सध्या जगभरात गुलामगिरीविषयी वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा सुरु आहे. इतिहासातील गुलामगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या भूमिकेबद्दल जगप्रसिद्ध येल विद्यापीठाने अलीकडेच माफीही मागितली. गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या युरोपियन देशांच्या प्रमुखांनी गुलामगिरी संदर्भातील भूमिकेसाठी माफी मागितल्याचे प्रसिद्ध आहे. गुलामगिरी संदर्भात पूर्वजांपासून घेण्यात आलेल्या प्रोत्साहनपर भूमिकेसाठी किंग चार्ल्स यांच्याकडे अलीकडेच कॅरेबियन राष्ट्रांकडून माफीची मागणीही करण्यात आली आणि त्यासाठी मोठे आंदोलनही झाले. याच पार्श्वभूमीवर भारतीय इतिहासातील एका गुलामाच्या पराक्रमाचा इतिहास जाणून घेणे रंजक ठरावे.

मलिक अंबर इसवी सन १६१०-२० (सौजन्य: विकिपीडिया)

View Post

salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
ajay devgan and aamir khan
‘इश्क’च्या शूटिंगवेळी चिपांझीने केलेला हल्ला; ‘वाचवा, वाचवा’ म्हणत आमिर खान ओरडला अन् अजय देवगणने धावत्या कारमधून…

अधिक वाचा: भारत आणि पाकिस्तानात अकबर आणि औरंगजेब यांच्या परस्परविरोधी प्रतिमा का आढळतात?

मध्ययुगीन कालखंड आणि दख्खन

मध्ययुगीन भारतातील राजकारणात मुघल साम्राज्याने आपली पकड मजबूत केली होती. भारताच्या बहुतांश भागावर मुघलांचे साम्राज्य पसरले होते. परंतु त्यांना खरी लढत मिळाली ती दख्खनमधून. या प्रदेशातील सक्षम स्वदेशी शासकांच्या बरोबरीनेच, येथे स्थायिक झालेल्या परकीयांनीही मुघलांना सळो की पळो करून सोडले होते. याच परकीयांच्या यादीतील एक नाव म्हणजे मलिक अंबर. मलिक अंबर हा मुघलांचा कट्टर विरोधक होता. त्याने आपल्या मित्राला लिहिलेल्या एका पत्रात ‘माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी मुघलांशी लढत राहीन’ असे नमूद केले होते. विशेष म्हणजे मुघलांच्या विरुद्ध उभा राहणारा हा सुलतान काही वर्षांपूर्वीच गुलाम म्हणून भारतात आला होता.

मुघल सम्राट जहांगीर मलिक अंबरच्या शिरावर बाण मारत आहे. चित्रकार: अबुल हसन, १६१६
(सौजन्य: विकिमीडिया कॉमन्स)

चापूची खरेदी-विक्री

मलिक अंबरचा जन्म १५४८ साली इथिओपियात झाला. त्याच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याचे मूळ इथोओपियाच्या ओरोमो जमातीत असल्याचे मानले जाते. त्याचे मूळ नाव ‘चापू’ होते. मलिक अंबर याची गुलाम म्हणून इथिओपिया आणि भारत दरम्यान अनेक वेळा खरेदी- विक्री झाली होती. इतिहासकारांच्या मते तो युद्धात पकडला गेल्याने त्याला गुलाम म्हणून विकण्यात आले होते. इतिहासकार रिचर्ड एम इटन यांनी त्यांच्या ‘अ सोशिअल हिस्ट्री ऑफ द डेक्कन, १३००-१७६१: एट इंडियन लाइव्ह्स’, २००५ या पुस्तकात चापूची विक्री मोचा या लाल समुद्रातील बंदरावर ८० डच गिल्ड्झसाठी झाली होती, असे नमूद केले आहे. तिथून त्याला बगदादला घेऊन जाण्यात आले, तिथे एका व्यापाऱ्याने त्याची हुशारी पाहून त्याची खरेदी केली, त्याला शिक्षण दिले. तसेच त्याचे मुस्लीम धर्मात परिवर्तन करून अंबर असे नाव ठेवले, असे इटन यांनी नमूद केले आहे. सरतेशेवटी त्याची खरेदी अहमदनगरच्या चंगीझ खान नावाच्या वजिराने केली.

अधिक वाचा: टिपूची तलवार आणि त्याचा वादग्रस्त इतिहास !

सैन्यात गुलामांची भरती

चंगीझ खान याच्यासोबत काम करताना चापू याने प्रशासन आणि लष्करी बाबींतील अनेक बारकावे शिकून घेतले. १६ व्या शतकात दख्खन सल्तनत हबशींना गुलाम म्हणून सैन्यात भरती करत असे, त्यामुळे या भागात अनेक हबशींचा वावर होता. चंगीझ खान याच्या मृत्यूनंतर इथिओपियातील हा गुलाम मुक्त झाला. डॉ.राधेश्याम यांनी त्यांच्या “लाइफ अॅण्ड टाइम्स ऑफ मलिक अंबर” या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे , ‘या कालखंडात मलिक अंबरने नाममात्र वेतनावर छोटी-मोठी कामे केली.’ याच दरम्यान मलिक अंबरचे अहमदनगरमध्ये प्रभुत्त्व वाढले, त्याने सक्षम सैन्य उभारले. या सैन्यात बाहेरून दख्खनमध्ये आलेल्या गुलामांचीही भरती केली. याच काळात अहमदनगरमधील अंतर्गत संघर्षामुळे मुघलांनी हल्ला केला आणि अहमदनगरचा किल्ला ताब्यात घेतला.

विजयी मलिक अंबर

मलिक अंबरसाठी ही महत्त्वाची घटना होती. १६०१ मध्ये अहमदनगरचा सुलतान मरण पावला, त्यावेळेस मलिक अंबर याने मुर्तझा निजामशाहला गादीवर बसवले होते. मलिक अंबरने चंगीझ खानसोबत असताना आधीच शाही दरबारातील राजकारण शिकून घेतले होते. परिणामी, मुर्तझा शाह सिंहासनावर बसला तरी पंतप्रधान म्हणून मलिक अंबरनेच पडद्याआडून राज्य केले. याशिवाय, या राजघराण्याशी आपले संबंध दृढ करण्यासाठी त्याने आपल्या मुलीचा विवाह मुर्तझा शाह याच्याशी केला. जहांगीरच्या दरबारातील मुख्य चित्रकार अबुल हसन याने चितारलेल्या एका चित्रात जहांगीरचा बाण एका हबशी गुलामाचे शीर छिन्नविच्छिन्न करत आहे. हे चित्र १६२० मध्ये तयार करण्यात आले असा इतिहासकारांचा कयास आहे. या चित्रातून जहांगीरला त्या गुलामाविषयी असणारा राग प्रकट होतो. हे चित्र मलिक अंबरचे आहे. याच चित्राच्या माध्यमातून मलिक अंबर आणि मुघलांचे शत्रुत्त्व प्रकट होते. मनू एस पिल्लई यांनी आपल्या ‘रिबेल सुलतान्स: द डेक्कन फ्रॉम खिलजी टू शिवाजी’ या पुस्तकात मलिक अंबर विरुद्ध मुघल अशा लढायांचे सविस्तर वर्णन केले आहे. १६१० पर्यन्त मलिक अंबरकडे १०,००० हबशी आणि ४०,००० दख्खनी सैनिक होते. याच सैन्याच्या जोरावर त्याने दरवेळी मुघलांवर मात केली होती. विशेष म्हणजे जहांगीरचा त्याने अनेक वेळा पराभव केला होता.

खुल्दाबाद, महाराष्ट्रातील मलिक अंबरची समाधी (सौजन्य: विकिमीडिया कॉमन्स)

अधिक वाचा: औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्याबाई होळकर !

पराभूताचा सामना

परंतु १६१७ साली अंबरला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मुघल आणि विजापूरच्या संयुक्त सैन्याने मलिकविरुद्ध युद्ध पुकारले. यामुळे अनेक महिने अंबरला गनिमी काव्याने शत्रूच्या सैन्याला पायबंद घालावा लागला होता. विजापूरकरांकडून झालेल्या फसवणुकीमुळे याच्यावर ही वेळ आल्याचे इतिहासकार नमूद करतात. १६२४ साली पुन्हा एकदा मुघल सैन्य आणि मलिक अंबर एकमेकांसमोर आले. मुघलांच्या तुलनेने मलिक अंबरचे सैन्य कमी होते, तरीही मलिक अंबरने माघार घेतली नाही. गनिमी काव्याचा वापर करून तलावाचे पाणी वाटेवर सोडले आणि वाट दलदलीमध्ये रूपांतरीत केली. यामुळे मोगलांचे प्रचंड सैन्य या ठिकाणी पोहोचल्यावर दलदलीत अडकले. याच परिस्थितीचा फायदा घेत मलिक अंबरच्या मराठा सैनिकांनी मुघलांवर हल्ला केला, त्यात मुघलांचे मोठे नुकसान झाले आणि या युद्धात मलिक अंबर विजयी झाला. तो जिवंत असेपर्यंत मुघलांना दख्खनमध्ये प्रवेश करण्यात कधीच यश आले नाही. १६२६ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी मलिक अंबरचा मृत्यू झाला.

एकूणच मलिक अंबरचा प्रवास हा गुलागिरीचे पाश झुगारून स्व-बळावर उन्नती साधणाऱ्या योध्याची कथा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.