दत्ता जाधव
देशातील खाद्यतेल उद्योगात सरकी तेलाचा वाटा मोठा आहे. मात्र, या उद्योगातील जाणकार यंदा पुरेशा प्रमाणात सरकीचा पुरवठा होण्याबाबत साशंक आहेत. अशी स्थिती का निर्माण झाली?
खाद्यतेल उद्योगात सरकी तेल महत्त्वाचे का?
देशाला दर वर्षी २४० लाख टन खाद्यतेलाची गरज असते. त्यापैकी ६५ % म्हणजे १४० लाख टनाची आयात करावी लागते. त्यापोटी १.२ लाख कोटी रुपये (सुमारे १५ अब्ज डॉलर) मोजावे लागतात. इतकी मोठी रक्कम दर वर्षी देशाबाहेर जाते. देशात खाद्यतेलाचे उत्पादन जेमतेम १०० लाख टन इतके आहे. या १०० लाख टनांत सरकी तेलाचा वाटा आहे, जेमतेम १२ ते १६ लाख टनांच्या घरात. त्याचे उत्पादन वाढविण्याची संधी असूनही वाढ होताना दिसत नाही.
देशाचे सरकी उत्पादन नेमके किती?
भारत कापूस लागवडीत जगातील आघाडीवरील देश आहे. जगात दर वर्षी एकूण ३३३ लाख हेक्टरवर कापूस लागवड होते. त्यांपैकी देशात दर वर्षी सुमारे १२८ लाख हेक्टरवर कापूस लागवड होते. जागतिक कापूस लागवडीपैकी सुमारे ३३ टक्के लागवड एकटय़ा भारतात होते. सन २०१६-१७ मध्ये १०८.२६, २०१९-२०मध्ये १३४.७७, २०२१-२२मध्ये १२०.६९ आणि यंदाच्या खरीप हंगामात सरासरी १२० लाख हेक्टरवर कापूस लागवड होण्याचा अंदाज होता. २०१९-२०मध्ये ३६५ लाख गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन झाले होते. २०२०-२१मध्ये ३५२.४८ लाख गाठी, २०२१-२२मध्ये ३११.१७ लाख गाठींचे उत्पादन झाले होते. यंदा ३४३.४७ लाख गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. कापूस उत्पादनावर सरकीचे उत्पादन अवलंबून असते. २०१९-२० मध्ये १२ लाख टन, २०२०-२१मध्ये ११ लाख टन, २०२१-२२मध्ये १० लाख टन उत्पादन झाले होते. यंदा १०.४० लाख टन सरकीचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
सरकी उत्पादनात घट होणार?
देशात सरासरी १२ ते १६ लाख टन सरकी उत्पादन होते. मात्र, मागील काही वर्षांपासून त्यात घट होत आहे. यंदाही तोच कल कायम राहण्याचा अंदाज उद्योगातील जाणकार व्यक्त करीत आहेत. यंदा मोसमी पावसाने ओढ दिल्यामुळे कापसाच्या पेरणीत घट होण्याची शक्यता आहे. सरासरीच्या १२८ लाख हेक्टरच्या तुलनेत ९ जुलैअखेर फक्त ७६.१८ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. जुलैअखेर चांगला पाऊस होऊन लागवडीत वाढ होण्याची शक्यता असली, तरीही सरासरी गाठण्याची शक्यता कमीच आहे. या शिवाय मागील काही वर्षांपासून बोगस बियाणे आणि लाल बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या उत्पादनात होत असलेल्या घटीमुळे शेतकरी हैराण आहेत. मागील वर्षी १२ हजार प्रतिक्विंटलवर असणारे कापसाचे दर, यंदा सरासरी ७ हजार ५०० प्रति क्विंटल आल्यामुळे शेतकरी कापसाऐवजी तूर, मका, सोयाबिनकडे वळत आहेत. त्यामुळे सरकीच्या उत्पादनात मोठय़ा घटीचा अंदाज आहे. त्यामुळेच खाद्यतेल उद्योगाला सरकीचा अपेक्षित पुरवठा होण्याबाबत खाद्यतेल उद्योगातील जाणकार साशंक आहेत. द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसईए) अध्यक्ष अजय झुनझुनवाला यांनीही ही भीती व्यक्त केली आहे.
सरकी तेलाचा वापर कुठे, कसा होतो?
देशात मागील वर्षी सरासरी १२ लाख टन सरकी तेलाचे उत्पादन झाले होते. त्यापैकी ९६ टक्के तेलाचा वापर गुजरात आणि महाराष्ट्रात होते. सुमारे सात लाख टन सरकी तेलाचा वापर फक्त गुजरातमध्ये होतो. त्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर परिसरात खाद्यतेल म्हणून सरकी तेलाचा वापर सर्वाधिक होतो. घरगुती वापराचा विचार करता, देशात एकूण चार टक्के घरांत, गुजरातमधील ८५ टक्के घरांत आणि महाराष्ट्रातील १५ टक्के घरांत सरकी तेलाचा खाद्यतेल म्हणून वापर होतो. गुजरातमध्ये प्राधान्याने घरात सरकी तेलाचाच वापर केला जातो. त्यानंतर खाद्यपदार्थ उद्योगात सरकी तेलाचा वापर होतो. सरकी तेलात तळलेले पदार्थ सुमारे ३० दिवस चांगले राहतात. अन्य तेलाच्या तुलनेत सात-आठ दिवस खाद्यपदार्थाची टिकवण क्षमता वाढते. शिवाय मूळ चवही कायम राहते. त्यामुळे खाद्यउदोगातील कंपन्या या तेलाचा वापर करतात.
सरकी तेल उद्योग अडचणीवर मात करणार?
देशात होणाऱ्या सरकीचे उत्पादन गृहीत धरूनच आजवर सरकी तेल उद्योग आपले नियोजन करीत आला आहे. पण, आता कमी होणारे सरकीचे उत्पादन आणि उद्योगातून वाढलेली मागणी याचा मेळ घालणे अवघड जात आहे. सरकीची उपलब्धता पाहूनच यापुढे नवे सरकी तेल प्रकल्प उभारण्याची गरज आहे. काही उद्योजक सरकीपासून तेल काढण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार करीत आहेत. सध्या पारंपरिक पद्धतीने तेल काढले जात असल्यामुळे सरकी पेंडीत तेलाचा अंश राहतो.
सरकीवरील प्रक्रिया उद्योग अधिक कार्यक्षम झाल्यास त्यातून दर वर्षी किमान पाच ते सहा लाख टन अधिकचे खाद्यतेल उपलब्ध होऊ शकेल. त्या दृष्टीने उद्योगातील जाणकार प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसईए) माजी अध्यक्ष भारत मेहता यांनी दिली.