समभागांच्या मूल्यांकनाच्या चिंतेने परदेशी गुंतवणूकदार वेगाने पाय काढत आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, परकीय गुंतवणूकदारांच्या निधीचे निर्गमन, कंपन्यांची निराशाजनक तिमाही कामगिरी आणि वाढत्या महागाईमुळे बाजारातील मंदीछाया तीव्र झाली आहे.

शेअर बाजारातील पडझडीस परदेशी गुंतवणूकदार कितपत कारणीभूत?

परदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबरअखेरपासून, भारतीय समभागांमधून अंदाजे १.२० लाख कोटी रु. (सुमारे १४ अब्ज डॉलर) काढून घेतले आहेत. नोव्हेंबरात त्यांनी २८,६७७ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली आहे. मात्र परदेशी गुंतवणूकदार हे घसरणीसाठी एकमेव कारण नसून देशांतर्गत घडामोडींसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिकूल घटनांनी भांडवली बाजाराला ग्रासले आहे. २७ सप्टेंबरच्या निफ्टी व सेन्सेक्सचे अनुक्रमे २६,२७७.३५ आणि ८५,९७८.२५ अंशांचे इतिहासातील सर्वोच्च शिखर ते इतिहासातील सर्वांत तीव्र घसरण असे चटके गुंतवणूकदारांना या दीड महिन्यात अनुभवावे लागले. दोन्ही निर्देशांक सार्वकालिक उच्चांकावरून अल्पावधीतच १० टक्क्यांहून अधिक गडगडले असून सेन्सेक्सने तब्बल ८,२८७.३ अंशांची घट अनुभवली आहे. इतक्या घसरणीला परदेशी गुंतवणूकदार हे एक मोठे कारण आहे.

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
indians arrested on canada us border
४०,००० हून अधिक भारतीयांना अटक; अमेरिका-कॅनडा सीमेवर बेकायदा मार्गाने घुसखोरी वाढली, कारण काय?
bitcoin price review bitcoin prices got a boost reaches 100000 usd
विश्लेषण : ‘बिटकॉइन’ पोहोचले १ लाख डॉलरवर… का आणि कसे? भारतात मान्यता मिळेल?
bitcoin surges above 100000 usd for the first time in 2024
‘बिटकॉइन’ तेजीचे १ लाख डॉलरचे शिखर

हेही वाचा:Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? इर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?

इतर प्रमुख कारणे कोणती?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, परकीय गुंतवणूकदारांच्या निधीचे निर्गमन, कंपन्यांची निराशाजनक तिमाही कामगिरी आणि वाढत्या महागाईमुळे बाजारातील मंदीछाया तीव्र झाली आहे. त्यातच डॉलरच्या बळकटीकरणामुळे जागतिक स्तरावर उदयोन्मुख बाजारातील मालमत्तांवर ताण वाढला आहे. बाजारात अलीकडच्या तीव्र तेजीनंतर, समभागांचे महागलेले मूल्यांकन आणि त्या तुलनेत कंपन्यांची सरलेल्या सप्टेंबरातली तिमाही कामगिरी समाधानकारक नसल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा मारा सुरूच ठेवला आहे. अशात, महिन्याभरापासून भूराजकीय घटनांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींसह देशांतर्गत आघाडीवर महागाईने पुन्हा डोके वर काढले आहे. किरकोळ महागाई दर ६.२१ टक्के असा १४ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला असून, रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या उच्च सहनशील मर्यादेचा तिने भंग केला आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुनरागमन झाल्याने रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलर मजबूत होत आहे. परिणामी, रुपयादेखील ८४.४३ प्रति डॉलर असा गाळात गेला आहे. ट्रम्प यांच्या ‘अमेरिका प्रथम’ धोरणाचा परदेशी गुंतवणूक आणि व्यापारावर काय परिणाम होऊ शकतो, याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे. परिणामी, एमएससीआय एशिया पॅसिफिक निर्देशांक दोन महिन्यांतील नीचांकी पातळीवर घसरल्याने आशियाई बाजारपेठांना त्याची झळ जाणवू लागली आहे. यातून परदेशी गुंतवणूकदारांमधील स्थानिक बाजाराचे आकर्षण आणखीच कमी होऊ शकते.

परदेशी गुंतवणूकदारांचे पलायन कशामुळे?

अमेरिकी रोखे ही जगातील सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. सध्या १० वर्षे मुदतीच्या अमेरिकी रोख्यांवरील परताव्याचा दर हा ५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. परिणामी, भारतासह उदयोन्मुख बाजारपेठेत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) चौफेर समभाग विक्रीचा मारा सुरू ठेवला आहे. देशांतर्गत बाजारातून निधी काढून स्वदेशात निधी नेण्यास प्राधान्य देत आहेत. अमेरिकी रोख्यांवरील परतावा दर आणि डॉलर निर्देशांक असाच वर राहिल्यास भारतासह उदयोन्मुख देशांच्या भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्री तीव्र होण्याची भीती आहे. या जोडीला चीनच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तेथील सरकारच्या नवीन योजनांमुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय भांडवली बाजाराच्या तुलनेत स्वस्त असलेल्या चिनी बाजाराकडे आकर्षित होत आहेत.

हेही वाचा:विश्लेषण : माजी जगज्जेता माइक टायसन यू-ट्यूब इन्फ्लुएन्सरकरडून पराभूत! लढत खरी होती की लुटुपुटूची? फायदा नेटफ्लिक्सचाच?

आता देशांतर्गत गुंतवणूकदारांवर आशा?

निर्देशांकातील अधिक पडझड देशांतर्गत म्युच्युअल फंड कंपन्या रोखू शकतात. सध्या म्युच्युअल फंड घराण्यांकडील व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम) सप्टेंबर २०२४ अखेर ६७ लाख कोटींपुढे आहे. तर एकूण इक्विटी म्युच्युअल फंडातील एयूएम ३१.१५ लाख कोटी रु. आहे. ज्यामध्ये सुमारे ५ टक्के रक्कम म्युच्युअल फंड कंपन्या रोख स्वरूपात बाळगतात, म्हणजे १,५०,००० कोटी रुपयांची रोख रक्कम आहे. दुसरे म्हणजे, डायनॅमिक अॅसेट अॅलोकेशन फंड जे ‘इक्विटी’, ‘डेट’ आणि ‘कॅश’मध्ये बाजाराच्या दृष्टिकोनावर आधारित असतात आणि समतोल फंड जे इक्विटीमध्ये २५ टक्के ते ७५ टक्के निधी हलवू शकतात, ते सध्या २ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करतात. त्यामुळे इक्विटीमध्ये गुंतवला जाऊ शकणारा असा अंदाजे ४० टक्के म्हणजेच सुमारे १ लाख कोटी रुपयांचा निधी आहे. याशिवाय, म्युच्युअल फंड एसआयपी प्रवाहाद्वारे कोट्यवधी रुपये दर महिन्याला बाजारात येतात. ऑक्टोबरात म्युच्युअल फंडांमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली; ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात ‘एसआयपी’मधील मासिक योगदानही ऑक्टोबरात २५,३२३ कोटी रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले. म्हणजेच बाजारातील प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी एकट्या म्युच्युअल फंड उद्याोगाकडे ३ लाख कोटी रुपयांची ‘फायर पॉवर’ आहे.

gaurav.muthe@expressindia.com

सविस्तर विश्लेषण loksatta. com/ explained

Story img Loader