघुकथा ‘मंदिर’ प्रकाशित केली. या कथेने त्यांना कुंटोलिन पुरस्कार जिंकून दिला. या नंतर पुढील १३ वर्षे ते रंगूनमध्येच राहिले. बंगालमध्ये परतल्यावर, जमुना आणि बिचित्रा या मासिकांमधील मधील त्यांच्या योगदानामुळे ते वाचकांच्या अधिक पसंतीस उतरले. अनिला देवी (त्यांची बहीण) आणि अनुपमा या दोन टोपणनावानेही त्यांनी लेखन केले.

Rahul Gandhi Post For Balasaheb Thackeray
Rahul Gandhi : बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींची पोस्ट; म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि आदित्य..”
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
lokrang article on marathi author saniya s kahi aatmik kahi samajik book
सर्जनाच्या वाटेवरील प्रवास
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Maharashtrachi Hasyajatra Fame Actress
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या

आणखी वाचा: मलेशियातील मुस्लिमांना प्रिय ‘राम’ नाम असलेले ‘हिकायत सेरी राम’ नेमके आहे तरी काय?

पिचलेल्या स्त्रीचे चित्रण

समकालीन स्त्रियांविषयी लेखन करणारे भारतीय साहित्यातील महान कादंबरीकार म्हणून शरतचंद्र यांचा गौरव केला जातो. देवदास (१९१७) मधील पारो, दत्ताची विजया (१९१७-१९१९), मेजदीदीची हेमांगिनी आणि शेष प्रार्थना (१९२९) मधील कमला ही त्यांची काही प्रतिष्ठित स्त्री पात्रे आहेत. त्यांनी त्यांच्या लेखन शैलीतून स्त्रियांच्या अंतर्मनाची कवाडे उघडली, यासाठी त्यांना समाजाच्या रोषाला ही सामोरे जावे लागले परंतु ते मागे हटले नाही. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे शेषप्रश्नातील त्यांची कमला. कमला हिला ताजमहालाची पारंपारिक ‘प्रेमाचे स्मारक’ ही व्याख्या म्हणून मान्य नाही, सम्राटाच्या अहंकाराचे समाधान करणारे स्मारक म्हणून ती ही वास्तू नाकारते. पश्चिम बंगालमध्ये स्त्रियांच्या पुनर्विवाह, शिक्षण आणि अधिक स्वातंत्र्यासाठी सामाजिक चळवळी झाल्या, याच पार्श्वभूमीवर त्यांच्या नायिका घरापुरत्या मर्यादित असल्या तरी त्यांनी त्या स्पष्टवक्त्या, धाडसी दर्शविल्या.
त्यांच्या काही गाजलेल्या कथांच्या नायिका पिचलेल्या आहेत. त्यात देवदास, चरित्रहीन, श्रीकांतो यांसारख्या कथानकांचा समावेश होतो. असे असले तरी त्यांच्या महिलांनी मनाची आणि हृदयाची प्रबळ इच्छाशक्ती दाखवली.
देवदासमधील प्रतिष्ठित चंद्रमुखी, एक बाईजी (गणिका); समाजासाठी एक शूद्र स्त्री होती परंतु शरतचंद्रांनी तिच्या अतुलनीय प्रेमाची कहाणी सांगणे पसंत केले. त्यांच्या स्त्रिया कधीच सामाजिक नियमांपुढे झुकल्या नाहीत आणि त्यांनी तसे केले तरी ते नेहमीच त्यांच्या आवडीच्या बाहेर होते.

बंकिमचंद्र आणि टागोर यांचाही प्रभाव

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आणि नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर हे त्यांच्या काळातील सर्वात मोठे बंगाली साहित्यिक होते. लहानपणापासूनच शरतचंद्रांच्या लिखाणावर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा प्रभाव दिसून आला, ते नेहमीच हिंदू सनातनी सामाजिक अन्याय आणि अंधश्रद्धा यांच्या विरोधात उभे राहिले. शरतचंद्रांनी त्यांच्या लिखाणाची भाषा साधी, सोपी ठेवली. बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांच्या लिखाणात बांगला भाषेची संस्कृत आवृत्ती वाचावयास मिळते, त्यांची भाषा बंकिमी शाधू भाषा म्हणून ओळखली जाते. याउलट शरतचंद्र यांची भाषा वाचण्यास अधिक सुलभ आहे. शरतचंद्र आणि टागोर या दोघांनीही सामाजिक विषमता, गरिबी आणि जातीय समस्यांवर लिहिले. शरतचंद्र हे गरिबीत जगले होते, हे त्यांच्या कथांमधून जाणवते, तर टागोरांनी गरीबी दुरूनच पाहिली होती.

आणखी वाचा: विश्लेषण: रामायण एक अन्वयार्थ अनेक!

चित्रपटांचा आवडता विषय

शरतचंद्रांच्या कथा नेहमीच चित्रपटांचा आवडता विषय ठरलेल्या आहेत. देवदास ही कथा तर गेल्या तीन पिढयांच्या आवडीचा विषय आहे. दिलीप कुमार, शाहरुख खान यांसारख्या बड्या कलाकारांनी या कथानकाला जिवंतपणा प्रदान केला. परिणीता (२००५), अपने पराये (१९८०), पंडित मशायवर आधारित गुलजार यांचा खुशबू (१९७५), दत्ता (१९७६) यांसारखे अनेक चित्रपट शरतचंद्रांच्या कथेवर आधारित होते.

वैयक्तिक जीवन

प्लेगमुळे त्यांची पहिली पत्नी आणि मुलाच्या मृत्यूनंतर, शरतचंद्रांनी किशोरवयीन विधवेशी लग्न केले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांना यकृताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि १६ जानेवारी १९३८ रोजी कोलकाता येथे त्यांचे निधन झाले.