‘आई’ होणं ही कुठल्या ही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा. एक जीव पोटात वाढत असताना तिची हरप्रकारे काळजी घ्यावी लागते. प्रसूतीचा काळ तर सर्वात जास्त महत्वाचा असतो. बॉलिवूडच्या अभिनेत्री देखील आता आपल्या कारकिर्दीच्या ऐन टप्प्यावर असताना आई होण्याचा निर्णय घेत आहेत. नुकतंच अभिनेत्री सोनम कपूरने एक मुलाला जन्म दिला आहे.
‘अभिनेत्रीच करियर तीच लग्न झालं की संपत’ अशी एक म्हण बॉलिवुडमध्ये प्रसिद्ध होती. मात्र लग्नानंतर देखील माधुरी दीक्षित पासून ते अगदी करीना कपूरपर्यंत यांनी या प्रथेला हाणून पाडले आहे. अभिनेत्री त्यांचे लग्न आणि गरोदर अवस्था आणि त्यांचे कारकिर्दीबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
करियर आणि लग्न याबाबत बॉलिवूडच्या अभिनेत्री काय म्हणतात हे आधी बघुयात, आलिया भट्ट असं म्हणाली ‘जर तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी असाल, तर तुम्हाला गर्भधारणेदरम्यान आराम करण्याची गरज नाही. काम मला शांतता देते, अभिनय ही माझी आवड आहे’. तर करीन कपूरच्या मते, ‘आलिया धाडसी अभिनेत्री आहे, आणि गर्भधारणा ही एक सामान्य गोष्ट आहे. ती तिच्या करियरची घोडदौड अशीच सुरु ठेवेल कारण ती अत्यंत प्रतिभावान कलाकार आहे, तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःवर विश्वास असणे आवश्यक आहे आणि हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे’.
“आम्हाला…” आजोबा झाल्यानंतर अनिल कपूर यांची पहिली प्रतिक्रिया
२०१६ मध्ये करीना कपूर खानने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. तेव्हा ती प्रसूती दरम्यान विश्रांती न घेण्यावर ठाम होती ती असं म्हणाली होती, ‘मला वाटते की लोक खूप विचार करतात की अभिनेत्रीचे लग्न झाले आहे आणि आता तिला एक मूल किंवा मुले आहेत.’ तिचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट लाल सिंग चड्ढा, या चित्रपटाच्या दरम्यान ती पुन्हा एकदा गरोदर राहिली होती मात्र तिने चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले नाही.
करीना कपूर असो किंवा आलिया भट हा मुद्दा केवळ दोघींपुरता नसून बॉलिवूडमध्ये आजतागायत जितक्या अभिनेत्री होऊन गेल्या त्यांनी लग्नानंतर देखील आपली अभिनयाची कारकीर्द सुरूच ठेवली. बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ म्हणून ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे ‘प्रियांका चोप्रा’सध्या हॉलिवूडमध्ये व्यस्त आहे. निक जोनस याच्यासोबत लग्न करून तिने आपले करियर सुरु ठेवले आहे तसेच नुकतेच तिने सरोगेसी द्वारे एका मुलीला जन्म दिला आहे.
दीपिका पदुकोण, यामी गौतम, अनुष्का शर्मा, कतरीना कैफ यासारख्या अभिनेत्री लग्नानंतर देखील तितक्याच जोमाने काम करत आहेत. पुष्पा, फॅमिली मॅन सारख्या कलाकृतींमधून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री ‘समंथा’ घटस्फोटानंतर देखील आपले दक्षिणेत चित्रपट करत आहेच.
लग्नानंतर किंवा मातृत्वानंतर अभिनेत्री नेहमीच चित्रपट सोडतात का?.
बॉलिवूडमध्ये केवळ २ चित्रपट करून देखील काही अभिनेत्री पुन्हा चित्रपटांकडे वळलेल्या नाहीत. हिंदी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील अभिनेत्रींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते ते म्हणजे ‘नर्गिस’. सुनील दत्त यांच्याशी लग्न झाल्यांनतर त्यांनी चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता मात्र माध्यमांच्या म्हणण्यानुसार, नर्गिस यांचा भाऊ जाफर हुसैन, जो निर्माता होता त्याने नर्गिस यांना चित्रपटात काम करण्यास सुचवले. १९६७ साली त्यांनी रात और दिन चित्रपटातून पुरागमन केले.
गरोदर आलियाची खिल्ली उडवणाऱ्या रणबीरला नेटकऱ्यांनी सुनावलं; पाहा नेमकं काय घडलं
वैजयंतीमाला यांनी तामिळ आणि हिंदी या दोन्ही चित्रपटसृष्टीत प्रसिद्धी मिळवली, १९६८ मध्ये डॉ चमनलाल बाली यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘गंवार’ (१९७०) होता, जो त्यांनी लग्नाआधी स्वीकारलेला होता. याला अपवाद देखील आहेत नूतन यांनी १९५९ मध्ये नौदल लेफ्टनंट-कमांडर रजनीश बहल यांच्याशी लग्न केले. १९६१ साली मोहनीशला जन्म दिल्यानंतर देखील त्यांनी आपले काम सुरु ठेवले. शर्मिला टागोर यांनी १९६८मध्ये मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी लग्न केले आणि लग्नानंतर खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द बहरली. ‘आराधना’, ‘अमर प्रेम’, ‘दाग’ असे अजरामर चित्रपट त्यांनी दिले.
वहिदा रहमान त्यांच्या आत्मचरित्रात लिहतात की, ‘१९७४ मध्ये शशी रेखी यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या आपल्या पती आणि मुलांसह बंगळूर येथे स्थायिक झाल्या. मात्र त्यानंतर त्यांनी चित्रपटात काम करण्यास सहमती दर्शवली, होती ती आर्थिक कारणांसाठी होती’. त्या असेही म्हणाल्या की, ‘३४ वर्षांची असताना त्यांनी लग्न केले, आणि तेव्हाच काळ असा होता की अभिनेत्रीच वय ३०च्या पुढे गेल्यावर चांगल्या भूमिका त्यांच्या वाट्याला येत नसत’.
इंग्लिश अभिनेत्री जेनिफर केंडलने १९५८ मध्ये शशी कपूर यांच्याशी लग्न केले आणि तिने आपली अभिनय कारकीर्द सुरू ठेवली. तिने ‘३६ चौरंगी लेन’ (१९८१), ‘हीट अँड डस्ट’ (१९८३) सारख्या समीक्षकांनीगौरवलेल्या चित्रपटांमध्ये काम केले.१९७१ मध्ये रणधीर कपूर यांच्यासोबत लग्न केल्यानंतर बबिता यांना करियर सोडून द्यावे लागले, तरीही त्यांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवले.
नीतू सिंग यांनी १९८० मध्ये ऋषी कपूर यांच्याशी लग्न केले, त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीपासून लांब राहणे पसंत केले ही त्यांची “वैयक्तिक निवड” होती. नितु सिंग यांच्या मुलाशी आलिया भटने लग्न केले आहे. आलिया देखील आता निर्मिती क्षेत्रात उतरली आहे. नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला डार्लिंग या चित्रपटाची निर्मिती तिने केली आहे.
कतरीना आणि विकीच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन ? क्लिनिकबाहेरचे फोटो व्हायरल
८० ते ९० च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी आपले नशीब बॉलिवूडमध्ये आजमावले. याच दशकात दोन अभिनेत्रींनमध्ये कायम स्पर्धा होती. त्या अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित. श्रीदेवीने बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केल्यांनतर चित्रपट केले नाहीत. २०१२ साली आलेल्या इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातून पुरागमन केले. धक धक गर्ल माधुरीने मराठमोळ्या नेनेंशी लग्न केल्यांनतर काही काळ अमेरिकेत स्थायिक झाली. माध्यमांच्या म्हणण्यानुसार, ‘देवदास’ चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान ती गरोदर होती. पहिल्या मुलाचा जन्मांनंतर तिने ५ वर्ष काम केले नाही. २००७ साली तिने आजा नचले चित्रपटाद्वारे पुरागमन केले.
काजोलने १९९९ मध्ये अजय देवगणशी लग्न केले, २००२ साली आलेल्या ‘कभी ख़ुशी कभी गम’ चित्रपटानंतर तिने आपल्या वैवाहिक आयुष्यावर लक्ष केंद्रित केले. मात्र २००६ साली आलेल्या फना चित्रपटाद्वारे तिने पुरागमन केले. मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय हिने देखील बच्चन यांची सून झाल्यानंतर आपली कारकीर्द सुरूच ठेवली आहे.