Sierra Leone Kush Drug पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लियोन देशाने आणीबाणीची घोषणा केली आहे. या देशातील १८ ते २५ वर्षातील युवा पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे. देशातील परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, देशाला वाचवण्यासाठी सिएरा लियोन सरकारला आणीबाणी जाहीर करावी लागली आहे. लोकांना आजपर्यंत दाग-दागिने, पैसा, मौल्यवान वस्तूंची चोरी करताना आपण पाहिले असेल. परंतु, या देशात चक्क मानवी हाडांची चोरी केली जात आहे. लोक थडगे खोदून मानवी हाडांची चोरी करत आहेत. हा विचित्र प्रकार नक्की काय आहे? या देशातील लोक कोणत्या व्यसनाच्या आहारी गेलेत? देशात आणीबाणी का जाहीर करावी लागली? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

राष्ट्राध्यक्ष ज्युलियस माडा वोनी बायो यांनी त्यांच्या सरकारला कुश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वस्त आणि प्राणघातक मादक पदार्थांच्या वाढत्या वापरावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कुश हा अमली पदार्थ मानवी हाडापासून तयार होतो. देशभरात या अमली पदार्थामुळे हाहाकार माजला आहे. लोक थडगे खोदून त्यातील मानवी सांगाडे चोरी करत आहेत.

india exports contract 1 percent in december 2024
डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
PM Modi to youth: Step out of comfort zone to build Viksit Bharat by 2047
युवक देशाला २०४७पर्यंत विकसित करतील ; ‘विकसित भारत युवा नेता संवाद’ मध्ये पंतप्रधान मोदींचा विश्वास
security beefed up around z morh tunnel
‘झेड मोढ’ बोगद्याभोवती सुरक्षा व्यवस्थेत वाढ; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटनाची शक्यता
Loksatta editorial Copernicus Climate Change Service Report
अग्रलेख: विक्रमी आणि वेताळ
Efforts underway to reduce human-wildlife conflict says Vivek Khandekar
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू – खांडेकर
राष्ट्राध्यक्ष जूलियस माडा वोनी बायो यांनी त्यांच्या सरकारला मादक पदार्थांच्या वाढत्या वापरावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

कुश म्हणजे काय?

सिएरा लियोनमधील कुश हा एक अमली पदार्थ आहे. याला ‘Zombie Drug’देखील म्हणतात. संपूर्ण देश या अमली पदार्थाच्या आहारी जात आहे. हा अमली पदार्थ भांग, फेंटॅनिल, ट्रामाडोल, फॉर्मल्डिहाइडपासून तयार होतो; ज्यात मानवी हाडांचा चुरा टाकला जातो. ‘द कन्व्हर्सेशन’मधील एका अहवालानुसार, या अमली पदार्थांत हाडांचा चुरा टाकल्याचा कोणताही निश्चित पुरावा नाही; परंतु अनेकांच्या मते, हा पदार्थ अधिक मादक व्हावा यासाठी त्यात हाडांचा चुरा टाकला जात आहे. काही जणांच्या मते हाडांमध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असल्याने याचा वापर केला जात आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा या अमली पदार्थाचा वापर होत असल्याचे आढळून आले होते; ज्यानंतर अतिशय वेगाने याच्या आहारी जाणार्‍या लोकांची संख्या वाढली. या अमली पदार्थाच्या सहज उपलब्धतेमुळे आणि स्वस्त असल्याने अधिकाधिक लोक याच्या आहारी जात आहेत. बेरोजगार तरुणांमध्ये याचा जास्त वापर पाहायला मिळत आहे.

अनेकांनी गमावला जीव

तज्ज्ञांच्या मते, कुश हा अमली पदार्थ जीवनातील दैनंदिन तणावापासून सुटका करतो, परंतु त्याची किंमत मोजावी लागते. या पदार्थाचे सेवन करणारी व्यक्ती बाराचवेळ नशेत असते. वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, त्यांना अनेकदा डोक्यात झिणझिण्या आल्यासारखे वाटते आणि मान व सांधेदुखीचा त्रास होतो. दीर्घकाळ याचे सेवन केल्याने कुशच्या आहारी गेलेले अनेक जण आपली गरज पूर्ण करण्यासाठी चोरीचा अवलंब करतात. ते स्वच्छता सोडतात, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, त्यांना फोड येतात, अनेकांना पाय आणि खालच्या पायांना गंभीर सूज येते, असे निदर्शनास आले आहे. या अमली पदार्थाने यकृत, मूत्रपिंड आणि श्वासोच्छ्वासाच्या समस्यादेखील उद्भवतात, यामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

अमली पदार्थाची मागणी वाढल्याने स्मशानभूमीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

देशात कुशचा वापर किती सामान्य?

मार्केटमध्ये हा पदार्थ प्रचलित झाल्यापासून काही वर्षांत, संपूर्ण परिसर आणि समुदायांमध्ये याचा वापर होऊ लागला. फ्रीटाऊनमधील सिएरा लियोन सायकियाट्रिक टीचिंग हॉस्पिटल अलीकडच्या काही वर्षांत कुशचे व्यसन असणार्‍यांनी भरले आहे. “आम्ही २०२३ मध्ये कुश व्यसनींची जवळपास दोन हजार प्रकरणे रुग्णालयात नोंदवली आहेत. बरेच लोक घरात, तर काही रस्त्यावर मरत आहेत”, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुसू मटिया यांनी ‘टेलिग्राफ’ला सांगितले.

२०२० मध्ये रुग्णालयात ४७ व्यसनींची नोंद करण्यात आली होती. २०२२ मध्ये हा आकडा वाढून १,१०१ पर्यंत पोहोचला, असे त्यांनी सांगितले. बहुतेक रुग्ण १८ ते २५ वयोगटातील पुरुष असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याचे इतके आकर्षण का आहे? असा प्रश्न केला असता, एका वापरकर्त्याने सांगितले की, “हे तुम्हाला गोष्टी विसरायला लावते. आम्ही तणावाखाली आहोत, आमच्याकडे कोणतेही काम नाही”, असे त्याने सांगितले. इतर वापरकर्त्यांनीदेखील तेच सांगितले. डॉ. मटिया सांगतात, “कुशचे संकट सर्वत्र आहे.” या अमली पदार्थाचे डीलर्स म्हणाले की, कुश वापरकर्ते केवळ गरीब नाहीत. पोलिस अधिकारी आणि देशाचे काही श्रीमंत उच्चभ्रू लोकंही याचे सेवन करत आहेत.

हेही वाचा : ‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय

थडग्यातून मानवी हाडांची चोरी

देशात कुश या अमली पदार्थाची मागणी वाढल्याने स्मशानभूमीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागण्या पूर्ण करण्यासाठी व्यापारी हजारो थडगी फोडून मानवी हाडांची चोरी करत आहेत. अशा घटनांवर रोख लावण्यासाठी, व्यसनी व व्यापाऱ्यांना थडगे खोदण्यापासून रोखण्यासाठी स्मशानभूमीवर सैन्य तैनात करण्यात आले आहे. गेल्या गुरुवारी राष्ट्राध्यक्ष बायो म्हणाले, “आमच्या देशाला सध्या ड्रग्ज आणि मादक पदार्थांच्या विध्वंसक प्रभावाचा सामना करावा लागत आहे.” त्यांनी अधिकाऱ्यांना ड्रग्ज आणि मादक पदार्थांचा गैरवापर रोखण्यासाठी राष्ट्रीय टास्क फोर्स तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत.

Story img Loader