Israel used Smart bomb in Beirut: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लेबनॉनमधील बैरूत शहरातील एका इमारतीवर मंगळवारी (२२ ऑक्टोबर) इस्रायलने बॉम्ब टाकल्यानंतर ती काही मिनिटांत जमीनदोस्त झाली. असोसिएटेड प्रेसच्या एका फोटोग्राफरने बॉम्ब पडण्यापूर्वीचा दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात टिपला आहे. राखाडी रंगाचे हे स्फोटक एक स्मार्ट बॉम्ब असल्याचे दिसते. हे इस्रायलच्या शस्त्रसाठ्यातील एक शक्तिशाली शस्त्र आहे. इस्रायलने हल्ल्याच्या ४० मिनिटांपूर्वी बैरूतच्या उपनगरातील दोन इमारती रिकाम्या करण्याचा लोकांना इशारा दिला होता. इस्रायलने केलेल्या दाव्याप्रमाणे या इमारतीत हिजबुल्ला संघटनेची केंद्रे होती. बॉम्बस्फोट होण्यापूर्वीचे दृश्य शेअर होताच, शस्त्रास्त्रांचे तज्ज्ञ असलेल्यांनी हा स्मार्ट बॉम्ब असल्याचा दावा केला. या बॉम्बला SPICE बॉम्ब असेही म्हणतात. हा बॉम्ब इस्रायली जेटमधून टाकण्यात आला होता.

अधिक वाचा: इस्रायलमध्ये स्थलांतर भारतीय ज्यूंसाठी (बेने इस्रायली) सोपे का नव्हते?

bomb in 11 planes
अकरा विमानात बॉम्ब ठेवल्याच्या ट्विटमुळे एकच खळबळ
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
turkey ankara terror attack
Turkey Terror Attack : तुर्कस्तानची राजधानी अंकारामध्ये दहशतवादी हल्ला; १० जणांचा मृत्यू, १४ जखमी
West Asia Conflict, America, Israel, war
विश्लेषण : पश्चिम आशियातील संघर्षात अमेरिकेची थेट उडी? इस्रायलच्या मदतीला सैन्य आणि क्षेपणास्त्र बचाव प्रणाली का पाठवली जाणार?
Delhi Police has seized cocaine worth Rs 2,000 crore from Ramesh Nagar area.
Cocain Seized in Delhi : स्नॅक्सच्या पाकिटातून अंमली पदार्थांची तस्करी, पोलिसांनी जप्त केला २ हजार कोटींचा माल!
Pune Municipal Corporation has been hit by the Smart City project
पुणेकरांना ४४ कोटींचा ‘स्मार्ट’ हिसका, काय आहे प्रकरण!
Zomatos Deepinder Goyal reveals Gurugramचा सीईओ झाला फूड डिलिव्हरी बॉय
Video : झोमॅटोचे सीईओ झाले फूड डिलिव्हरी बॉय; ऑर्डर देताना आला धक्कादायक अनुभव, मॉलमध्ये जाताच….
Ajna card stealing gang , mobile tower, Vasai,
वसई : मोबाईल टॉवरमधील आझना कार्ड चोरणारी टोळी गजाआड, परदेशातून गुन्ह्यासाठी व्हायचा वापर

इस्रायलने वापरलेला स्मार्ट बॉम्ब कोणता आहे?

शस्त्रास्त्र तजदन्यांनी केलेल्या तपासणीत असे सूचित होते की, इमारत पाडण्यासाठी वापरलेले शस्त्र हा एक गाईडेड स्मार्ट बॉम्ब होता, जो इस्रायली जेटमधून टाकण्यात आला. ह्यूमन राइट्स वॉचचे संशोधक रिचर्ड वेअर यांच्या मते, या बॉम्बच्या रचनेवरून असे लक्षात येते की हे २००० पाउंड वजनाचे युद्धस्फोटक होते. ज्यात इस्रायलने तयार केलेले मार्गदर्शन किट SPICE लावण्यात आले होते. SPICE — स्मार्ट, प्रिसाईज-इम्पॅक्ट अँड कॉस्ट इफेक्टिव्ह मार्गदर्शन प्रणाली आहे. ही प्रणाली इस्रायलच्या सरकारी मालकीच्या राफेल अॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम्सकडून तयार करण्यात आली आहे. हे मार्गदर्शन किट नॉन-गाईडेड बॉम्बला त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जोडले जाते.

असोसिएट प्रेसने दिलेल्या माहितीनुसार मुख्य हल्ल्यापूर्वी काही मिनिटे इमारतीवर दोन लहान हल्ले झाले होते. ज्याला इस्रायली सैन्य “नॉक ऑन द रूफ” (knock on the roof) इशारा हल्ला असे म्हणते. हा प्रकार इस्रायलच्या गाझामधील लष्करी मोहिमेतदेखील वापरण्यात आला होता. जिथे स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते ४०,००० हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. हे अधिकारी नागरिकांच्या आणि सैनिकांच्या मृत्यूंमध्ये फरक करत नाहीत. इस्रायली सैन्याने बैरूतमध्ये वापरलेल्या शस्त्राच्या प्रकाराबद्दल भाष्य करण्यास नकार दिला.

हे बॉम्ब इतके प्राणघातक कशामुळे होतात?

राफेल कंपनी SPICE किट्सचे वर्णन करताना म्हणते की, हे बॉम्ब दिवस असो किंवा रात्र, खराब हवामानात असो किंवा जीपीएस सिग्नलमध्ये अडथळा येत असो त्या परिस्थितीतही कार्य करू शकतात. हे शस्त्र प्राणघातक परिणाम आणि कमी नुकसान तसेच अचूक लक्ष्य साध्य करते असे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच, हल्ला करणाऱ्या विमानाला कोणताही धक्का पोहोचत नाही. २००० पाउंड वजनाचे हे शस्त्र ६० किलोमीटर अंतरावरून लक्ष्यावर सोडता येऊ शकते. या बॉम्बचे लहान प्रकार देखील राफेल तयार करते. अमेरिकन बनावटीच्या एफ-१५ किंवा एफ-१६ सारख्या इस्रायली लढाऊ विमानातून सोडल्यावर हा बॉम्ब त्याच्या लक्ष्याच्या दिशेने जातो तसेच मार्ग बदलण्यासाठी हलणाऱ्या पंखांचा वापर करतो असे निरीक्षण व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेचे संरक्षण आणि लष्करी विश्लेषक जोसेफ डेम्प्से यांनी देखील छायाचित्रांवरून सांगितले की, हे शस्त्र २००० पाउंड वजनाचा SPICE बॉम्ब आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या बॉम्बची मार्गदर्शन प्रणाली जीपीएस आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल मार्गदर्शन प्रणालीवर अवलंबून असते. जी कॅमेरे किंवा सेन्सर्सचा वापर करून बॉम्बला लक्ष्यापर्यंत अचूक घेऊन जाते. या शस्त्राच्या विध्वंसक स्वरूपावर अनेक घटक परिणाम करतात. ज्यात युद्धस्फोटकाचा आकार आणि त्याचा फ्यूज यांचा समावेश आहे. म्हणूनच या बॉम्बचे हे वैशिष्ट्य लक्षात येते की, बॉम्ब फ्यूज करण्यासाठी काही कालावधी घेण्यात आला. विशिष्ट ठिकाणी फ्यूज करण्यात आला, त्यामुळे बॉम्बचा योग्य त्या ठिकाणी… अपेक्षित लक्ष्यावर स्फोट झाला. म्हणूनच संपूर्णपणे लक्ष्य केलेल्या इमारतीपुरता स्फोट मर्यादित होता. स्फोटाच्या काहीशे मीटर अंतरावर उभ्या असलेल्या लोकांना स्फोटाचा फारसा परिणाम जाणवला नाही आणि स्फोटात उडालेल्या तुकड्यांचा फारसा विखुरलेला अंशही दिसला नाही.

अधिक वाचा: इस्रायल-हमास युद्ध: आजच्या जगण्यासाठी बॉम्ब शेल्टर्स का महत्त्वाचे ठरत आहेत?

हा बॉम्ब इस्रायलमध्ये तयार केला जातो का?

उत्तर सोपे नाही. SPICE 2000 साठी मार्गदर्शन किट्स इस्रायलमधील राफेल कंपनीकडून तयार केले जातात, परंतु यासाठी त्यांचे परदेशी इतर घटकांवरील अवलंबित्व किती आहे हे स्पष्ट नाही,” असे डेम्प्से म्हणाले. २०१९ साली, राफेल आणि अमेरिकन संरक्षण कंत्राटदार लॉकहीड मार्टिनने SPICE मार्गदर्शन किट्स तयार आणि विक्री करण्यासाठी अमेरिकेत एकत्र काम करण्याचा करार केला. त्यावेळी या कंपन्यांनी सांगितले होते की, ६० टक्क्यांहून अधिक SPICE प्रणालीचे उत्पादन अमेरिकेच्या आठ राज्यांमध्ये पसरलेले आहे. २०२३ च्या ऑक्टोबर महिन्यापासून ७ ऑक्टोबरच्या हमासच्या प्राणघातक हल्ल्यानंतर काही आठवड्यांनी, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने इस्रायलला अतिरिक्त SPICE बॉम्ब असेंब्ली निर्यात करण्यास मंजुरी दिली. परंतु या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने नागरी लोकांच्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त करून इस्रायलला अशा शक्तिशाली बॉम्बच्या शिपमेंट्स थांबवल्या होत्या, तरीही इस्रायलकडे अजूनही या शस्त्रांचा साठा आहे असे मानले जाते. बॉम्बचे भाग कुठे तयार केले जातात याच्या उत्तराचा ठोसपणे शोध घेणे कठीण आहे. इस्रायल MK-84 बॉम्बसाठी अमेरिकेवर अवलंबून आहे, परंतु इतर देशदेखील अशाच प्रकारची शस्त्रे तयार करतात. याबाबत निश्चितपणे माहिती मिळवण्यासाठी शस्त्राचे चिन्हांकित अवशेष शोधणे आवश्यक असेल, असे वेअर यांनी सांगितले.