अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ५० राज्ये आणि राजधानी वॉशिंग्टन वसलेला डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया (वॉशिंग्टन डी. सी.) यांमधील मतदार अध्यक्षांची निवड करतील. प्रत्येक राज्याचा अध्यक्षीय निवडणुकीचा कोटा ठरलेला असतो. बहुतेक राज्यांमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांचे पारंपरिक मतदार आहेत. पक्षीय विभागणी बऱ्यापैकी स्पष्ट असते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये काही राज्यांनी नेहमीपेक्षा वेगळा कल दिला. हीच राज्ये निर्णायक ठरतात. त्यामुळे त्यांना ‘स्विंग स्टेट्स’ किंवा ‘बॅटलग्राउंड स्टेट्स’ असे म्हटले जाते. 

निवडणूक कशी होते?

५० राज्ये आणि वॉशिंग्टन डी. सी.मधील मतदार अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठी मतदान करतात. पण ही निवड थेट नसते. प्रत्येक राज्यात दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी किंवा इलेक्टर असतात. त्यांची संख्या ठरलेली असते. कॅलिफोर्निया राज्यात सर्वाधिक ५४ इलेक्टर आहेत. त्याखालोखाल टेक्सास राज्यात ४० इलेक्टर आहेत. एकूण ५३८ प्रातिनिधिक किंवा इलेक्टोरल मते असतात. यात २७० मते मिळवणारा उमेदवार विजयी घोषित होतो. दोन्ही उमेदवारांना २६९ मते मिळाली, तर अमेरिकी काँग्रेसच्या प्रतिनिधिगृहातील विद्यमान संख्याबळानुसार अधिक जागा असलेल्या पक्षाचा उमेदवार विजयी ठरतो. ज्या राज्यात एखाद्या उमेदवाराला सर्वाधिक लोकप्रिय मते मिळतात, त्या राज्यातील सर्वच्या सर्व प्रातिनिधिक किंवा इलेक्टोरल मते त्या उमेदवाराला बहाल होतात. या पद्धतीला ‘विनर टेक्स ऑल’ असे संबोधले जाते. त्यामुळे एखाद्या निवडणुकीत एका उमेदवाराला संपूर्ण अमेरिकेत मिळून लोकप्रिय मते अधिक मिळाली, तरी तो जिंकेलच असे नाही. कारण इलेक्टोरल मतांवर अध्यक्ष ठरतो. २०१६मधील निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा लोकप्रिय मते कमी मिळाली. पण अधिक प्रातिनिधिक मतांच्या जोरावर ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. 

US elections are held on the first Tuesday in November
विश्लेषण : अमेरिकेत मतदानासाठी केवळ ‘नोव्हेंबरचा पहिला मंगळवार’ हाच दिवस का? कारण व्यावहारिक की धार्मिक?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Diwali padwa 2021
साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे बलिप्रतिपदा: जाणून घ्या महत्त्व,कथा आणि शुभ मुहूर्त
us presidential election
ट्रम्प यांच्या रॅलीतून वांशिक टिप्पणी, हॅरिस समर्थकांकडून निषेध; अध्यक्षपद निवडणूक अखेरच्या टप्प्यात
Jammu kashmir Article 370
Jammu kashmir Article 370 : जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर; भाजपा आमदारांचा सभागृहात गदारोळ
Aishwarya Rai Bachchan follows only one person on instagram
ऐश्वर्या राय बच्चनचे इन्स्टाग्रामवर १४.३ मिलियन फॉलोअर्स, ती फक्त ‘या’ एकाच व्यक्तीला करते फॉलो
How is the President of the United States elected Why is voting indirect
अमेरिकेचे अध्यक्ष कसे निवडले जातात? मतदान अप्रत्यक्ष का असते? समसमान मते मिळाल्यास काय? 

हेही वाचा >>>विश्लेषण: आसाममधील बांगलादेशींबाबतच्या निकालाने काय फरक पडणार?

नेब्रास्का, मेन राज्यांचा अपवाद

अमेरिकेतील ४८ राज्ये आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियामध्ये प्रातिनिधिक मतांचा विचार होतो. पण नेब्रास्का आणि मेन ही दोन राज्ये यास अपवाद आहेत. तेथे मात्र प्रत्येक जिल्ह्यातून लोकप्रिय मते अधिक मिळवणाऱ्या उमेदवारास त्या जिल्ह्याचे प्रातिनिधिक मत मिळते. गत निवडणुकीत नेब्रास्कातील ५ पैकी १ मत जो बायडेन यांना, तर उरलेली ४ ट्रम्प यांना मिळाली. याउलट मेन राज्यात बायडेन यांना ४ पैकी ३ प्रातिनिधिक मते मिळाली, तर चौथे प्रातिनिधिक मत ट्रम्प यांना मिळाले. 

अध्यक्ष निवडीवर शिक्कामोर्तब…

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी मुख्य मतदान होते. पण त्याआधीपासूनच अनेक राज्यांमध्ये टपालाद्वारे मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली असते. अमेरिकेचे जगभरात वास्तव्यास असलेले मुत्सद्दी, राजनैतिक कर्मचारी, सैनिक आणि सामान्य नागरिक टपालाद्वारे मतदान करतात. मुख्य मतदानाच्या रात्रीच अनेकदा वाहिन्या आणि वृत्तसंस्थांच्या पाहणीतून मतदानाचा कल स्पष्ट होतो. त्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी उमेदवार विजयी ठरल्याचे स्पष्ट झाले तरी अध्यक्ष म्हणून निवडून येण्याची औपचारिकता बाकी असते. डिसेंबरच्या मध्यावर विजयी पक्षाचे प्रतिनिधी किंवा इलेक्टर अध्यक्षपदाच्या उमेदवारास कौल देऊन तो विजयी झाल्याचे जाहीर करतात. या निवडीस जानेवारीमध्ये अमेरिकी काँग्रेसची मान्यता मिळते. जानेवारीमध्येच नवीन अध्यक्षांचा शपथविधी होतो. 

सहा राज्ये निर्णायक…

अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाची पारंपरिक समर्थक राज्ये आहेत. कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क ही राज्ये नेहमी डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करतात. तर टेक्सास सदैव रिपब्लिकनांच्या पाठीशी उभे राहते. या गणितानुसार डमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांना २२६ इलोक्टोरल आणि ट्रम्प यांना २१९ इलेक्टोरल मते मिळतील हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे हॅरिस यांना ४४ आणि ट्रम्प यांना ५१ मतांची गरज आहे. यासाठी पेनसिल्वेनिया (१९), व्हिस्कॉन्सिन (१०), मिशिगन (१५), जॉर्जिया (१६), नॉर्थ कॅरोलिना (१६), अॅरिझोना (११) आणि नेवाडा (६) ही ९३ मते निर्णायक ठरणार आहेत. ही राज्ये स्विंग स्टेट किंवा बॅटलग्राउंड स्टेट म्हणून ओळखली जातात. कारण ती कोणत्याही उमेदवाराकडे फिरू शकतात. या बहुतेक राज्यांनी गेल्या अनेक निवडणुकांमध्ये बदलता आणि संमिश्र कौल देऊन स्विंग स्टेट म्हणून ओळख निर्माण केली आहे. गेल्या खेपेस बायडेन यांनी पेनसिल्वेनिया, व्हिस्कॉन्सिन, मिशिगन, जॉर्जिया, अॅरिझोना ही राज्य खेचून आणली आणि निवडणूक जिंकली. 

हेही वाचा >>>अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केवळ आठ वर्षे सत्तेवर का राहू शकतात? काय आहेत नियम?

सर्वाधिक चुरशीची निवडणूक?

कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील ही निवडणूक अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक चुरशीची निवडणूक मानली जात आहे. निवडणुकीस अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना, दोन्ही उमेदवारांची जिंकून येण्याची शक्यता जवळपास सारखी आहे. स्विंग स्टेट्सचा कलही दिवसागणिक बदलताना दिसत आहे. तसेच, बालेकिल्ला गणल्या जाणाऱ्या काही राज्यांमध्ये पारंपरिक मतदार नाराज झाल्याचा फटका दोन्ही उमेदवारांना बसलेला दिसत आहे.