ब्राझीलच्या किनार्याजवळील शार्क माशांमध्ये चक्क कोकेन आढळून आले आहे. कोकेनसाठी करण्यात आलेली चाचणी पॉझिटिव्ह आल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, त्यांच्या शरीरात आढळणारे कोकेन त्यांच्या वर्तनातही बदल करत आहेत. कोकेनचा शार्कवर घातक परिणाम होऊ शकतो, त्यांची दृष्टी खराब होऊ शकते, अशी भीती शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. शार्कमध्ये कोकेन कसे आढळून आले? याचा सागरी जीवनावर काय परिणाम होणार? हे खरंच चिंतेचे कारण आहे का? जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शार्कमध्ये कोकेन आले कुठून?
रिओ डी जेनेरोच्या पाण्यातून १३ ब्राझिलियन शार्पनोज शार्कचे परीक्षण करणाऱ्या संशोधकांना त्यांच्या यकृत आणि स्नायूंमध्ये कोकेनचे लक्षणीय प्रमाण आढळून आले आहे. मासेमारी करताना पाण्यातून लहान शार्क काढून, संशोधकांनी त्यांच्या प्रत्येक अवयवाचे परीक्षण आणि मूल्यांकन केले. त्यांनी सागरी प्राण्यांमध्ये कोकेनचे प्रमाण शोधून काढले. पूर्वीही समुद्रातील जीवांमध्ये कोकेन हा अमली पदार्थ आढळून आला आहे. परंतु, पूर्वी इतर प्रजातींमध्ये नोंदवले गेलेल्या प्रमाणापेक्षा शार्कमध्ये आढळलेले कोकेनचे प्रमाण १०० पट जास्त आहे.
हेही वाचा : INS ब्रह्मपुत्रा पुन्हा वापरात येणार की मोडीत निघणार?
चाचण्यांच्या निकालांनुसार, सर्व शार्कचे नमुने सकारात्मक आहेत. याव्यतिरिक्त, स्नायूंच्या नमुन्यांमध्ये ९२ टक्के आणि यकृताच्या नमुन्यांमध्ये २३ टक्के बेंझॉयलेकगोनिन आढळून आले आहे. शार्कमध्ये कोकेन सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. शार्कमध्ये कोकेनची तपासणी करण्यासाठी ओस्वाल्डो क्रूझ फाउंडेशनने सुरू केलेला हा अभ्यास पहिलाच आहे. अभ्यासातील सर्व मादी शार्क गर्भवती होत्या, परंतु गर्भापर्यंत कोकेन पोहोचले आहे की नाही, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही, असे वृत्त बीबीसीने दिले आहे.
तसेच, शार्क माशांमध्ये कोकेन नक्की आले कुठून याचीही अचूक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. सायन्स ऑफ द टोटल एन्व्हायर्न्मेंट या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, हे अमली पदार्थ प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामधून, ड्रग वापरकर्त्यांच्या वाहून गेलेल्या कचऱ्यातून, बेकायदा प्रयोगशाळेतून आले असल्याचे सांगण्यात आले आहे. कोकेनचे पॅकेज शार्क खाऊ शकत नाही, कारण मादक पदार्थांच्या तस्करांनी कोकेन समुद्रात फेकून दिल्याची शक्यता फारच कमी असल्याचे या अभ्यासात सांगण्यात आले. एका शास्त्रज्ञाने टेलिग्राफला सांगितले की, “आम्हाला सहसा मेक्सिको आणि फ्लोरिडामध्ये कोकेनचे पॅकेट समुद्रात टाकलेले किंवा हरवलेले कधीही आढळून आलेले नाही”, त्यामुळे त्याद्वारे कोकेन शार्कपर्यंत पोहोचण्याची शक्यता फारच कमी आहे.
कोकेनचा शार्क आणि समुद्र जीवनावर होणारा परिणाम
शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, चाचणीच्या निकालात मोठ्या प्रमाणात कोकेन आढळून आले आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, कोकेनमुळे शार्कला नक्कीच दुखापत झाली आहे. मात्र, अद्याप हे स्पष्ट नाही की त्यांच्या वर्तनात नेमका किती आणि कसा बदल झाला असेल. “कोकेन मेंदूला लक्ष्य करते, त्यामुळे हे चिंतेचे कारण आहे. इतर प्राण्यांमध्ये कोकेनमुळे अतिक्रियाशील आणि अनियमित वर्तन लक्षात आले आहे. ही एक शक्यता आहे आणि त्यामुळेच यावर आणखी अभ्यास आवश्यक आहे.” शास्त्रज्ञांचे असे सांगणे आहे की, कोकेन शार्कला हानी पोहोचवू शकते, त्यांची दृष्टी खराब करते; ज्यामुळे त्यांच्या शिकार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
फ्लोरिडा विद्यापीठातील इकोटॉक्सिकोलॉजी आणि पर्यावरण अभियांत्रिकीतज्ज्ञ डॉ. ट्रेसी फॅनारा यांनी ‘द टेलिग्राफ’ला सांगितले की, “तुम्ही कमी प्रजनन आणि वाढीचा दर पाहू शकता. शार्कना कदाचित कोकेनचा त्रास होत नसेल, पण त्यामुळे त्यांचे आयुर्मान कमी होऊ शकते,” असे डॉ. फॅनारा म्हणाल्या. डॉ. फॅनारा पुढे म्हणाल्या, “ही जगभरातील समस्या आहे. कोकेन, कीटकनाशके यांसारखी घटक रसायने आपण पर्यावरणात सोडत आहोत, त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण होतो की याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल.”
प्राण्यांवर अमली पदार्थांचा प्रभाव
मागील अभ्यासांनी असे सूचित केले आहे की, अमली पदार्थांचा प्राण्यांवर होणारा परिणाम मानवांवर होणार्या परिणामासारखाच असतो. कोकेन खाल्ल्यानंतर यकृतातील घटक पदार्थ बेन्झोइलेकगोनाइन, गेल्या वर्षी इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळून आला. अमली पदार्थ नक्की कोणता आहे, यावर त्याचे परिणाम ठरतात, असेही संशोधनात सांगण्यात आले आहे. ॲडेरॉल आणि इतर काही अमली पदार्थांमध्ये ॲम्फेटामाइन्स असतात, उदाहरणार्थ, “त्याच्या थोड्या सेवनानेही हे पदार्थ पाळीव प्राण्यांसाठी खूप हानिकारक किंवा प्राणघातक ठरू शकतात; ज्यामुळे अतिक्रियाशीलता, हादरे, झटके, ताप, हृदयाची गती वाढणे, कोमा आणि मृत्यूदेखील होऊ शकतो,” असे अमेरिकन सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स (एएसपीसीए) यांनी सांगितले आहे.
‘आयबुप्रोफेन’सारख्या पेनकिलरच्या थोड्या प्रमाणातील सेवनानेदेखील, कुत्र्यांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अल्सर आणि मूत्रपिंड निकामी होण्यासह लक्षणीय वैद्यकीय समस्या उद्भवू शकतात. त्यांचे लघवीवरील नियंत्रण सुटू शकते, निद्रनाशाची समस्या उद्भवू शकते. तसेच गंभीर प्रकरणांमध्ये झटके आणि कोमासारखी समस्यादेखील उद्भवू शकते.