पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (२६ ऑगस्ट) बंगळुरू येथील इस्रोच्या मुख्यालयाला भेट दिली. चांद्रयान-३ चे लँडर ज्या ठिकाणी यशस्वीरीत्या उतरले, त्या ठिकाणाला ‘शिव शक्ती’ असे नाव देत असल्याची घोषणा त्यांनी केली. “सामान्यपणे, जेव्हा अशी एखादी मोहीम यशस्वी होते, तेव्हा त्या ठिकाणाला नाव देण्याची परंपरा जगभरात पाळली जाते”, असे विधानही त्यांनी यावेळी केले. तसेच चांद्रयान-२ मोहिमेनंतरही नाव देण्याबाबतची चर्चा झाली होती. पण जेव्हा पुढील मोहीम यशस्वी (सॉफ्ट लँडिंग) होईल, तेव्हाच आधीची मोहीम जिथे पूर्ण झाली, त्या जागेला नाव देण्यात येते, असेही ते यावेळी म्हणाले. त्याप्रमाणे चांद्रयान-२ ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणाला तिरंगा असे नाव देण्यात आले आहे.

इस्रोचे अध्यक्ष के. सोमनाथ रविवारी (२७ ऑगस्ट) तिरुअनंतपुरम येथे बोलत असताना म्हणाले, “ज्या ठिकाणी यशस्वीरीत्या अवतरण होतं, त्या ठिकाणाला नाव देण्याचा त्या त्या देशाचा अधिकार आहे. ज्या ठिकाणी अवतरण (लँडिंग साईट) झालं, त्याला नाव देण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही भारतीयांची नावं याआधीच चंद्रावरील ठिकाणांना देण्यात आली आहेत. चंद्रावर साराभाई क्रेटर (Sarabhai Crater) नावानं एक जागा आहे. इतर देशांनीही त्यांच्या मोहिमेत यश संपादन केल्यानंतर त्या जागेला नावं दिलेली आहेत. एखादा छोटासा प्रयोग केला असेल तरी नाव दिलं जातं. ही परंपरा आहे.”

uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
Who will be Chief minister if Mahayuti wins
महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाकडून मिळालेले ‘हे’ संकेत महत्त्वाचे
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”

हे वाचा >> चांद्रयान-३ च्या लँडरचे विलगीकरण यशस्वी; आता पुढे काय?

चंद्र हा कोणत्याही एका देशाच्या अधिपत्याखाली येत नाही. त्यामुळेच जागतिक स्तरावर अनेक देश तिथे संशोधन आणि अवतरण मोहिमा हाती घेण्यासाठी इच्छुक आहेत. तर चंद्रावरील ठिकाणांना कोण नावे देतात आणि हे करण्याची प्रक्रिया काय आहे? याबाबत घेतलेला हा आढावा.

चंद्रावर कुणाचीही मालकी का नाही?

संयुक्त राष्ट्रांच्या बाह्य अंतराळ व्यवहार विभागाने १९६६ साली बाह्य अंतराळ करार (Outer Space Treaty) केला. यातील महत्त्वाची बाब अशी की, जेव्हा हा करार झाला तेव्हा शीतयुद्धाचा काळ सुरू होता. सोविएत युनियन आणि युनायटेड स्टेट्स या दोन जागतिक महासत्ता एकमेकांविरोधात छुप्या कारवाया करीत होत्या. शस्त्रास्त्रे विकसित करण्याची शर्यत (लष्करी वर्चस्व गाजविण्यासाठी), आर्थिक व अंतराळ संशोधनाच्या स्पर्धेतून ही छुपी लढाई दिसत होती. अंतराळात आधी कोण जाणार? चंद्रावर सर्वांत आधी कोण उतरणार? यासाठी दोन्ही महासत्ता सातत्याने प्रयत्नशील होत्या.

बाह्य अंतराळ करारानुसार, देशांना त्यांच्या अंतराळ संशोधन कार्यात मदत करणे आणि अंतराळातील कोणत्याही गोष्टीवर दावा न सांगणे. युरोपियन अंतराळ केंद्रामधील सार्वजनिक आंतरराष्ट्रीय कायदा या विभागाचे प्रमुख अलेक्झांडर सौसेक यांनी डीडब्ल्यू या संकेतस्थळावरील लेखात म्हटलेय, “चंद्रावर देश आपला राष्ट्रध्वज फडकवू शकतात; पण अशा कृतीचे कोणतेही कायदेशीर अर्थ किंवा महत्त्व नसेल”. तथापि, चंद्रावरील जागांना नाव देण्याबाबत मात्र या करारामध्ये कोणताही उल्लेख आढळत नाही, अशी माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिली.

मग चंद्रावरील ठिकाणांना नावे कोण देतात?

द इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉमिकल युनियन (IAU) या संस्थेनेही अंतराळातील मोहिमांसाठी काही नियम तयार केलेले आहेत. या संस्थेच्या ९२ सदस्यांपैकी भारत एक देश आहे. १९१९ पासून ग्रह आणि उपग्रहांचे नामकरण करण्यासाठी आयएयू एक मध्यस्थ संस्था म्हणून काम करीत अस्लयाचे त्यांच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आलेले आहे. अमेरिकेच्या लुनार अँड प्लॅनेटरी इन्स्टिट्यूटमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम केलेले दिवंगत पॉल स्पुडीस यांनी २०१२ मध्ये एका नियतकालिकातील लेखात म्हटले होते की, अनेक मोहिमांमध्ये त्या यशस्वी झाल्यानंतर नाव देण्याची परंपरा आहे, अनौपचारिक पद्धतीनं ही नावं दिली जातात.

हे वाचा >> चांद्रयान-३ : भूकंप, पाणी आणि मानवी वस्ती; चंद्रावर आणखी कोणकोणते संशोधन होणार?

याबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, चंद्राच्या इतर बाजूंच्या भागांबद्दल आपल्याकडे मर्यादित माहिती उपलब्ध आहे. पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची फक्त एक बाजू दिसते. कारण- पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी चंद्राला १४ दिवस लागतात आणि याच कालावधीत चंद्राची स्वतःभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होते. त्यामुळे पृथ्वीवरून नेहमी चंद्राची एक बाजू दिसते. परंतु, अमेरिका आणि सोविएतच्या अंतराळयानांनी चंद्रावरील पृष्ठभागाच्या चांगल्या दर्जाच्या प्रतिमा काढल्या. या प्रतिमांमध्ये दिसणाऱ्या अनेक विवरांना विविध शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची नावं देण्यात आली आहेत. ही नावं ‘आयएयू’कडे मंजुरीसाठी देण्यात येतात.

“अपोलो मोहिमेच्या काळात चंद्रावरील ठिकाणांना नावं देण्याची अनौपचारिक पद्धत होती. प्रत्येत अवतरणाच्या ठिकाणी असलेल्या छोट्या विवरांना आणि पर्वतांना नावं देण्यात आली आहेत. उदा. शॉर्टी, सेंट जॉर्ज, स्टोन माऊंटन. अधिकृत नावं देण्याआधी विशिष्ट ठिकाणांचा उल्लेख करण्यासाठी किंवा त्यांना ओळखण्यासाठी तात्पुरती नावं देण्याचा प्रघात पडला. अपोलो मोहिमेदरम्यान दिलेल्या अनेक नावांना नंतर ‘आयएयू’नं अधिकृत दर्जा दिला”, अशी माहिती पॉल स्पुडीस यांनी नियतकालिकात लिहून ठेवली आहे.

ग्रहावरील ठिकाणांच्या नावांचा ‘आयएयू’ कसा विचार करते?

‘आयएयू’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार त्यांचा एक कार्यगट नावं ठरविण्याची प्रक्रिया पाहतो. आयएयूचे निर्णय किंवा शिफारशी हे कोणत्याही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कायद्यांना बंधनकारक नाहीत. खगोलशास्त्रीय वस्तू आणि त्यांची प्रक्रिया समजून घेण्यास मदत करण्यासाठी ही नावं फायदेशीर ठरतात, असं त्यांचं म्हणणेंआहे.

नावे देण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे –

  • जेव्हा एखाद्या ग्रहाच्या किंवा उपग्रहाच्या पृष्ठभागावरील प्रतिमा प्रथम प्राप्त केल्या जातात. त्यावेळी त्याचे नामकरण करण्यासाठी विशिष्ट थीम निवडल्या जातात आणि काही नावे प्रस्तावित केली जातात, सहसा हे काम ‘आयएयू’च्या कार्यगटाच्या माध्यमातून करण्यात येते.
  • चांगल्या रिझोल्युशनच्या प्रतिमा आणि नकाशे उपलब्ध झाल्यानंतर विशिष्ट पृष्ठभाग किंवा भूगर्भीय रचनांचे मॅपिंग किंवा वर्णन करण्यासाठी शोधकर्त्यांनाच विनंती केली जाऊ शकते.
  • सध्या विशिष्ट नावांचा विचार करावा, असे कुणीही सूचवू शकते; पण तीच नावे स्वीकारली जातील, याची कोणतीही शाश्वती नाही.
  • आयएयूच्या कार्यगटाने पुनरावलोकन केलेली नावे ‘वर्किंग ग्रुप फॉर प्लॅनेटरी सिस्टीम नमेनक्लेचर’ (WGPSN) कडे मंजुरीसाठी पाठविली जातात.
  • WGPSN च्या सदस्यांनी या नावांवर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्याला IAU ची अधिकृत मंजुरी मिळाल्याचे मानले जाते. त्यानंतर ही नावे नकाशे आणि विविध प्रकाशनांसाठी अधिकृतरीत्या वापरली जाऊ शकतात. मंजूर केलेली नावे, ग्रहांचे नामांकन गॅझेटियरमध्ये समाविष्ट करून, त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जातात. एकदा संकेतस्थळावर नाव प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबाबत काही आक्षेप किंवा सूचना असतील, तर नाव दिल्यानंतर तीन महिन्यांच्या आत IAU च्या सरचिटणीसांना ईमेल करता येतो.

आणखी वाचा >> चांद्रयान-३ मोहीम यशस्वी करण्यासाठी झटलेले रिअल ‘हिरो’

या प्रक्रियेला काही वेळ लागू शकतो. उदाहरणार्थ- चीनच्या चांद्रमोहिमेतील ‘चँग ई ५’ हे यान १ डिसेंबर २०२० रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. लँडिंग साईटला Statio Tianchuan असे नाव देण्यात आले. ‘Statio’ या शब्दाचा लॅटिन भाषेतील अर्थ होतो पोस्ट किंवा स्थानक. नासाचे अपोलो ११ ज्या ठिकाणी उतरले त्यालाही Statio Tranquillitatis असे नाव देण्यात आले होते, अशी माहिती ‘स्पेस कॉम‘वर देण्यात आलेली आहे. ‘Tianchuan’ हे नाव चीनच्या नक्षत्रावरून घेण्यात आलेले आहे. चीनचे Statio Tianchuan हे नाव आयएयूने मे २०२१ रोजी मंजूर केले. एकूण या प्रक्रियेला एक वर्षाहून अधिक काळ गेला.

भारताने याआधी चंद्रावरील ठिकाणांना नाव दिले होते?

२००८ साली चांद्रयान-१ मोहीम हाती घेण्यात आली होती. चांद्रयान-१ ज्याठिकाणी कोसळले (चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळू देणे हाच मोहिमेचा उद्देश होता) त्याठिकाणाला ‘जवाहर स्थळ’ असे नाव देण्यात आले होते. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून हे नाव दिले गेले. २००३ ते २००९ या काळात इस्रोचे अध्यक्ष राहिलेल्या जी. माधवन नायर यांच्या माहितीनुसार, माजी राष्ट्रती आणि इस्रोचे माजी शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी भारत चंद्रावर पोहोचण्याच्या कृतीची प्रतिकात्मक नोंद करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

ज्याठिकाणी चांद्रयान-१ पाडण्यात आले, त्याला माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नाव द्यावे, अशी सूचना त्यांनी केली होती. ज्यादिवशी लँडिंग झाले, त्यादिवशी जवाहरलाल नेहरू यांची जयंती होती, तसेच भारताचा वैज्ञानिक विकास आणि संशोधन कार्याला चालना मिळण्यासाठी नेहरू यांनी योगदान दिले होते. आयएयूने हे नाव स्वीकारले असून त्याची अधिकृत घोषणा झालेली आहे.