AN 94 Rifle Sidhu Moose Wala Murder : पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात रविवारी सायंकाळी जवाहरके गावामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येसाठी एएन-९४ ही रशियन बनावटीची असॉल्ट रायफल वापरण्यात आली. अशाप्रकारे पंजाबमधील गँगवॉरदरम्यान एएन-९४ रायफल वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिद्धू मुसेवाला यांच्यावर २ मिनिटांमध्ये ३० गोळ्या झाडण्यात आल्या.

नक्की वाचा >> विश्लेषण : १८ लाखांचे दागिने, ५ कोटी बँकेत, २६ लाखांची कार अन्… सिद्धू मुसेवालांकडे एकूण किती संपत्ती होती?

समोर आलेल्या माहितीनुसार मुसेवाला यांच्या गावात हल्लेखोर पोहचले तेव्हा मुसेवालांच्या सुरक्षेसाठी तैनात असणारे एके-४७ बंदुका घेऊन असलेले कमांडो पाहून परतले. त्यानंतर त्यांनी कॅनडामधील गँगस्टर सतींदर सिंग उर्फ गोल्डी ब्रारकडून एएन-९४ रायफल मागवली. याच रायफलने मुसेवालांची हत्या करण्यात आली. रशियन बनवाटीची एएन-९४ असॉल्ट रायफल नेमकी असते कशी? कशापद्धतीने ही घातक रायफल भारतात आली याबद्दल जाणून घेऊयात…

ISRO satellite launch , Sriharikota, andhra pradesh, 100th successful flight,
ISRO satellite launch mission : इस्रोने श्रीहरीकोटामध्ये ठोकले दमदार शतक, शंभराव्या उड्डाणात ५४८ वा उपग्रह केला प्रक्षेपित
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
DRDO scramjet test loksatta
डीआरडीओची स्क्रॅमजेट चाचणी काय होती? भारताची हायपरसॉनिक क्षेपणास्त्र क्षमता लवकरच अमेरिका, रशिया, चीनच्या तोडीची?
trump warns Russia marathi news
Donald Trump : रशियावर निर्बंध लादण्याचा ट्रम्प यांचा इशारा
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
mahayuti dispute on guardian ministership
विश्लेषण : पालकमंत्रीपदावरून महायुतीत ठिणगी कशासाठी? भाजपवर शिंदे गट नाराज?

एएन-९४ रायफल नेमकी आहे कशी?
एएन-९४ ही पूर्णपणे रशियन बनवाटीची असॉल्ट रायफल आहे. ही १९९४ च्या एव्तोमॅट निकोनोवा मॉडल नावानेही ओळखली जाते. याच वरुन तिला एएन-९४ हे नाव मिळालं आहे. या रायफलचे मुख्य डिझायनर गेनाडी निकोनोवा यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आलंय. निकोनोव यांनीच पहिली मशीन गन बनवली होती. एएन-९४ च्या निर्मितीचं काम १९८० मध्ये सुरु झालं. तब्बल १४ वर्षांनंतर म्हणजे १९९४ मध्ये हे काम पूर्ण झालं.

एएन-९४ ला एके-७४ रायफलच्या जागी वापरण्याच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेलं. सध्या रशियन सेना प्रामुख्याने एके-७४ आणि एएन-९४ चाही वापर करते. रशियन सैन्याकडे आधी असणाऱ्या कलाश्निकोव्ह रायफल्सच्या जागी एएन-९४ चा वापर सध्या केला जातो. एएन-९४ चा पहिल्यांदा १९९७ मध्ये रशियन लष्कराकडून वापर करण्यात आला. मात्र फार गुंतागुंतीची रचना आणि अधिक खर्चिक असल्याने रशियन लष्कराकडून या रायफलऐवजी एके-७४ लाच पहिलं प्राधान्य देण्यात आलं. असं असलं तरी आजही काही विशेष गरजांसाठी एएन-९४ चा वापर केला जातो.

नक्की वाचा >> मुसेवाला हत्या : हत्याकांडांनंतर पाच दिवसांनी स्थानिक AAP आमदार सांत्वनासाठी मुसेवालांच्या घरी गेले असता स्थानिकांनी…

एएन-९४ रायफलची क्षमता, वैशिष्ट्यं आणि कमतरता…
– एएन-९४ रायफलने टू-राऊंड बर्स्ट मोडमध्ये प्रत्येक मिनिटाला ६०० गोळ्या आणि फूल ऑटो मोडमध्ये १८०० गोळ्या झाडता येतात.

– या रायफलमधून निघाणाऱ्या गोळ्यांचा वेग ९०० मीटर किंवा तीन हजार फूट प्रति सेकंद एवढा असतो. एके-४७ मधून निघाणाऱ्या गोळ्यांचा वेग ७१५ मीटर किंवा २४०० फूट प्रति सेकंद एवढा असतो. यावरुनच एएन-९४ किती शक्तीशाली आहे याचा अंदाज बांधता येतो.

– एएन-९४ असॉल्ट रायफलची रेंज ७०० मीटरची आहे. म्हणजेच एके-४७ च्या ३५० मीटर या क्षमतेच्या दुप्पट क्षमता एएन-९४ ची आहे.

– या घातक रायफलमध्ये ३० ते ४५ काडतूसं असणारी मॅगझीन वापरली जाते. अशाच प्रकारची मॅगझीन एके-४७ मध्ये वापरली जाते. याचप्रमाणे ६० गोळ्या असणारी मॅगझीनही यामध्ये लावता येते. याला कास्केट मॅगझीन असंही म्हणतात.

– एएन-९४ असॉल्ट रायफलचं वजन ३.८५ किलोग्राम आहे. स्टॉक म्हणजेच बटचा (तळाकडील भाग) विचार करुन लांबी मोजल्यास या रायफलची एकूण लांबी ३७.१ इंच आहे. बट वगळता या रायफलची लांबी २८.७ इंच आहे. या रायफलच्या नळीची लांबी १५.९ इंच आहे. या रायफळमध्ये ५.४५ x ३९ मिलीमीटर लांबीच्या काडतुसांचा वापर केला जातो.

– फुल ऑटो मोडमध्ये एएन-९४ असॉल्ट रायफल दोन स्टेजमध्ये काम करते. पहिल्या दोन राऊंडमध्ये १ हजार ८०० गोळ्या प्रति मिनिटच्या हिशोबाने फायरिंग केली जाते. त्यानंतर हॅमर युनिट लो रेट मोडवर काम करते. बाकी राऊंडमध्ये फायरिंग ही ६०० गोळ्या प्रति मिनिट या क्षमतेने केली जाते.

– यामध्ये फायरिंग रेट म्हणजेच गोळ्या चालवण्याची क्षमता ही मॅन्यूअली सेट करता येत नाही. या रायफलची संपूर्ण यंत्रणा ही स्वयंचलित (ऑटोमॅटिक मोड) असते. एकदा ट्रिगर दाबल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पुन्हा पुन्हा घडते आणि मॅगझीन संपेपर्यंत गोळ्या सुटतात.

नक्की वाचा >> मुसेवालांवर अत्यंसंस्कार: मुलाला शेवटचा निरोप देणाऱ्या आईवडिलांचे फोटो पाहून सेहवागही गहिवरला; म्हणाला, “या वेदनांचं…”

– एएन-९४ च्या अंतर्गत रचनेमध्ये काही त्रुटी आहेत. या रायफलची देखभाल करणेही क्लिष्ट आहे. तसेच एके-४७ च्या तुलनेत या रायफलच्या निर्मितीचा खर्च अधिक आहे.

चीन आणि पाकिस्तान कनेक्शन…
पंजाबमध्ये मागील काही वर्षांपासून अनेक गुंडांच्या टोळ्या सक्रीय आहेत. या टोळ्या सीमेपलीकडून अमली पदार्थ आणि हत्यारं बेकायदेशीररित्या पुरवठा करण्याचं काम करतात. यामधील अनेक टोळ्यांना पाकिस्तानकडून पैशांबरोबरच हत्यारं आणि दारुगोळाही पुरवला जातो. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, पाकिस्तान पंजाबमधील याच टोळ्यांच्या मदतीने भारतामध्ये खालिस्तानवाद्यांना समर्थ देऊन अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.

पंजाबमध्ये असणाऱ्या या टोळ्यांकडे एके-४७ रायफल, एएन-९४ रायफल्सपासून रॉकेट प्रपेल्ड ग्रेनेड म्हणजेच आरपीजीसारखी घातक हत्यारं आढळून येण्यामागे पाकिस्तानचाच हात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये स्फोट घडवण्यासाठी आणि हत्यारं पोहचवण्यासाठी पाकिस्तान ड्रोन्सची मदत घेत आहे. हे ड्रोन्स चीनमधून पाकिस्तानला पोहचल्याचं मानलं जातं. बातम्यांमधील माहितीनुसार एक ड्रोन एका वेळेस १० किलो हत्यारं आणि स्फोटके पाकिस्तानमधून पंजाबमधील शेतांमध्ये पाडतात. त्यानंतर स्थानिक एजंट या गोष्टी पुढील ठिकाणावर पोहचवण्याची व्यवस्था करतो.

सिद्धू मुसेवालांवर ३० गोळ्या झाडल्या…
सिद्धू मुसेवाला यांची रविवारी काही अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. सिद्धू मुसेवाला आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीमध्ये दोन मित्रांसहीत प्रवास करत असताना हा हल्ला झाला. गुरविंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग यांच्यासोबत जात असतानाच सिद्धू मुसेवालाच गाडी चालवत होते. घरापासून काही अंतरावर असताना अचानक सिद्धू मुसेवाला यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.

सिद्धू मुसेवाला यांना चार शसस्त्र सुरक्षारक्षकांची सुरक्षा पुरवण्यात आलेली. या सुरक्षेमध्ये कापत करुन पंजाबमध्ये नव्याने सत्तेत आलेल्या भगवंत मान सरकारने केवळ दोन सुरक्षारक्षक त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले. सिद्धू मुसेवाला यांच्याकडे बुलेटप्रूफ फॉर्चूनरही आहे. मात्र ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी सिद्धू मुसेवाला हे सुरक्षारक्षकांशिवाय आपल्या थार जीपने दोन मित्रांसोबत प्रवास करत होते.

सिद्धू मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंग यांच्या सांगण्यानुसार मुसेवालांच्या गाडीच्या मागील गाडीमध्ये दोन सुरक्षारक्षकांसहीत ते स्वत: प्रवास करत होते. मात्र अचानक सिद्धू मुसेवालांच्या गाडीला एका एसयूव्ही आणि सेडान गाडीने ओव्हरटेक केला. या प्रत्येक गाडीमध्ये चार शसस्त्र हल्लेखोर होते. या दोन्ही गाड्यांमधून हल्लेखोर खाली उतरले आणि त्यांनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार करुन तिथून पळ काढला.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवाला यांच्यावर ३० गोळ्या झाडण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन एन-९४ रायफलच्या गोळ्या सापडल्याची माहितीही दिलीय.

Story img Loader