Loneliness-Free Seoul: दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सोल या महानगराने एकटेपणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी लाखो डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. शहरातील वाढत्या एकटेपणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी ‘Loneliness- Free Seoul’ हा उपक्रम आखला आहे. या उपक्रमासाठी ३०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश समस्येच्या मुळाशी जाऊन उपाय करणे आणि गोडोक्सा किंवा एकाकी मृत्यूच्या वाढत्या घटनांना प्रतिबंध घालणे हा आहे. दक्षिण कोरियाच्या आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०२२ साली ३५५९ एकाकी मृत्यूंची नोंद झाली, तर २०२३ मध्ये हा आकडा वाढून ३,६६१ वर पोहोचला. त्यामुळेच Loneliness-Free Seoul सारखे उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एकाकीपणाचा सामना करण्यासाठी सोलची योजना
सोल महानगर सरकार येत्या पाच वर्षांत एकटेपणाशी लढा देण्यासाठी ३२६ दशलक्ष डॉलर्स (सुमारे रु. २७०० कोटी) गुंतवणार आहे, असा रिपोर्ट The Korea Herald ने दिला आहे. या योजनेत मानसिक आरोग्य सल्ला सेवांचा विस्तार, २४ तासांची हेल्पलाइन सुरू करणे आणि लोकांना प्रोत्साहन देण्याचा समावेश आहे. ‘स्मार्ट २४ प्लॅटफॉर्म’ हा उपक्रमाचा मुख्य भाग आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे सोलमधील एकटे रहिवासी, यात परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. जे ऑनलाइन आणि ऑफलाइन मदत आणि सल्ला घेऊ शकतील. सोलचे महापौर ओ से-हून यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, “निराशा, उच्च आत्महत्या दर आणि आयुष्यातील आनंदाची कमतरता यांसारख्या सामाजिक समस्यांचा संबंध एकटेपणाशी आहे,” असे इंडिपेन्डन्टने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
Goodbye Loneliness 120/ गुडबाय लोनलीनेस १२०
एकटेपणा ही वैयक्तिक समस्या नाहीच , तर हा समाजाचा प्रश्न आहे, त्याकडे आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे. एकटेपणाविरहित सोल तयार करण्यासाठी आम्ही सर्व प्रशासकीय साधनांचा वापर करण्यास वचनबद्ध आहोत, ज्यामध्ये प्रतिबंधापासून समाजात पुनर्वसन आणि एकटेपणा टाळण्याचे व्यवस्थापन बारकाईने केले जाईल,” असे सोल महानगरपालिकेने जाहीर केले. या योजनेचा एक भाग म्हणून, सोल पुढील वर्षी एप्रिलमध्ये ‘Goodbye Loneliness 120’ नावाची २४ तास कार्यरत असणारी हेल्पलाइन सुरू करणार आहे. ही हेल्पलाईन एकटेपणाशी संघर्ष करणाऱ्यांसाठी असेल, ती कॉलर्सना प्रशिक्षित सल्लागारांशी जोडून देईल. यामध्ये फॉलो-अप सपोर्ट, प्रत्यक्ष भेटी आणि आपत्कालीन मदत यांचाही समावेश असेल. ही सेवा मित्र, कुटुंबीय किंवा शेजारी म्हणून मदत करू इच्छितात त्यांच्यासाठीही उपलब्ध असेल असे The Korea Herald ने म्हटले आहे.
सोल हार्ट कन्व्हिनियन्स स्टोअर्स
सोल महानगर प्रशासनाने एकट्या असलेल्या लोकांसाठी सार्वजनिक जागा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या जागेला ‘सोल हार्ट कन्व्हिनियन्स स्टोअर्स’ म्हटले जाईल. येथे लोक इन्स्टन्ट रॅम्यन सारख्या भोजनांचा आनंद घेऊ शकतील. पुढील वर्षापर्यंत अशा चार ठिकाणांची उभारणी केली जाणार आहे. या ठिकाणी भेट देण्यापूर्वी, लोक चेकलिस्टद्वारे आपल्या सामाजिक एकटेपणाची पातळी तपासू शकतील. या जागेत उपलब्ध सल्लागारांशी बोलू शकतील आणि भोजनाचा आनंद घेऊ शकतील. सरकारने ही सेवा केवळ उच्च-जोखीम गटांपुरताच मर्यादित न ठेवता सर्व नागरिकांसाठी मानसिक आरोग्य सल्ला सेवांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना सार्वजनिक आणि खाजगी मानसिक आरोग्य संस्थांमध्ये यद्वारे अपॉइंटमेंट बुक करता येईल. आठ आठवड्यांसाठी आठवड्यातून एकदा वैयक्तिक सल्ला सेवा देण्यात येईल.
३६५ सोल चॅलेंज
The Korea Herald ने दिलेल्या वृत्तानुसार सोल शहरातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, याशिवाय, शहरातील एकटेपणाचे जोखीम ओळखण्यासाठी आणि त्याचे मूल्यांकन करण्यासाठी एका स्वतंत्र प्लॅटफॉर्मची मदत घेतली जाईल. कारण एकट्या राहणाऱ्या व्यक्ती घरीच राहून विविध सेवांचा वापर करण्याची अधिक शक्यता असते. याशिवाय लोकांना बाहेर भोजन करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, डाइनिंग डिस्काउंट्स दिले जातील. एकटेपणाशी लढण्यासाठी आणखी एक रणनीती म्हणजे ‘365 सोल चॅलेंज’ (365 Seoul Challenge), ज्याद्वारे शहरातील प्रमुख कार्यक्रमांना एक पॉइंट्स प्रणालीशी जोडले जाईल. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना सोल स्कायवे, हान नदीवरील कॅम्पिंग साइट आणि सोल बोटॅनिक पार्कसारख्या ठिकाणांची तिकीटे बक्षिसे म्हणून मिळू शकतील.
वृद्ध रहिवाशांसाठी कुकिंग क्लासेस, एक्सरसाइज क्लासेस किंवा खानपानाच्या तरतुदी यांसारख्या पर्यायी ऑफर्सची आणकी केली जात आहे, असे वृत्त इंडिपेंडंटने दिले आहे. दक्षिण कोरियामध्ये २०२२ साली ३,५५९ एकाकी मृत्यूपैकी ५४.१ टक्के मृत्यू ५०-६० वयोगटातील होते. गेल्या वर्षी अशा मृत्यूंपैकी ५३.८ टक्के मृत्यू या वयोगटातील लोकांचे होते.
दक्षिण कोरियामध्ये एकट्या राहणाऱ्या कुटुंबांची संख्या २०२१ साली ७.१६ दशलक्षवरून २०२२ साली ७.५ दशलक्ष आणि २०२३ मध्ये ७.८२ दशलक्षांवर पोहोचली आहे. Korea Institute for Health and Social Affairs (KIHASA) या सरकारी विचारमंचाच्या २०१९ च्या अभ्यासानुसार, १९ ते ३४ वयोगटातील तीन टक्के लोक, म्हणजेच ३.३८ लाख लोक, एकटेपणा आणि समाजापासून दूर राहण्याच्या समस्यांनी ग्रस्त होते. मंत्रालयाच्या अहवालानुसार, ४० टक्के लोकांमध्ये किशोरवयातच एकटेपणाची भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. २०२१ मध्ये हा आकडा पाच टक्क्यांपर्यंत वाढला, ज्याचा परिणाम ५.४ लाख तरुण कोरियन लोकांवर झाला.
या वर्षाच्या सुरुवातीला NPR शी बोलताना, सीड या नागरी संस्थेच्या मुख्य संचालक ली यूनाए यांनी म्हटले की, कुटुंब संस्कृती असलेल्या देशांमध्ये आणि आर्थिक समृद्धीवर मूल्यांकन करणाऱ्या संस्कृतींमध्ये तरुण लोक एकाकी आणि समाजापासून दूर राहण्याची अधिक शक्यता असते. त्यांनी सांगितले की, “पालक आपल्या मुलांना संधी मिळवून देण्यासाठी सर्व काही देतात आणि त्यांच्या मुलांकडून खूप अपेक्षा करतात. पालकांना वाटते की त्यांनी मिळवलेली संपत्ती आणि सामाजिक स्थान त्यांच्या मुलांनी वारशाने घ्यावे.” सोलने एकटेपणाशी लढण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम देशाला वृद्ध होत असलेल्या लोकसंख्येची आणि कमी होणाऱ्या जन्मदराची समस्या भेडसावत असताना सुरू करण्यात आला आहे.
A global ‘epidemic’/ अ ग्लोबल एपिडेमिक
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एकटेपणाला “जागतिक सार्वजनिक आरोग्य संकट” म्हणून घोषित केले आहे. गेल्या वर्षी, अमेरिकेच्या सर्जन जनरलने असे सांगितले की, एकटेपणाशी संबंधित आरोग्यविषयक धोके १५ सिगारेट दररोज ओढण्याइतके गंभीर आहेत. The Guardian च्या अहवालानुसार, वृद्धांमध्ये एकटेपणामुळे डिमेन्शिया होण्याचा धोका ५० टक्क्यांनी वाढतो, तसेच हृदयविकार रोग किंवा धक्का येण्याची शक्यता ३० टक्क्यांनी जास्त असते. शाळेत एकटेपणाशी झुंजणारे तरुण विद्यापीठातील शिक्षण सोडण्याची अधिक शक्यता असते. जून २०२३ मध्ये Nature Human Behaviour जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या एका संशोधन पत्रिकेनुसार, एकटेपणाचा सामना करणाऱ्या लोकांमध्ये कोणत्याही कारणाने लवकर मृत्यू होण्याचा धोका ३२ टक्के जास्त असतो.
तज्ज्ञ सुचवतात की ज्या लोकांना एकाकीपणा किंवा एकटेपणाचा अनुभव येतो त्यांनी मदत घ्यावी.
“सामाजिक नेटवर्क जपणे हे इतर कोणत्याही आरोग्यवर्धक उपक्रमासारखेच आहे: नियमित व्यायाम करणे, चांगले खाणे, स्वतःची काळजी घेणे इत्यादी,” असे न्यूयॉर्कच्या स्टोनी ब्रूक युनिव्हर्सिटीच्या मानसशास्त्र विभागातील समन्वयक न्यूरोसायन्सचे प्राध्यापक तुर्हान कॅन्ली यांनी गेल्या वर्षी CNN ला सांगितले होते.