3,370 year-old bust of Queen Nefertiti: एका इजिप्शियन पुरातत्त्वज्ञाने बर्लिनमध्ये असलेल्या राणी नेफरतितीचा अर्धपुतळा परत करण्याची मागणी केली आहे. तर जर्मनीने तसे करण्यास नकार दिला आहे. राणी नेफरतितीचा अर्धपुतळा इजिप्तच्या इतिहासाची साक्ष देतो, परंतु त्याच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे तो जर्मनीतील संग्रहालयाची शोभा वाढवत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा घेतलेला आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेफरतिती कोण होती?

नेफरतिती प्राचीन इजिप्तच्या इतिहासातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावशाली राणी होती. ती फिरौन अखेनातेनची पत्नी होती. फिरौन अखेनातेन हा इजिप्तच्या अठराव्या राजवंशातील एक महत्त्वाचा शासक होता. अखेनातेनच्या कारकिर्दीत इजिप्तमध्ये धार्मिक क्रांती झाली. या कालखंडात एकेश्वरवादी धर्माची स्थापना करण्यात आली. अतेनच्या- सूर्यपूजनाला महत्त्व याच कालखंडात प्राप्त झाले तर नेफरतितीने या नवीन धार्मिक परंपरेमध्ये आपल्या पतीला पाठिंबा दिला. नेफरतितीची प्रतिमा इजिप्तमधील अनेक कलाकृतींमध्ये आढळते. तिचा प्रसिद्ध रंगीत चुनखडीचा अर्धपुतळा १९१२ साली जर्मन पुरातत्त्वज्ञांनी अमार्ना शहरातून शोधून काढला. आज तो प्रसिद्ध पुतळा बर्लिनच्या Neues म्युझियममध्ये आहे. नेफरतिती ही केवळ तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध नव्हती, तर ती एक बुद्धिमान आणि शक्तिशाली स्त्री होती. तिच्या अनेक शिल्पांवरून ती पतीच्या समकक्ष मानली जात असल्याचे संकेत मिळतात. तिचा प्रभाव तिच्या जीवनकाळात आणि त्यानंतरही इजिप्तच्या इतिहासात कायम राहिला आहे. तिचा अर्धपुतळा आजही जगभरातील अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच जर्मनीकडून हा पुतळा परत मिळावा, अशी मागणी आता मूळ धरू लागली आहे.

अखेनातेन अतेनची उपासना करताना (फोटो: विकिपीडिया)

का आहे हा पुतळा महत्त्वाचा?

नेफरतितीच्या अर्धपुतळ्याची किंमत अंदाजे ४३३ दशलक्ष डॉलर्स एवढी आहे. हा पुतळा इजिप्शियन पुरातन वस्तूंच्या मुकुटातील एक रत्न मानला जातो. परंतु, राणी नेफरतितीचा ३,३७० वर्षांपूर्वीचा अर्धपुतळा १९१३ पासून बर्लिनमध्ये आहे. आता तो परत देण्याबाबत दबाव वाढतो आहे. इजिप्तचे माजी पुरावस्तू मंत्री झाही हवास यांनी होस्नी मुबारक यांच्या २०११ मधील राजीनाम्याच्या निदर्शनांपूर्वी नेफरतितीला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. जर्मनीने राणी नेफरतितीचा प्रसिद्ध अर्धपुतळा परत करावा यासाठी हवास यांनी यावर्षी सप्टेंबरमध्ये याचिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. ‘हा अर्धपुतळा, त्याचा इतिहास आणि सौंदर्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. सध्या तो जर्मनीत आहे, परंतु आता तो इजिप्तमध्ये परतण्याची वेळ आली आहे,’ असे त्या याचिकेमध्ये म्हटले आहे. एका जर्मन पुरातत्त्वीय पथकाने १९१२ साली रंगीत चुनखडीचा हा अर्धपुतळा शोधून काढला आणि वर्षभरानंतर तो युरोपला पाठवला. सध्या नेफरतितीचा हा पुतळा बर्लिनमध्ये पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आणि लोकप्रिय जनमानसाचा भाग ठरला आहे.

अखेनातेन आणि नेफरतिती (फोटो: विकिपीडिया)

अधिक वाचा: History of Ajrakh: इजिप्तपासून ते मोहेंजोदारोपर्यंत आधुनिक अजरकचा इतिहास आहे तरी किती जुना?

Nefertiti वसाहतवादाचे प्रतीक आहे का?

नेफरतितीचा अर्धपुतळा इसवी सनपूर्व १३४५ मध्ये तयार करण्यात आल्याचे मानले जाते. बर्लिनमध्ये या पुतळ्याची ओळख ‘इजिप्तचा राजदूत’ अशी आहे. मात्र, इजिप्शियन पुरातत्त्वज्ञ मोनिका हॅना यांनी या विशेषणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यांनी डीडब्लूला सांगितले की, ‘राजदूत म्हणून पाठवणे म्हणजे किमान काही राजनैतिक देवाणघेवाण असणे अपेक्षित असते. त्यांनी विचारणा केली की, इजिप्तला त्याबदल्यात काही महत्त्वाचे मिळाले आहे का, जसे की ‘प्रुशियन सम्राट फ्रेडरिक द ग्रेटचा मुकुट किंवा आल्ब्रेख्ट ड्युरर यांचे चित्र?’, ‘माझ्या मते त्यांनी या अर्धपुतळ्याला ‘राजदूत’ म्हणणे हे एकतर्फी आहे, म्हणून तो ‘बंधक’ ठरतो. त्यांनी सार्वजनिकरित्या इजिप्शियन पुरातत्त्वशास्त्राला वसाहतवादातून मुक्तता करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, नेफरतितीला परत आणण्याच्या प्रयत्नास विरोध होत आहे. कारण यामुळे वसाहतवादी काळात नेलेल्या अनेक वस्तू परत करण्याचा मार्ग मोकळा होईल. झाही हवास यांच्या याचिकेत रोसेटा स्टोन आणि डेन्डेरा राशिचक्र ही परत करण्याची मागणी करण्यात आली आहे, या दोन्ही पुरावस्तू सध्या फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये आहेत. लंडनच्या ब्रिटीश म्युझियममध्ये असलेला रोसेटा स्टोन हा एक प्राचीन इजिप्शियन शिलाखंड असून, त्यावर अनेक भाषा आणि लिपीत कोरलेले लेख आहेत. त्यामुळे चित्रलिपी लेखनाच्या रहस्यांचा उलगडा जगभर झाला. डेन्डेरा राशिचक्र हे इजिप्तमधील एका मंदिरातील पहिल्या शतकाच्या मध्यातील एक मोठे शिलाचित्र असून, सध्या पॅरिसच्या लुव्र म्युझियममध्ये आहे.

पुतळा परत करण्यासाठी बर्लिन संग्रहालय का तयार नाही?

प्रशियन सांस्कृतिक वारसा फाउंडेशनकडून बर्लिनच्या संग्रहालय संग्रहाचे व्यवस्थापन केले जाते. त्यांच्या संग्रहात असलेल्या वसाहतकालीन काही वस्तू नायजेरियाला परत करण्यात आल्या होत्या. कारण त्या चोरी करण्यात आल्या होत्या, त्यात बेनिन ब्राँझेसचा समावेश होता. त्यामुळेच त्यापैकी काही २०२२ साली नायजेरियाला परत करण्यात आल्या. मात्र, त्याच फाउंडेशनचे मत आहे की, नेफरतितीचा अर्धपुतळा कायदेशीररित्या इजिप्तमधून प्राप्त झाला होता. नेफरतितीचा पती फिरौन अखेनातेनची अल्पकाळ राजधानी असलेल्या अमार्ना शहराच्या अवशेषांमध्ये हा पुतळा सापडला होता. अखेनातेनच्या मृत्यूनंतर नाईल नदीच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले हे शहर इ.स.पू. १३३५ मध्ये सोडण्यात आले. नेफरतितीचा अर्धपुतळा इजिप्तच्या पुरातन वस्तू प्रशासनाने अधिकृत केलेल्या उत्खननात सापडला. त्या काळातील प्रथेनुसार मिळालेल्या अनेक वस्तूंच्या विभागणीच्या आधारावर तो बर्लिनमध्ये आला.

ब्रिटिश म्युझियममधील रोझेटा स्टोन (फोटो: विकिपीडिया)

अर्धपुतळा कायदेशीररित्या देशाबाहेर नेण्यात आला आणि इजिप्त सरकारने त्याच्या परताव्याचा कोणताही दावा केलेला नाही, असे प्रशियन सांस्कृतिक वारसा फाउंडेशनचे प्रवक्ते स्टेफन म्यूकलर यांनी डीडब्लूला दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे. म्यूकलर इजिप्शियन अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या एका कराराचा उल्लेख करत आहेत, ज्यात जर्मन सुती आणि वस्त्र उद्योगातील उद्योजक जेम्स सायमन यांनी पुरवलेल्या आर्थिक मदतीच्या बदल्यात सुमारे १० हजार पुरावस्तूंची अर्धी वाटणी करण्यात आली होती. जर्मन कलातज्ज्ञ सांगतात की, इजिप्शियन सरकारच्या एका प्रतिनिधीने अर्ध्या वस्तूंची निवड केली, तर उर्वरित अर्ध्या वस्तू जर्मनीला नेण्यात आल्या, ज्यामध्ये हा अर्धपुतळा देखील समाविष्ट होता. काही वर्षांनंतर तो म्युझियममध्ये रितसर प्रदर्शित करण्यात आला.

अधिक वाचा: ४५०० वर्षांपूर्वी कोणी बांधले इजिप्तमधले पिरॅमिड?

इजिप्तशियन पुरातत्त्वज्ज्ञ आपल्या मतावर ठाम

परंतु, हवास यांनी म्हटले आहे की, नेफरतितीचा अर्धपुतळा १९१३ साली जर्मनांनी इजिप्तमधून चोरून नेला. हा पुतळा ज्या वेळी अवैध मार्गाने इजिप्तच्या बाहेर नेण्यात आला, त्यावेळी देशात पुरातन वस्तू इजिप्तबाहेर नेणे बेकायदेशीर ठरवणारे कायदे होते. पुरातत्त्वज्ज्ञ हवास यांचा दावा आहे की, प्राथमिक उत्खननाचे सर्वेसर्वा जर्मन इजिप्तशास्त्रज्ञ लुडविग बोरचार्ड यांनी बनावट कारणे दाखवून नेफरतितीला देशाबाहेर नेले. नेफरतितीच्या अर्धपुतळ्याचे हस्तांतरण १९२२ साली तुतानखामेनच्या थडग्याचा शोध लागण्यापूर्वीच झाले. या ऐतिहासिक शोधानंतर, इजिप्तने परदेशी उत्खननकर्त्यांना मोठ्या पुरावशेषांना आपल्या देशी घेऊन जाण्याचा अधिकार काढून घेतला, असे लुईस मॅकनॉट यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले. लुईस मॅकनॉट हे सांस्कृतिक पुनर्स्थापना आणि ऐतिहासिक वस्तूंच्या परताव्याच्या विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यांचे मत आहे की, हवास यांना नेफरतितीला परत आणण्यात यश मिळणे फारच कठीण आहे. जोपर्यंत हवास किंवा इजिप्तशिअन अधिकारी जाणीवपूर्वक फसवणूक झाल्याचे नवे पुरावे देत नाहीत, तो पर्यंत पुतळा परत येऊ शकत नाही. त्या काळात उत्खननातून मिळालेल्या वस्तूंचे विभाजन कसे केले गेले हे गूढतेने झाकोळलेले आहे, असे त्यांनी डीडब्ल्यूला-DW सांगितले