दक्षिण कोरियाची राजधानी सियोलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका हॅलोवीन उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी झाली असून यामध्ये १४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर साधारण १५० पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. मागील साधारण दोन वर्षांपासून सार्वजनिक उत्सवांवर बंदी होती. मात्र करोना संसर्ग कमी झाल्यानंतर जगभरात पुन्हा एकदा सर्व उत्सव उत्साहात साजरे केले जात आहेत. असे असताना दक्षिण कोरियामध्ये घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तसेच लोकांच्या चेंगराचेंगरीत १४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : समांथाला झालेला मायोसायटिस हा गंभीर आजार नेमका आहे तरी काय? शरीरावर याचा काय परिणाम होतो?

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
Union Health Minister confirms sudden deaths in India are not caused by COVID-19 vaccines, addressing public concerns about vaccine safety.
Deaths Due To Corona Vaccine : “करोना लशीमुळे झाले नाहीत लोकांचे मृत्यू”, मोदी सरकारने संसदेत सांगितली अचानक मृत्यूंमागील कारणे
seven killed 43 injured in kurla bus accident
कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार
Kurla Bus Accident
Kurla Bus Accident : पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस, अन् घात झाला…; घरी परतताना १९ वर्षीय तरूणीला मृत्यूने गाठलं
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
Raghunath More, Raghunath More passed away,
शिवसेनेचे रघुनाथ मोरे यांचे निधन, दिघे यांच्या निधनानंतर साभांळली होती ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी

दक्षिण कोरियामध्ये काय झालं होतं?

दक्षिण कोरियातील इटावॉन लेजर जिल्ह्यात शनिवारी रात्री हॅलोवीन उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान हॅमिल्टन हॉटेलजवळील एका अरुंद रस्त्यावर मोठी गर्दी जमा झाली होती. या जमावाने एकमेकांना ढकलण्यास सुरुवात केली, त्यानंतर चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे १५० हून अधिक लोक जखमी झाले. यातील ५० जणांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर रस्त्यावरच उपचार करण्यात आले. तर दुसरीकडे या घटनेत साधारण १४० जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : ५ जी लॉंन्च झाले मात्र अद्याप सुविधा सामान्यांपर्यंत पोहोचली नाही, कारण काय?

अशा कार्यक्रमामध्ये लोकांचा मृत्यू कसा होतो?

सामान्यपणे एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येत लोक जमतात तेव्हा कोणत्याही दुर्घटनेशिवाय असे कार्यक्रम पाड पडत असतात. मात्र जेव्हा जेव्हा चेंगराचेंगरीसारख्या घटना घडलेल्या आहेत, तेव्हा तेव्हा या घटनांमध्ये काही समान बाब आढळलेली आहे. चित्रपटांमध्ये बऱ्याचदा चेंगराचेंगरी दाखवली जाते. अशा दृष्यांमध्ये जमिनीवर पडून इतर लोकांच्या पायाखाली आल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचे दाखवले जाते. मात्र प्रत्यक्ष चेंगराचेंगरीत पायाखाली येऊन मृत्यू झाल्याची कमी उदाहरणं आहेत. गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण होते, तेव्हा बहुतांश लोक हे गुदमरून मरतात. अशा प्रसंगी श्वास घेता न आल्यामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो. गर्दीच्या ठिकाणी बऱ्याच वेळा श्वास घेणे कठीण होऊन बसते. काही लोकांचा तर उभे असतानादेखील मृत्यू होतो. जे लोक खाली कोसळतात त्यांच्यावर उभे असलेले लोक मोठ्या प्रमाणात दाब देतात. याच कारणामुळे गर्दीमध्ये खाली पडलेल्या व्यक्तीला श्वास घेणे कठीण होते. परिणामी अशा व्यक्तीचा गुदमरून मृत्यू होतो.

हेही वाचा >>> विश्लेषण: Dove, TRESemmé च्या शॅम्पूने कॅन्सरचा धोका? Unilever का परत मागवत आहे उत्पादने?

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेतील टेक्सासमधील ह्यूस्टन येथे अशीच घटना घडली होती. या घटनेविषयी बोलताना इंग्लंडमधील सुफोन विद्यापीठातील क्राऊड सायन्सचे व्हिजिटिंग प्राध्यापक जी कैथ स्टिल यांनी चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू कसा होतो, याबाबत सांगितले होते. स्टिल यांच्या मते “गर्दीमध्ये जेव्हा लोक खाली कोसळतात तेव्हा ते उठण्याचा प्रयत्न करतात. उठताना पाय आणि हात यांच्यावर ताण पडतो. याच वेळी मेंदूला मिळणारा रक्तप्रवाह कमी होत जातो. त्यानंतर ३० सेकंदांमध्ये व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते. साधारण ६ मिनिटांनंतर शरीरातील ऑक्सिजन कमी होतो. परिणामी गर्दीमध्ये व्यक्तीचा मृत्यू होतो.”

हेही वाचा >>> विश्लेषण : ट्विटरची मालकी एलॉन मस्ककडे, आता पुढे काय? तुमचा डेटा सुरक्षित राहणार का?

दरम्यान, याआधीही जगभरात चेंगराचेंगरीच्या भीषण घटना घडलेल्या आहेत. २००३ साली सिकागो येथील नाईट क्लबमध्ये २१ लोकांचा मृत्यू झाला होता. याच महिन्यात (ऑक्टोबर २०२२) इंडोनेशियामध्ये एका स्टेडियममध्ये चेंगराचेंगरीमध्ये १३१ जणांचा मृत्यू झाला होता. १९८८ साली नेपाळमध्येही अशीच घटना घडली होती. अचानक झालेल्या पावसामुळे लोक बंद असलेल्या स्टेडियमकडे धावले होते. ज्यामध्ये ९३ जणांचा मृत्यू झाला होता.

Story img Loader