Sidhu Moose Wala Total Property Net Worth: पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवालांना मानसा जिल्ह्यातील मूळ गावी म्हणजेच मुसा येथे शेवटचा निरोप देण्यात आला. आज दुपारी मुसेवाला यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुसेवाला यांचे हजारो चाहते तसेच राजकीय, मनोरंजन क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. मुसेवाला यांच्या चाहत्यांनी अंत्यसंस्कारावेळी पंजाबमधील आप सरकारविरोधात घोषणाबाजी करत आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. मुलाला शेवटचा निरोप देताना मुसेवाला यांच्या आई-वडिलांना दु:ख अनावर झाले.

अंत्यसंस्काराला अनेकांची उपस्थिती…
मानसा जिल्ह्यातील आपल्या गावी जात असताना मुसेवाला यांच्यावर २९ मे रोजी गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात मुसेवाल यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर मुसेवाला यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच ३१ मे २०२२ रोजी मानसा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ मुसा या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. तसेच गायक गुरुदास मान, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग, आमदार सुखजिंदर रणधावा मुसेवाला यांना शेवटचा निरोप देण्यासाठी हजर होते.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

राजकारण तापलं अन् माहिती शोधणाऱ्यांचं प्रमाण वाढलं
मुसेवाला यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर या हत्याकांडावरुन पंजाबमधील राजाकरण तापलेलं असतानाच दुसरीकडे मुसेवाला यांच्यासंदर्भातील बरीचीशी माहिती सध्या सोशल मीडियावर शोधली जात आहे. यामध्ये प्रमुख्याने मुसेवाला यांच्याबद्दलची माहिती, गाणी आणि एकूण संपत्ती किती होती याबद्दल माहिती शोधणाऱ्यांची संख्या वाढलीय. याच पार्श्वभूमीवर मुसेवाला यांच्या नावावर नेमकी किती संपत्ती होती यावर टाकलेली नजर…

शिक्षण पूर्ण केलं कॅनडाला गेले…
शुपदीप सिंह सिद्धू असं त्यांचं खरं नाव होतं. वयाच्या २८ व्या वर्षी त्यांचा दुर्देवी अंत झाला. लुधियानामधील गुरु नानाक देव इंजीनियरिंग कॉलेमधून २०१६ साली आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ते कॅनडाला गेले. २०१७ च्या सुरुवातीला मुसेवाल यांनी आपलं पहिलं गाणं प्रदर्शित केलं. त्यानंतर अल्पवधीमध्येच त्यांना पंजाबी गाणी आणि रॅप साँग्सच्या दुनियेमध्ये पंजाबी गाण्यांचा चेहरा म्हणून ओळख मिळाली.

…अन् सहा पोलीसांची नोकरी गेली
मुसेवाला हे त्यांच्या संगीत क्षेत्रातील कामाबरोबरच वादामुळे कायमच चर्चेत राहिले. अनेकदा त्यांनी आपल्या गाण्यांमध्ये बंदुका वापरल्याने ते गन कल्चरला प्रोत्साहन देत असल्याचे आरोप करण्यात आले. याच संदर्भात मे २०२० मध्ये त्यांचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. यामध्ये एका व्हिडीओत मुसेवाला हे एके-४७ चं प्रशिक्षण घेताना दिसत असून सोबत पाच पोलीस कर्मचारीही या व्हिडीओत दिसून आले. अन्य एका व्हिडीओमध्ये मुसेवाला त्यांच्या खासगी पिस्तूल हवेत उंचावून दाखवताना दिसत आहेत. या घटनेनंतर २०२० साली १९ मे रोजी सहा पोलिसांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलेलं.

खलिस्तानी नेत्याचं समर्थन केल्याचा आरोप
याशिवाय या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुसेवाला यांच्याविरोधात शस्त्र बाळगल्याप्रकरणी आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला. त्यानंतर २०२० मध्ये त्यांना जमीन मंजूर झाला. याच कालावधीमध्ये मुसेवाला यांनी आपलं ‘संजू’ नावाचं गाण प्रदर्शित केलं. यामध्ये त्यांनी आपल्या नावावर एफआयआर दाखल झाला ही सन्मानाची गोष्ट असल्याचं म्हटलेलं. डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी ‘पंजाब’ नावाने एक गाणं प्रदर्शित केलं होतं. या गाण्यावरुनही बराच वाद झाला होता. या गाण्यामध्ये मुसेवाल यांनी खलिस्तानी फुटीरतावादी जनरल सिंह भिंडरावाले यांचं कौतुक केल्याचा आरोप करण्यात आलेला.

कोणकोणते गुन्हे दाखल आहेत?
निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार मुसेवालांविरोधात चार प्रकरणं न्यायालयात आहेत. यामधील दोन प्रकरणं आपत्तीजनक गाणं गाण्याची तर अन्य दोन लॉकडाउनच्या कालावधीमध्ये कर्फ्यूचे नियम मोडल्याची आहेत. हे सर्व गुन्हे मुसेवालांविरोधात २०२० मध्येच दाखल झाले होते. त्यांच्याविरोधात आयपीसी २९४ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणे), ५०४ (एखाद्या व्यक्तीला प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने त्याचा अपमान करणे), १४९ (बेकायदेशीररित्या एकत्र जमणे), १८८ (सरकारी कामामध्ये अडसर निर्माण करणे), ५०२ (मानहानिकारक संदेश, माहिती प्रसारित करणे), १२०-ब (गुन्हेगारी कटात सहभागी असणे) तसेच आपत्ती व्यवस्थापन २००५ अंतर्गत असणाऱ्या कलम ५१ नुसार गुन्हे दाखल आहेत.

आई आहे गावची सरपंच
मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह हे सेवानिवृत्त सरकारी अधिकारी आणि शेतकरी आहेत. तर आई चरण कौर या मूसा गावाच्या सरपंच आहेत. २०१८ साली त्या ६०० मतांनी सरपंच पदाची निवडणूक जिंकल्या होत्या.

२०२२ च्या निवडणुकीत पराभूत…
२०२२ मध्ये पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमधून त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. ते काँग्रेसच्या तिकीटावर मानसा येथून निवडणूक लढले होते. मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. येथून आम आदमी पार्टीचे उमेदवार विजय सिंगला हे ६३ हजार ३२३ मतांनी विजयी झाले.

एकूण संपत्ती किती?
मुसेवाला यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्याकडे ६ कोटी ३७ लाखांची जंगम मालमत्ता असल्याचं म्हटलंय. तर १ कोटी ५० लाखांची स्थावर मालमत्ता आपल्याकडे असल्याचंही मुसेवाला यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलं होतं.

५० लाखांची गुंतवणूक, २६ लाखांची गाडी…
मुसेवाला यांनी आयोगासमोर आपल्या संपत्तीसंदर्भात सविस्तर माहिती देताना बँकेत पाच कोटी नऊ लाख रुपये असल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे ५० लाखांहून अधिक रुपये आपण वेगवेगळ्या जागी गुंतवल्याचं मुसेवाला यांनी म्हटलेलं. त्याचप्रमाणे आपल्याकडे टोयोटा फॉर्चुनर असून तिची किंमत २६ लाख ४८ हजार रुपये इतकी असल्याचं या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेलं आहे. याप्रमाणे एक जुनी जीपही आपल्याकडे असून तिची किंमत ८३ हजार असल्याचं मुसावाला यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं.

५० लाखांचं कर्ज अन् १८ लाखांचे दागिने…
वेगवगेळ्या माध्यमातून आपण घेतलेल्या कर्जाची रक्कम ही ५० लाखांपर्यंत असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. त्याचप्रमाणे मुसेवाला यांनी आपल्याकडे १८ लाख ९२ हजार रुपयांचे दागिने असल्याचं निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीत म्हटलं होतं. आपल्याकडे एक पिस्तुलही असल्याचं त्यांनी या प्रतिज्ञापत्रात सांगितलेलं.

वाढत गेली कमाई…
मुसेवाला यांनी २०२०-२१ मध्ये भरलेल्या प्राप्तीकराच्या आकडेवारीनुसार त्यांची कमाई तीन कोटी २ लाख इतकी होती. २०१९-२० मध्ये हाच आकडा एक कोटी ७० लाख इतका होता. २०१८-१९ मध्ये त्यांची संपत्ती २५ लाख ३१ हजार तर २०१७-१८ मध्ये पाच लाख चार हजार रुपये इतकी होती.