Shraddha Walkar Murder Case: एखाद्या नात्यात जोडीदाराने आपल्या मनाप्रमाणे वागावे अशी अनेकांची इच्छा असते मात्र ही इच्छा जेव्हा हट्ट बनू लागते तेव्हा त्यातूनच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागते. अलीकडेच समोर आलेल्या काही खऱ्या व ऑन स्क्रिन घटनांमध्ये याच हट्टाचे वर्णन करण्यात आले आहे. दिल्ली मध्ये घडलेले श्रद्धा वालकर हत्याकांड व आलिया भटचा डार्लिंग्स हा चित्रपट हे दोन्ही या हट्टीपणाचे उदाहरण आहे. या दोन्हीमधील साम्य म्हणजे नात्यात जोडीदाराचा विक्षिप्तपणा. या विक्षिप्तपणाचे वर्णन करण्यासाठी गॅसलाइटिंग हा शब्द वापरला जातो. अमेरिकन मेरियम-वेबस्टर डिक्शनरी प्रकाशकाने ‘गॅसलाइटिंग’ हा २०२२ वर्षातील सर्वात प्रसिद्ध शब्द म्हणून घोषित केला आहे. हा शब्द नेमका काय व याचा श्रद्धा वालकर प्रकरणाशी काय संबंध आहे जाणून घेऊयात..

गॅस लाइटिंग म्हणजे काय?

अमेरिकन मेरियम-वेबस्टर डिक्शनरी प्रकाशकाने ‘गॅसलाइटिंग’ हा २०२२ वर्षातील सर्वात प्रसिद्ध शब्द म्हणून घोषित केला आहे. मेरियम-वेबस्टरच्या मते ‘गॅसलाइटिंग’ ची व्याख्या म्हणजे एखाद्या व्यक्तीचे अधिक कालावधीसाठी केले जाणारे मानसिक मॅनिप्युलेशन म्हणजे स्वतःच्या मनाप्रमाणे त्या व्यक्तीस वागायला भाग पाडणे. यामुळे पीडित व्यक्तीला स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवता येत नाही. वास्तवाची जाणीव न होणे, आठवणींचा गोंधळ होणे, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान गमावणे, भावनिक किंवा मानसिक अस्थिरता व सर्वात गंभीर बाब म्हणजे गुन्हा करणाऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय लागणे ही सर्व लक्षणे दिसून येतात.

Shah Rukh Khan meets fan from Jharkhand who waited for him outside Mannat for 95 days
Shah Rukh Khan : शाहरुख खानने ९५ दिवस ‘मन्नत’बाहेर थांबलेल्या चाहत्याची घेतली भेट, म्हणाला..
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
thane Bhiwandi attempt to murder
ठाणे: सिगारेट मागितली म्हणून हत्येचा प्रयत्न
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Kanpur Crime News
Kanpur : धक्कादायक! महिलेची हत्या करून मृतदेह ‘व्हिआयपी’ परिसरात पुरला; चार महिन्यांनी ‘असं’ उलगडलं घटनेचं रहस्य
man murdered colleague over dispute on food cooking
जेवण बनवण्यावरून वाद; लोखंडी रॉडनी ११ घाव घालून केली हत्या, पिंपरीतील घटना
Madhya Pradesh Shocker: Pregnant Woman 'Forced' To Clean Blood-Stained Hospital Bed After Husband's Murder In Dindori
इथे माणुसकी मेली! पतीचा गोळीबारात मृत्यू, गरोदर पत्नीला रक्त साफ करण्यास भाग पाडलं; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

गॅस लाइटिंग हा शब्द कधी प्रचलित झाला?

मेरियम-वेबस्टर डिक्शनरीच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षात गॅसलाईटिंग या शब्दाची व्याख्या शोधणाऱ्यांमध्ये १,७४०% वाढ झाली आहे. याचा थेट अर्थ असा की हा शब्द नेमका काय याविषयी अनेकांचे कुतुहूल वाढत आहे. प्राप्त माहितीनुसार, पॅट्रिक हॅमिल्टनच्या १९३८च्या नाटकात “गॅस लाइट” नावाचा शब्द पहिल्यांदा वापरला गेला.

या शब्दाची व्युत्पत्ती फारच रंजक आहे. १९३८ च्या नाटकाच्या शीर्षकावरून व त्यावर आधारित चित्रपटावरून गॅसलाईट शब्दाचा संदर्भ समजून घेता येतो. या चित्रपटाचे साधारण कथानक असे होते की एक पुरुष आपल्या पत्नीला ती वेडी झाली असे असे पटवून देण्याचा प्रयत्न करून असतो.

तिला तिचे वेडेपण पटवून देण्यासाठी तो घडवून आणणाऱ्या असणाऱ्या रहस्यमयी घटनांचा एक भाग म्हणजे तो गॅसच्या आगीची आच मंद करायचा व त्यानंतर तो तिला हे पटवून देण्याचा प्रयत्न करायचा की गॅसची आच मंद झालेलीच नाही आणि जर तरीही तिला त्याचे म्हणणे पटत नसेल तिने आता स्वतःच्या समाजांवर विश्वास ठेवता कामा नये. नात्यात समोरच्याचं मन चुकीच्या पद्धतीने बदलण्याच्या या प्रक्रियेला पुढे गॅसलाईटिंग असे म्हंटले जाऊ लागले व याच शब्दाचा प्रयोग मानसोपचारतज्ज्ञ व मानसिक आरोग्याशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांकडून हा शब्दप्रयोग वापरला जाऊ लागला.

हे ही वाचा<< विश्लेषण: श्रद्धा आणि आफताब पूनावालाच्या पहिल्या भेटीस कारण ठरलेलं Bumble App नेमकं आहे तरी काय?

विशेषतः गेल्या चार वर्षात गॅसलाईटिंग शब्द इंग्रजी भाषेत अगदी वेगाने प्रचलित झाला आहे.मेरियम-वेबस्टरचे वरिष्ठ संपादक पीटर सोकोलोव्स्की यांच्या माहितीनुसार २०२२ मध्ये गॅसलाईटिंग सह ‘सेन्टिनंट’ (संवेदनशील), ‘ओमिक्रोन’ व क्वीन कॉन्सर्ट (एलिझाबेथ राणीच्या मृत्यूपश्चात) हे शब्द अधिक शोधले गेले होते.

हे ही वाचा<< विश्लेषण: श्रद्धा वालकरच्या खुनाने हादरला देश; भातात लिव्ह इन रिलेशनचे कायदे काय आहेत?

दरम्यान, ऑक्सफर्ड तर्फे वर्ड ऑफ द इयर पुरस्कारासाठी ‘मेटाव्हर्स’ हा शब्द निवडण्याचा विचार केला जात. मेटाव्हर्स हे “आभासी वास्तव’ आहे ज्यामध्ये वापरकर्ते एकमेकांशी व्हर्च्युअल संवाद साधू शकतात,” 2 डिसेंबर रोजी, ऑक्सफर्डच्या वर्ड ऑफ द इयर पुरस्कारासाठी मतदान बंद होईल आणि 5 डिसेंबर रोजी विजेत्याची घोषणा केली जाईल.