Significance of Vadnagar museum पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म गावी वडनगर येथे अत्याधुनिक वस्तुसंग्रहालय उभारण्यात आले आहे. आणि लवकरच या संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. या संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे या संग्रहालयातून प्रत्यक्ष पुरातत्त्वीय स्थळावर प्रवेश करता येणार आहे. त्याच निमित्ताने भारतीय पुरातत्त्वीय स्थळांवरील संग्रहालयांची दुर्दशा आणि वडनगर संग्रहालय कशा प्रकारे दिशादर्शक ठरणार आहे. त्याचा घेतलेला हा आढावा.

अधिक वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावाचा, ३५०० वर्षांचा इतिहास नेमके काय सांगतो ?

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!

भारताला हजारो वर्षांची प्राचीन संस्कृती आणि इतिहास आहे. ही संस्कृती भारताच्या समृद्ध भूतकाळाची साक्ष देते. या संस्कृतीचे पुरावे पुरातन वास्तु आणि स्थळांच्यारूपाने आजही अस्तित्त्वात आहेत. त्यामुळे या स्थळांचे योग्य ते जतन होणे गरजेचे आहे. या स्थळांवर सापडलेल्या पुरातन वस्तू या त्याच ठिकाणी उभारलेल्या वस्तुसंग्रहालयात जतन करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु सद्यस्थितीत या संग्रहालयांची अवस्था बिकट आहे. त्यामुळेच भारतातील पुरातत्त्व स्थळांवरील संग्रहालयांमध्ये मोठा बदल करण्याची गरज आहे. किंबहुना भारतातील हडप्पा संस्कृतीशी संबंधित अनेक स्थळांवर आजही संग्रहालये नाहीत. या संग्रहालयांमध्ये आवश्यक असणारे प्रशिक्षित मार्गदर्शक किंवा त्यांना शिक्षित करण्यासाठी लागणारी पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे या स्थळांवर विखुरलेले अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

म्युझियम ऑफ आर्ट, बेंगळुरूमध्ये नव्यानेच सुरू झालेली सायन्स गॅलरी यासारख्या भारतातील नाविन्यपूर्ण संग्रहालयांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या नव्याने निर्माण झालेल्या संग्रहालयांमध्ये पुरातन वस्तूंपासून ते आधुनिक शिक्षण यंत्रणेसाठी पोषक अशा व्यवस्था आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला पारंपरिक ऐतिहासिक- पुरातत्त्वीय स्थळांवरील संग्रहालये अनेक आव्हानांना तोंड देत आहेत. कालबाह्य पायाभूत सुविधा आणि अपुरे प्रशिक्षित कर्मचारी यांसारख्या समस्यांशी त्यांचा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे त्यांचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे आणि त्यांचे महत्त्व प्रस्थापित होणे आवश्यक आहे. सध्या पुरातत्त्व शास्त्राविषयी जागरुकता आणि स्वारस्य वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता एआय सारखे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याचा वापर संग्रहालयांमध्ये केल्यास फायद्याचे ठरणारे आहे.

साइट म्युझियमची संकल्पना

पुरातत्त्व स्थळांवरील संग्रहालयात उत्खननादरम्यान सापडलेल्या कलाकृती आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात. पुरातत्त्वीय स्थळांच्याच ठिकाणी बांधलेली ही संग्रहालये पर्यटकांना उत्खनन प्रक्रियेबद्दल शिक्षित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. साइट म्युझियमची संकल्पना साइटवरील स्टोअर रूम्समधून निर्माण झाली आहे. यामुळे कलाकृती, वास्तुशिल्प त्याच्या मूळ जागेवरून न हलवता त्यांचे संवर्धन, जतन आणि अभ्यास करता येतो.

परंतु कालौघात साइट संग्रहालयाची कल्पना दुर्लक्षित राहिली. हरियाणाच्या हिस्सार जिल्ह्यातील राखीगढ़ी, फतेहाबाद जिल्ह्यातील भिराना आणि बनावली यासारख्या अनेक हडप्पाकालीन स्थळांवर आजही संग्रहालये नाहीत. या ठिकाणी , पर्यटकांना माहिती देण्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शकही मिळत नाहीत. त्यामुळे पर्यटक यांसारख्या स्थळांकडे पाठ फिरवतात. परिणामी भारताला मोठा सांस्कृतिक वारसा असूनही त्याच्या अनुषंगाने निर्माण होणारा रोजगार , प्राचीन स्थळांचा विकास यांकडे दुर्लक्ष होते. केवळ पुरातत्त्व स्थळांवर संग्रहालये निर्माण करणे पुरेसे नाही, त्यांची देखभाल करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गुजरातमधील लोथल आणि धोलाविरा यांसारख्या ठिकाणी असलेल्या संग्रहालयांमधील अपुऱ्या पायाभूत सुविधा, मर्यादित कर्मचारी ही चिंतेची कारणे आहेत.

अधिक वाचा: विश्लेषण: मोढेरा, मोडी आणि मोदी! काय आहे मोदी नावाचा इतिहास?

उद्योग, नवोपक्रम आणि पायाभूत सुविधा

इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ म्युझियम्सच्या मते या वर्षाचा अजेंडा किंवा उद्दिष्ट, लवचिक पायाभूत सुविधा निर्माण करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देणे आणि अखेरीस संग्रहालय क्षेत्रातील नवकल्पना वाढवणे हा आहे. कारण प्रत्येक पुरातत्त्व स्थळाकडे सांगण्यासाठी स्वतःची एक कथा असते. त्याच पार्श्वभूमीवर गुजरातमधील प्रस्तावित वडनगर पुरातत्त्व संग्रहालय यादृष्टीने महत्त्वाचे ठरणार असल्याचे मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म गावी हे अत्याधुनिक संग्रहालय उभारण्यात आले आहे. आणि लवकरच या संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे.
सर्वांचे डोळे वडनगर पुरातत्त्व संग्रहालयाकडे लागलेले आहेत. इथे लोकांना पुरातत्त्व स्थळाचा अनुभव घेता येणार आहे. हे संग्रहालय पुरातत्त्व स्थळ आणि लोकांमधील दरी दूर करू शकते. त्याच्या निर्मितीचे श्रेय केवळ पुरातत्त्वशास्त्रज्ञांनाच नाही, तर डिझाइनर, प्रशासक आणि इतर भागधारकांनाही जाते. हे संग्रहालय लवकरच सुरू होणार आहे, राखीगढी सारख्या ठिकाणी अशाच प्रकारच्या उपक्रमांची आशा करता येईल.


वडनगर पुरातत्त्व अनुभव संग्रहालय १३,५०० चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्रावर विकसित केले गेले आहे. वडनगरमध्ये ज्या ठिकाणी उत्खनन केले, त्याच स्थळाच्या अगदी शेजारी हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक पंकज शर्मा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की हे संग्रहालय ९ गॅलरींमध्ये विभागले गेले आहे. उत्खननादरम्यान जितके कालखंड उघड झाले, त्या सर्व कालखंडांचे चित्रण या संग्रहालयात करण्यात येणार आहे. जुन्या जलव्यवस्थापन प्रणालीसारखे पैलू तसेच भूकंपासारखी आपत्ती असतानाही लोक तेथे २ ,७०० वर्षे का राहिले,याची माहिती त्यात असेल. येथील स्थानिक हस्तकला अमूर्त आणि मूर्त वारसा दर्शवेल. तसेच वडनगर हे शहर म्हणून एका गॅलरीत दाखवले जाईल. भविष्यकालीन शहराची प्रतिकृति दाखवणारी गॅलरी देखील नियोजित केली आहे.

अधिक वाचा: स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?

केंद्र आणि गुजरात सरकारच्या सहकार्याने हा प्रकल्प गेल्या नोव्हेंबरमध्ये सुरू झाला होता. या संग्रहालयात दोन घटकांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात आलेले आहे. एक दृश्यमान उत्खनन केलेले पुरातत्त्व अवशेष आणि दुसरे कला आणि हस्तकला, ​​संस्कृती, वास्तुकला आणि शहर नियोजनाचे विविध पैलू यांचा समावेश त्यात आहे.
उत्खननादरम्यान राज्य पुरातत्त्व विभाग आणि ASI ला अनेक पुरातन वस्तू सापडल्या. त्यात मातीची भांडी, टेराकोटा कलाकृतींचा समावेश आहे. त्यापैकी सुमारे १५ -२० टक्के वस्तू प्रदर्शनात असतील तर उर्वरित संशोधनासाठी वापरल्या जातील. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गांधीनगरसह अनेक विद्यापीठे वडनगरच्या जुन्या जलव्यवस्थापन प्रणालीवर संशोधन करत आहेत, उत्खननादरम्यान सापडलेली मातीची भांडी, धातू आणि काचेच्या मण्यांवर बनारस हिंदू विद्यापीठ अभ्यास करत आहे असे शर्मा म्हणाले.

१९५३ ते १९५४ या दरम्यान वडनगरमध्ये प्रथमच उत्खनन करण्यात आले. ४० वर्षांनंतर, राज्य पुरातत्त्व संचालनालय आणि संग्रहालयाने २००६ ते २०१२ दरम्यान पुन्हा उत्खनन हाती घेतले. या उत्खननामध्ये वडनगरमध्ये प्राचीन बौद्ध वस्ती शोधणे हा उद्देश होता. २०१४ साली एएसआयने वडनगरमध्ये उत्खनन हाती घेतले होते. २०१६-१७ ते २०२२ पर्यंत, वडनगर येथे प्रायोगिक संग्रहालय उभारण्यासाठी मदत मिळवण्यासाठी घासकोल, दरबारगड आणि बडी गरबानो शेरी भागात उत्खनन करण्यात आले.