सोशल मीडिया हे हल्लीच्या काळातल्या प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाइलमधलं एक प्रभावी साधन आहे. सोशल मीडिया फिड्स कधीही न संपणारी असतात आणि त्यावर केल्या जाणाऱ्या स्क्रोलिंगमुळे आपण आपला प्रचंड कंटाळा घालवू शकतो. तासन् तास सोशल मीडियावर पडीक असणारे लोकही आहेत. मात्र हे कंटाळा घालवण्याचं साधन किंवा असं तासन् तास पडीक असणं महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळा ठरू शकतं. एक नवा स्टडी नेमकं हेच सांगतो आहे. लोकसत्ताच्या विश्लेषणमध्ये आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत.

युनिव्हर्सिटी ऑफ बाथ, इंग्लंड आणि ट्रिनिटी कॉलेज, आयर्लंड येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की सोशल मीडियाचा सतत वापर ग्राहकांना सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण विचारांना अनुकूल असलेल्या पुढे येऊ देत नाही. सखोल विचार करू देत नाही. उलट त्याऐवजी वरवर आपण कंटाळा घालवत आहोत असं दाखवतो. सोशल मीडियावर सतत पडीक असणं हे हानिकारक ठरू शकतं.

Young girl harassed foreign tourist for a reel dancing in public place video viral on social media
रीलसाठी ओलांडली मर्यादा! तरुणीने डान्स करता करता परदेशी व्यक्तीबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
digital arrest video real cop catches scammer cop video viral
स्कॅमरचा झाला गेम! नकली पोलीस बनून खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केला व्हिडीओ कॉल अन्… VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल
Social media influencer and YouTuber is dating a tree and films herself kissing, hugging, and going out with the tree video viral
आधी केली किस मग मारली मिठी अन्…, इन्फ्लूएंसर करतेय चक्क झाडाला डेट! नेमकं प्रकरण काय? पाहा VIDEO
Monitor lizard entered the house while people sleeping video viral on social media
आयुष्यापेक्षा झोप महत्त्वाची! गाढ झोपले होते अन् घोरपड घरात घुसली, पुढे जे झालं ते पाहून काळजाचा ठोका चुकेल, पाहा VIDEO
desi jugaad room heater made of brick
देसी जुगाड! थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने विटेपासून बनवला रुम हीटर; Video पाहून युजर्स शॉक, म्हणाले, “मृत्यूला…”

याच विषयावर बाथ विद्यापीठातले समाजशास्त्रज्ञ डॉ. टिमोथी हिल असं म्हणतात की सखोल विचार करण्याची काय गरज आहे? असाही प्रश्न लोक विचारू शकतात. मात्र लोकांना विचलित न करणारे विचार आणि सर्जनशीलता कशी वापराल याबाबतची संधी दिली तर ते तशा प्रकारे विचार करू शकतात. ही बाब लोकांसाठीच सकारात्मक ठरू शकते.

Facebook latest News
FB

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात झाला होता. त्यावेळेस लोकांनी कल्पनाही केली नव्हती अशी WFH अर्थात वर्क फ्रॉम होमची संकल्पना रूजली आणि फोफावली. करोनाच्या उद्रेकामुळे जेव्हा लॉकडाऊन लागला होता तेव्हा अनेक जण WFH पद्धती अवलंबत होते आणि कार्यालयीन कामकाज घरून करत होते. त्याच काळात सोशल मीडियावर स्क्रोलिंग करणाऱ्यांबाबतचं संशोधन करण्यात आलं आहे.

जो नवा स्टडी समोर आला आहे त्यानुसार, त्यात अभ्यासकांनी अशा काही भाग्यवान लोकांची भेट घेतली आणि त्यांना प्रश्न विचारले ज्यांना लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर सुट्टी किंवा कामातून प्रचंड मोकळा वेळ मिळाला होता. कंटाळा येण्याचे दोन प्रकार प्रामुख्याने यामध्ये समजले. काहींनी साथीच्या आजारांदरम्यान कसा वेळ घालवला हे सांगितलं तर काहींनी आमच्या मनात त्यावेळी नेमक्या कोणत्या भावना होत्या हे विशद केलं.

वरवरचा कंटाळा आणि उबग
जर्मनीचे फिलॉसॉफर मार्टिन हायडेगर यांनी कंटाळा येण्याचे विविध प्रकार शोधले आहेत. त्यात पहिला आहे तो म्हणजे वरवर येणारा कंटाळा. ट्रेनची वाट पाहताना, लांब रांगेत उभे असताना आपला नंबर कधी येईल हे वाटताना हा वरवरचा कंटाळा येतो. अशावेळी लोक वेळ किंवा कंटाळा घालवण्यासाठी सोशल मीडियावर विविध आमिषं दाखवणारे व्हिडिओ किंवा क्यूट प्राण्यांचे व्हिडिओ पाहणं पसंत करतात. त्यातून ते वरवरचा कंटाळा घालवण्याचा प्रयत्न करतात.

Now Business accounts can link other accounts on Twitter know what is news feature is all about
(संग्रहित छायाचित्र)

आता वरवरचा कंटाळा अशा पद्धतीने गेला तर ते कंटाळ्याच्या उबग या अवस्थेपर्यंत पोहचत नाहीत. हायडेगर यांनी एक निरीक्षण नोंदवलं की अशा प्रकारची बाब तेव्हाच समोर येते जेव्हा लोकांकडे प्रचंड प्रमाणात मोकळा वेळ असतो. या वेळात बहुतांश लोकांना एकटेपणा वाटू लागतो. त्यांना अनेकदा स्वतःच्या भावना किंवा अस्तित्त्व यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. हायडेगर म्हणतात हा वरवरचा कंटाळा जर उबग येणं या अवस्थेपर्यंत पोहचला तर त्यातून नवा काहीतरी शोध लागण्याची शक्यता दाट असते. लोक आहे ती बाब सोडून नवं काहीतरी करण्याकडे वळतात.

अनेक वर्षे संशोधन करणाऱ्या संशोधकांना अशी बाब आढळून आली आहे की कंटाळा ही अवस्था जेव्हा उबग या अवस्थेत जाते तेव्हा त्यातून बाहेर येण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न हे जास्त सर्जनशील असतात. २०१३ च्या एका स्टडीमध्ये संशोधकांनी ज्यांचा अभ्यास केला त्यांना दोन गटात विभागलं होतं. त्यानंतर त्यांना पॉलिस्टीरिन कपच्या जोडीचे दोन वेगळे उपयोग करण्यास सांगितले. मात्र प्रयोगापूर्वी त्यांनी गटांपैकी एकाला आधी फोन बुकमधून नंबर कॉपी करण्याचं कंटाळा येईल असं काम सांगितलं त्यानंतर मुख्य कामाकडे वळण्यास सांगितलं.त्यानंतर असं आढळून आलं की ज्या गटाला फोन नंबर कॉपी करण्याचं कंटाळवाणं काम दिलं होतं त्या गटाने प्रतिस्पर्धी गटापेक्षा चांगली कामगिरी केली आणि कपसाठी इतरांपेा जास्त चांगला उपयोग केला.

आता नव्या स्टडीचे निष्कर्ष असे सांगतात की सोशल मीडियाचा वापर ज्या ज्या लोकांनी वरवरचा कंटाळा घालवण्यासाठी केला त्यांचा वेळ गेला, पण त्यातून त्यांना थकवा जाणवू लागला. अनेकांना आपण उगीच सोशल मीडियावर वेळ घालवला असं नंतर वाटून गेलं. आपण यापेक्षा नक्की काहीतरी चांगलं करू शकलो असतो याची जाणीवही बहुतांश लोकांना झाली.

या प्रयोगात सहभागी झालेला २८ वर्षीय पॉल म्हणाला की मी ट्विटरवर डूम स्क्रोलिंग करत बराच वेळ टाइमपास करत होतो. मला जणू त्याचं व्यसनच लागलं होतं. हा सगळा वेळेचा अपव्यय आहे मला माहित होतं. तसंच ट्विटर हे काही आनंद देणारं माध्यम नाही उलट निराश करणारं आहे. तरीही मी तिथे माहिती वाचत होतो. मला तिथे वाचनासाठी नव्या गोष्टी मिळाल्या. मनोरंजक असोत किंवा संताप आणणाऱ्या असोत पण मी ते वाचत होतो. हा वेळ मी वाया घालवतो आहे याची जाणीव मला होती. काही दिवस मी सात-सात तास सोशल मीडियावर सक्रिय होतो. मात्र आता मला वाटतं आहे की हा वेळ मी वाया घालवला त्या वेळेचा उपयोग करून मी नक्कीच अर्थपूर्ण असं काहीतरी करू शकलो असतो.

ही स्थिती प्रयोगातल्या एकाने सांगितली तर अन्य काही लोक म्हणाले की आम्हाला सोशल मीडियाचा उबग आला. इतका उबग आला की आम्ही सोशल मीडिया वापरणं बंद केलं. त्यानंतर आम्ही आमचा वेळ सायकलिंग, सुतारकाम करणं, बागकाम करणं, बेकिंग करणं अशा गोष्टींमध्ये घालवू लागलो. आम्ही आमच्या नव्या आवडी जोपासल्या. या प्रयोगात सहभागी झालेला डॅरेन हा ३८ वर्षीय व्यावसायिक म्हणाला की करोना काळात मला नोकरी सोडावी लागली. पण त्या काळात माझ्या हे लक्षात आलं की सायकलिंग हे माझं पॅशन आहे. मी सायकलिंग करू लागलो. मी सायकलिंग सोडल्यानंतर फारशा चांगल्या गोष्टी घडल्या नव्हत्या. मी शब्दशः धडपडत होतो. दिवस खूप मोठा वाटायचा आणि मला काहीही करायचं नव्हतं. मला प्रचंड कंटाळा आला होता. त्यानंतर मी सायकल चालवण्यास सुरूवात केली. मला त्यात मनस्वी आनंद मिळाला. एखाद्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतोय हा अनुभव मी बंद केलेलं सायलिंग पुन्हा सुरू केल्यामुळे घेऊ शकलो. मी आता महाविद्यालयात मनोरंजन आणि क्रीडा व्यवस्थापन याचा कोर्स करतो आहे. यात मी यशस्वी झालो तर मला पर्सनल कोच व्हायला आवडेल. कदाचित मी स्वतःचं जिमही सुरू करेन असंही डॅरेनने सांगितलं.

नवा स्टडी करणाऱ्या संशोधकांनी हे निदर्शनास आणून दिलं आहे की जे त्यांच्या प्रयोगात होते त्यांच्याप्रमाणेच अनेक सोशल मीडिया युजर्सकडे मोकळा वेळ असतोच असं नाही. पण सोशल मीडियाद्वारे ते कुटुंबांशी मित्रांशी जोडले जातात. सोशल मीडियाचा वापरकर्त्याच्या मेंदूवर कसा परिणाम होतो ते जाणून घेणं आवश्यक होतं म्हणूनच आम्ही हा स्टडी केल्याचंही संशोधकांनी सांगितलं. या स्टडीतून आम्ही याच निष्कर्षावर पोहचलो आहोत की सोशल मीडियाचा प्रचंड वापर हा वरवरचा कंटाळा कमी करू शकतो. पण त्यामुळे आपण प्रचंड वेळ वाया घालवतो. आपली विचार करण्याची शक्ती कमी होते. त्यामुळे आपण अनेकदा उबग या अवस्थेकडे पोहचत नाही.त्या अवस्थेपर्यंत जे पोहचतात ते नव्या आवडी निवडी आणि ते पूर्ण करण्याचे मार्ग शोधतात.