शरद ऋतूच्या आगमनासमवेत वाऱ्याच्या थंड झुळुकांनी अंग शहारून जाते, याच मन मोहून टाकणाऱ्या वातावरणात बंगाल तसेच पूर्व भारतात देवीच्या आगमनाची चाहूल लागते. हीच ती दुर्गा देवीच्या माहेरी येण्याची वेळ, प्रत्येक घराघरात, रस्त्यावर, गल्लोगल्ली उत्साहाचे वातावरण असते. बंगाल प्रांतातील दुर्गापूजा विशेषच प्रसिद्ध आहे. प्रत्येक बंगाली व्यक्तीसाठी हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणणारा हा सण आहे. या वर्षीही ‘माँ दुर्गे’चे मोठ्या उत्साहात आगमन आणि स्वागत बंगाली भाषकांकडून झाले. याच पार्श्वभूमीवर बंगालमधील दुर्गापूजेचा इतिहास आणि वसाहतवादी राजवटीत साजरा झालेली दुर्गापूजा यांच्याविषयी जाणून घेणे नक्कीच महत्त्वाचे ठरणारे आहे.

पहिली दूर्गापूजा ब्रिटिश अधिकाऱ्यासमवेत?

बंगाल मधील दुर्गा पूजेच्या उत्पत्तीच्या अनेक कथा उपलब्ध आहेत. १७५७ साली प्लासीच्या लढाईनंतर दुर्गा पूजा अधिक लोकप्रिय झाल्याचे इतिहासकार मानतात. रॉबर्ट क्लाइव्ह या ब्रिटिश अधिकाऱ्याने नवाब सिराज उदौला याचा या लढाईत पराभव करून भारताच्या इतिहासाचा मार्ग बदलला. या युद्धातील विजयानंतर बंगालवरील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची पकड अधिक मजबूत झाली. या विजयाने क्लाइव्हलाही खूप श्रीमंत केले. अत्यंत धार्मिक असलेल्या क्लाइव्हने आपल्या अविश्वसनीय भाग्याचे श्रेय देवाला दिले. त्याला या यशासाठी आभार व्यक्त करण्याकरता कलकत्ता येथे एक भव्य समारंभ आयोजित करायचा होता. पूर्वीच्या नवाबाने शहरातील एकमेव चर्च उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे क्लाइव्हचे पर्शियन भाषांतरकार आणि जवळचे विश्वासू ‘नबकिशन देब’ हे पुढे आले. डेब यांनी क्लाइव्हला त्यांच्या हवेलीत येण्यास सांगितले आणि दुर्गादेवीला नैवेद्य दाखवला अशा प्रकारे कलकत्त्यातील पहिली दुर्गापूजा सुरू झाली, असे मानले जाते.

raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Eknath shinde Sanjay raut
Sanjay Raut: २३ नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य काय? संजय राऊत म्हणाले…
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
mrunal dusanis sukhachya sarini he man baware marathi serial again on air
मृणाल दुसानिसची ४ वर्षांपूर्वीची सुपरहिट मालिका पुन्हा सुरू होणार! ‘कलर्स मराठी’ने शेअर केली मोठी अपडेट
Reshma Shinde
‘रंग माझा वेगळा’मध्ये सावळ्या मुलीला का घेतलं नाही? ‘अशी’ झालेली रेश्मा शिंदेची निवड; मालिकेच्या लेखकानं सांगितलं कारण
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड

आणखी वाचा: Sharadiya Navaratra 2023: महाराष्ट्रीय लोकसंस्कृतीतील जगदंबेचा निस्सीम भक्त ‘भुत्या’, आहे तरी कोण?

पुरावा नाही

सोवाबाजारमधील देब यांचा वाडा, आजही पश्चिम बंगालच्या पर्यटन विभागाने जतन केला आहे, त्या वाड्याला आजही “कंपनी पूजा” म्हणून ओळखले जाते. ही कथा प्रसिद्ध असली तरी ती तितकीशी पटणारी नाही. १७५७ सालापूर्वी, देब हे क्लाइव्हला ओळखत असल्याची कोणतीही नोंद नाही. एक निनावी पेंटिंग वगळता, त्या वर्षी दुर्गा पूजा प्रत्यक्षात झाल्याचा कोणताही पुरावादेखील नाही. सोवाबाजार पूजा ही कलकत्त्यामधील सर्वात जुनी असली तरी तिच्या उत्पत्तीची ही कथा अत्यंत संशयास्पद आहे.

कथेतून इतिहासाचा शोध

असे असले तरी, ही कथा कलकत्ता येथील दुर्गापूजेच्या समाजशास्त्रीय उत्पत्तीचे रूपक म्हणून काम करते. सोप्या भाषेत सांगायचे तर, आधुनिक दुर्गापूजेच्या उत्पत्तीसाठी बंगाली जमीनदार आणि व्यापारी तसेच ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील संबंधांना श्रेय दिले जाऊ शकते. बंगालमध्ये कंपनीच्या राजवटीत अनेक सामाजिक आणि आर्थिक बदल झाले. दुर्गापूजेच्या कथेच्या इतिहासातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे, कंपनीच्या राजवटीचे फायदे मिळवून देणार्‍या शक्तिशाली स्थानिकांच्या नवीन वर्गाचा उदय हा होता. प्रथम जमीनदार किंवा वंशपरंपरागत जमीनदार होते. केंद्रिकृत मुघल राज्याच्या ऱ्हासानंतर, बंगालमधील जमीनदार अधिकाधिक प्रभावशाली झाले आणि त्यांनी स्वतःची जहागिरी ठामपणे राबविण्यास सुरुवात केली. १७९३ सालच्या कायमस्वरूपी सेटलमेंट कायद्याने त्यांची स्थिती भक्कम करून, कंपनीने त्यांना कंपनी आणि स्थानिक लोकांमध्ये मध्यस्थ म्हणून प्रभावीपणे राबवले.

आणखी वाचा: Shardiya Navratri 2023: भारतातील शक्ती पूजेचा (देवी) सर्वात प्राचीन पुरावा कोणत्या शतकातील? 

भक्तीपेक्षा भोग प्रभावी

जमीनदारांनंतर श्रीमंत बंगाली व्यापाऱ्यांचा उदयोन्मुख वर्ग होता, विशेषत: कलकत्त्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरी केंद्रात त्यांचे प्रस्थ होते. कंपनीच्या राजवटीत पूर्वी कधीही न पाहिलेल्या आर्थिक संधी त्यांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या होत्या. काही लोक खूप लवकर श्रीमंत झाले. अशा प्रकारे टागोर किंवा मल्लिक यांसारखी मोठी व्यापारी कुटुंबे उदयास आली. इतिहासकार तपन रायचौधरी यांनी ‘मदर ऑफ ब्रह्मांड, मदर लॅण्ड’ नावाच्या आपल्या शोधनिबंधात नमूद केल्याप्रमाणे, नुकत्याच श्रीमंत झालेल्या भारतीय व्यापाऱ्यांसाठी दुर्गापूजा स्वतःच्या संपत्तीचे प्रदर्शन आणि आपल्या गोऱ्या साहेबाप्रति प्रेम दर्शविण्याचा सोहळा झाला. रायचौधरी यांच्या मते, “भक्ती पेक्षा भोग” हा या सणांचा मुख्य हेतू झाला होता. प्रतिस्पर्धी कुटुंबे शक्य तितक्या भव्य पूजेचे आयोजन करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत, मूर्ती सोन्याने सजवल्या जात, लखनऊ आणि दिल्लीसारख्या दूरच्या नृत्य करणाऱ्या मुलींना (भाड्याने) आणले जाई, अगदी ब्रिटीश गव्हर्नर-जनरल यांनाही प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाई.

पूजा आणि राष्ट्रवादी चळवळ

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात, बंगाली लोकांमध्ये, विशेषत: सुशिक्षित बुद्धीमंतांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली. बंकिमचंद्र यांची ‘आनंदमठ’ ही कादंबरी १८८२ साली प्रकाशित झाली. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात संन्यासी विद्रोहाची काल्पनिक आवृत्ती असलेल्या या कादंबरीने “बंदे मातरम्” हा वाक्प्रचार लोकप्रिय केला – ‘माता’ म्हणून ‘राष्ट्रा’ची कल्पना लोकांमध्ये निर्माण करण्यात आली. त्यानंतर देवी दुर्गा, “मा” (किंवा माता, राष्ट्रमाता) दुर्गा म्हणून पूजली गेली, अशा प्रकारे राष्ट्राचे अंतिम मूर्तरूप दुर्गादेवीच्या स्वरूपात पुढे आले, तसेच परकीय राजवटीपासून तारणहार म्हणून काम करणारी प्रतिकृती तिच्या स्वरूपात अग्रणी ठरली. त्यामुळेच दुर्गापूजा अचानक नवजात राष्ट्रवादी प्रकल्पाचा एक भाग झाली. १९०५ साली मध्ये लॉर्ड कर्झनने घेतलेल्या बंगालच्या फाळणीच्या निर्णयानंतर तर ती अधिक लोकप्रिय झाली. ‘बंदे मातरम्’ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिले जनआंदोलन मानल्या जाणार्‍या स्वदेशी चळवळीच्या लढाईचे घोषवाक्य झाले, दुर्गा पूजा हा सांप्रदायिक उत्सव आता सामूहिक चेतना आणि प्रेरणेचे ठिकाण ठरला होता.

प्रतिकात्मक लढा पूजेच्या रूपात

इतिहासकार रॅचेल मॅकडरमॉट यांनी त्या काळातील दुर्गा पूजांबद्दल ‘रेव्हलरी, रिव्हलरी आणि लोंगिंग फॉर द देवी ऑफ बंगाल’ (२०११) या पुस्तकामध्ये नमूद केल्याप्रमाणे. “तत्कालीन बंगाली वृत्तपत्रे पूजांच्या जाहिरातींनी भरलेली होती. काही बिदेशी [विदेशी], तर काही स्वदेशी देशी तेले, रेशम, धुत्या, साड्या, शूज, चहा, साखर, सिगारेट इत्यादी वस्तूंच्या विद्यासागर, श्री दुर्गा, आणि दरबार अशा ब्रॅण्डच्या जाहिरातींनी भरलेली होती. पूजेच्या वेळी, ब्रिटीश उच्चभ्रूंचे पूर्वीपेक्षा खूपच कमी स्वागत झाले होते. रायचौधरी यांनी नमूद केल्याप्रमाणे, “एका ब्रिटिश अधिकाऱ्याने सांगितले की त्याने दुर्गेची प्रतिमा पाहिली होती, जिथे म्हशीच्या राक्षसाची जागा त्याच्या एका सहकाऱ्याने घेतली होती.”
१९२० च्या दशकात, सार्वजनिक पूजा उदयास येऊ लागल्या. हा श्रीमंत बंगाली उच्चभ्रूंचा उत्सव असल्याने, पूजा ही प्रत्येकासाठी एक उत्सव होऊ लागली. मॅकडर्मॉट यांच्या मते, हा अस्पृश्यतेविरुद्धच्या गांधीवादी वक्तृत्वाचा तसेच हिंदू एकत्रिकरणाच्या गरजेचा परिणाम होता.

आणखी वाचा: ‘सेक्सटॉर्शन’ म्हणजे नेमके काय? यापासून स्वत:ला कसे वाचवाल?

पहिली ‘सार्वत्रिक’ पूजा

पहिली ‘सार्वत्रिक’ पूजा १९२६ साली कलकत्ता येथील माणिकतला येथे आयोजित करण्यात आली होती. मॅकडरमॉट यांनी नमूद केल्याप्रमाणे, ती सर्वसमावेशक होती, जन्म (जात) किंवा निवासस्थानाची पर्वा न करता “सर्वांसाठी खुली” होती. “पहिल्यांदा, पंडाल (मंडप) किंवा बांबू, कापडापासून बनविलेले तात्पुरते मंदिर, सार्वजनिक रस्त्यांवर, गल्ली-बोळात आणि क्यूल-डी-सॅकमध्ये बांधले गेले. त्यानंतर दूर्गापूजेच्या सार्वजनिक उत्सवांची एक वेगळी परंपरा सुरू झाली आणि त्या परंपरेने कळस गाठला!