Islamophobia in China गेल्या पाच वर्षांपासून चीनमध्ये सिनिफिकेशन म्हणजेच चिनीकरण सुरू आहे. अलीकडेच शादियानच्या ग्रँड मशिदीच्या रचनेत बदल झाल्यानंतर चीनने सुरु केलेल्या सिनिफिकेशन मोहिमेची सांगता झाली, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Sinification of Islam

२०१८ साली चिनी सरकारने “Sinification of Islam” ही पंचवार्षिक योजना जाहीर केली होती. विदेशी स्थापत्य शैलींना विरोध करणे आणि इस्लामी वास्तुकला चिनी स्थापत्य वैशिष्ट्यांनी परिपूर्ण करणे म्हणजेच स्थापत्याचेही चिनीकरण करणे, हा या योजनेचा एक भाग होता. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या मेमोमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांना या तत्त्वाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. Sinicization, sinofication, sinification, or sinonization ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे गैर चिनी समुदायांचे (प्रामुख्याने मुस्लिमांचे) हान संस्कृतीत परिवर्तन केले जाते. हान चायनीज किंवा हान लोक हे पूर्व आशियाई वांशिक गटातील आहेत. त्यांना मूळ चिनी मानले जाते.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
sambhal and jaunpur mosque row
Mosque Row in UP: मशिदीच्या जागेवर हिंदूंचे दावे; २०२७ त्या उत्तर प्रदेश विधासनभा निवडणुकांची तयारी?
kalyan session and district court verdict on mandir masjid issue at durgadi fort
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला शासनाच्या मालकीचा; न्यायालयाने मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळला
nepal prime minister kp oli visit china importance in perspective on Belt and Road
पंतप्रधानपद पणाला लावून चीनशी सहकार्य!

अधिक वाचा: विश्लेषण: चीनमध्ये इस्लामची तुलना संसर्गजन्य रोगाशी ; इस्लामी देश गप्प का?

शादियान मशीद हान चायनीज शैलीत

अरब स्थापत्य शैलीची वैशिष्टये असलेल्या शेवटच्या मशिदीच्या रचनेत आता आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. सध्या या मशिदीच्या डोक्यावर घुमट नाही. मशिदीचे अरबी रचनेतील मिनारही ओळखू येत नाहीत. देशातील मुस्लीम स्थळांचे चिनीकरण करण्याच्या मोहिमेचा हा एक भाग मनाला जातो. शादियान ही चीन मधील सर्वात मोठी मशीद आहे. ही मशीद युनान प्रांतात ज्या ठिकाणी उभी आहे, त्याच ठिकाणच्या नावाने ओळखली जाते. या मशिदीची रचना साधारण ताजमहालासारखी होती. मशिदीच्या माथ्यावर हिरव्या रंगात मुख्य आणि चारही बाजूला लहान घुमट अशी वैशिष्ट्य पूर्ण रचना होती. मशिदीच्या सभोवताली चार इस्लामिक शैलीतील मिनार होते. २०२२ साली घेतलेल्या उपग्रहीय प्रतिमांमध्ये अशाच स्वरूपाची रचना दिसते. तर या वर्षी घेतल्या गेलेल्या उपग्रहीय छायाचित्रांमध्ये घुमट नाहीसा झालेला आहे. हान चायनीज शैलीतील पॅगोडा रूफटॉपने पारंपरिक घुमटाची जागा घेतली आहे आणि मिनार आकाराने लहान झाले आहेत. मशिदीच्या समोरच्या टेरेसवर एकेकाळी चिन्हांकित केलेल्या चंद्रकोर आणि तारेच्या टाइल्सचा फक्त एक अस्पष्ट ठसा दिसतो. युनानमधली दुसरी महत्त्वाची मशीद नाजियाइंग शादियानपासून १०० मैलांपेक्षा कमी अंतरावर आहे. या मशिदीचेही नुकतेच नूतनीकरण झाले आहे. या मशिदीचीही इस्लामिक वैशिष्ट्ये काढून टाकण्यात आली आहेत.

सिनिफिकेशन मोहिमेचे यश

कॉर्नेल युनिव्हर्सिटीचे मानववंशशास्त्रज्ञ रुस्लान युसुपोव्ह फील्डवर्कसाठी शादियनमध्ये दोन वर्षे होते. त्यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले की “या दोन महत्त्वाच्या मशिदींचे सिनिफिकेशन चीनच्या सरकारी मोहिमेचे यश दर्शवते. खेड्यापाड्यात अरबी शैलीच्या छोट्या मशिदी उरल्या असल्या तरी स्थानिक समुदायांना त्यांचे सिनिफिकेशन रोखणे कठीण होईल.” तर चीनमधील प्लायमाउथ विद्यापीठातील इस्लामचे इतिहासकार हन्ना थेकर यांनी सांगितले की, मशीद सिनिफिकेशन मोहिमेने प्रांतापरत्त्वे प्रगती केली आहे. युनान, बीजिंगपासून सर्वात दूर असलेल्या प्रांतांपैकी एक आहे, आणि हा या मोहिमेतील शेवटचा प्रांत शिल्लक होता. न्यूयॉर्कमधील चिनी हुई कार्यकर्त्या मा जू यांनी सांगितले की, नूतनीकरण हे “तुमचा धर्म आणि तुमची वांशिकता नष्ट करण्याचा स्पष्ट संदेश आहे”.
शादियनची भव्य मशीद ही मिंग राजवंशाच्या काळात प्रथम बांधली गेली. कल्चरल रिव्होल्यूशन’ दरम्यान मूळ शादियन मशीद नष्ट झाली होती. त्यावेळी पीपल्स लिबरेशन आर्मीने या भागातील हुई मुस्लिमांचा उठाव दडपला होता. उठवात १,००० हून अधिक लोक मारले गेल्याचा अंदाज आहे. नंतरच्या कालखंडात ग्रँड मशिदीची पुनर्बांधणी करण्यात आली आणि सरकारी सहाय्याने तिचा विस्तार करण्यात आला. मशिदीची रचना सौदी अरेबियातील मदिना येथील पैगंबर मशिदीवर आधारित होती. शादियन मशिदीत तीन प्रार्थना हॉल आहेत आणि १०,००० उपासकांची क्षमता आहे. हुई हे चिनी मुस्लिम वांशिक अल्पसंख्याक आहेत, त्यापैकी बहुतेक पश्चिम चीनमध्ये राहतात. २०२० च्या जनगणनेनुसार ११ दशलक्षाहून अधिक हुई लोक आहेत.

अधिक वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावाचा, ३५०० वर्षांचा इतिहास नेमके काय सांगतो ?

चीन सरकारची चिनी मुस्लिमांमध्ये भीती

मशिदींच्या पुनर्विकासाला विरोध करणारा एक हुई मुस्लिम म्हणाला, “शादियन मशीद फक्त शादियानमध्येच नाही तर सर्व मुस्लिमांसाठी खूप महत्त्वाची आहे. अशा स्वरूपाचा विकास हे खूप मोठे नुकसान आहे. “आम्हाला फक्त आमची शेवटची प्रतिष्ठा जपायची होती, कारण शादियान आणि नाजियायिंग वगळता देशातील प्रत्येक मशिदीची पुनर्बांधणी करण्यात आली आहे,” त्या व्यक्तीने सांगितले, त्याने चीन सोडले आहे. किंबहुना भीतीमुळे त्याने आपले नाव गुप्त ठेवण्यास सांगितले आहे. ग्रँड मशिदीच्या पुनर्बांधणीत इमारतीच्या पुढील बाजूस सोन्याचा मुलामा असलेल्या अरबी लिखाणाखाली चिनी मजकूर कोरण्यात आलेला आहे. जो पूर्वी तिथे नव्हता.

चिनी सरकार, उइघर आणि हूई

२०१४ साली, चिनी सरकारने मुख्यतः शिनजियांगच्या उत्तर-पश्चिम भागात राहणाऱ्या उइघर/उइगर लोकांविरुद्ध मोहीम सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत जाचक नियमावली अंमलात आणली गेली. ज्यात कुराण बाळगणे किंवा इस्लामिक पद्धतीने धर्माचरण करणे निषिद्ध मानले गेले. या मोहिमेमुळे अखेरीस सुमारे एक दशलक्ष उईघुर आणि इतर अल्पसंख्याकांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ‘फायनान्शिअल टाईम्स’ने गेल्या वर्षी प्रकाशित केलेल्या विश्लेषणात असे आढळून आले की, २०१८ पासून चीनमधील २,३०० मशिदींपैकी तीन चतुर्थांश मशिदीची चिनी पद्धतीने पुनर्बांधणी किंवा नष्ट करण्यात आल्या. उइघर/उइगर लोकांच्या तुलनेत चिनी सरकार हूई समुदायांना जाचक वागणूक देत नाही. कारण त्यांना हूई फुटीरतावादाची चिंता नाही. परंतु मशिदींमध्ये बदल करण्याच्या किंवा नष्ट करण्याच्या योजनांवरून अधूनमधून त्यांच्यात संघर्ष सुरू आहे. गेल्या वर्षी नियोजित नूतनीकरणावरून शेकडो पोलिसांची नजियायिंग मशिदीत आंदोलकांशी झटापट झाली. निषेध शेवटी दडपला गेला आणि नूतनीकरण पुढे गेले.

अधिक वाचा: स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?

शरणागती

गेल्या वर्षांपासून चीन सरकारचा निषेध करणे शादियानमधील मुस्लिमांनी थांबवले आहे. २०२१ साली चीन सोडून गेलेल्या शादियन मशिदीच्या एका माजी कर्मचाऱ्याने सांगितले, “शादियन लोकांना हे समजले की, सरकारकडे सर्व काही नियंत्रित करण्याची खूप शक्ती आहे.” “परंतु सरकारने त्यांना मशीद बदलण्यास भाग पाडल्याने लोक खूश नाहीत. माझ्या बहुतेक मित्रांनी शादियान सोडले आहे. ते म्हणाले आम्ही असे जगू शकत नाही.” एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा ईदच्या निमित्ताने शादियान मशीद खुली करण्यात आली. एक महत्त्वाचे म्हणजे मशिदीच्या आतल्या बाजूला अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच अजानच्या भोंग्यांवर बंदी घातली आहे. त्याजागी घरोघरी वायरलेस स्पीकर वितरित केले गेले आहेत, ज्यामुळे प्रार्थना ऐकू येईल. चीनची मशीद सिनिकायझेशन योजना आता मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याचे मानले जात आहे. या फेब्रुवारीमध्ये बीजिंगने धार्मिक अभिव्यक्तीवरील नियम अधिक कडक केले आहेत. १८ वर्षांखालील मुलांना मशिदींमध्ये जाण्यास बंदी घातली आहे आणि नाजियायिंगमध्ये अल्पवयीन मुलांना उपवास करण्यास बंदी आहे. त्यामुळे एकुणातच या सर्वाकडे चिनी सरकारचे यश म्हणून पहिले जात आहे.

Story img Loader