अंतराळ हा मानवासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. चंद्रासह मंगळ या ग्रहावर जीवसृष्टी आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ गेल्या कित्येक दशकांपासून घेत आहेत. अब्जाधीश एलॉन मस्क चंद्रासह मंगळ ग्रहापर्यंत पोहचण्याचे स्वप्न बघत आहेत. त्यासाठीचाच एक प्रयत्न म्हणून मस्कच्या ‘स्पेस एक्स’ या अवकाश संशोधन करणाऱ्या कंपनीने १८ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘स्टारशीप’ नावाच्या प्रक्षेपकाचे (रॉकेट) चाचणी प्रक्षेपण करण्यात आले. मात्र या प्रयत्नात स्पेस एक्सला अपयश आले. उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी या प्रक्षेपकाचा स्पेस एक्सशी संपर्क तुटला. याच पार्श्वभूमीवर स्पेस एक्सचे हे चाचणी प्रक्षेपण काय होते? या प्रक्षेपणादरम्यान नेमके काय घडले? हे जाणून घेऊ या…

दक्षिण टेक्सासमधून प्रक्षेपकाचे चाचणी प्रक्षेपण

स्पेस एक्स या अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थेने स्टारशीप नावाचे अत्यंत प्रगत असे प्रक्षेपक तयार केलेले आहे. अंतराळवीरांना चंद्रावर तसेच आगामी काही दशकांत अन्य ग्रहांवरही नेता यावे यासाठी या प्रक्षेपक रचना केलेली आहे. या शनिवारी (१८ नोव्हेंबर २०२३) दक्षिण टेक्सासमधून या प्रक्षेपकाचे चाचणी प्रक्षेपण करण्यात आले. मात्र प्रक्षेपण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी स्पेस एक्सची ही मोहीम अयशस्वी ठरली. तशी माहिती स्पेस एक्सने दिली आहे. ‘आम्ही दुसऱ्या टप्प्यातील संपूर्ण डेटा गमावला आहे’ असे ही चाचणी अयशस्वी झाल्यानंतर म्हटले.

quantum chip Willow solves in 5 minutes
Quantum Chip :सुपर कॉम्प्युटरलाही हजारो वर्षे लागतील; पण गूगलची ‘ही’ नवी चिप ५ मिनिटांत उत्तर देईल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
On December 13 and 14 there will also meteor shower in space and feast for astronomy lovers
आकाशात १३, १४ डिसेंबरला उल्कावर्षाव; पृथ्वी लहान-मोठ्या कणांजवळून…
International Space Station
भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा, नाव ठरलं ‘भारतीय….’
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार

यानापासून विलग झाल्यानंतर बुस्टरचा स्फोट

स्टारशीपचे प्रक्षेपण केल्यानंतर स्पेस एक्सने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये स्टारशीपचे यशस्वी प्रक्षेपण दाखवण्यात आले होते. मात्र प्रक्षेपणाच्या काही मिनिटांतच स्टारशीप यानापासून विलग झाल्यानंतर यानाच्या बुस्टरचा स्फोट झाला. पुढे विलग झालेले अंतराळयान आपल्या मार्गावर नियोजितरित्या मार्गक्रमण करत असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले. मात्र या यानाचा स्पेस एक्सशी असलेला संपर्क तुटला होता.

Starship ने नियोजनानूसार उड्डाण केले पाहिजे, त्याच्या अग्रभागावर असलेल्या अवकाशयानाने पृथ्वीच्या वातावरणाबाहेर प्रवेश केला पाहिजे, त्यानंतर ते सुखरूप Hawaii जवळ समुद्रात उतरले पाहिजे, असे या प्रक्षेपण चाचणीचे उद्दीष्ट होते.

Starship मध्ये पहिल्या टप्प्यात एकूण ३३ Raptor इंजिन आहेत, ज्याच्या जोरावर Starship हे अवकाशात झेप घेणार होते. नासाच्या अपोलो मोहिमेत अंतराळवीर चंद्रापर्यंत पोहचले होते, त्या मोहिमेत Saturn V या अत्यंत शक्तीशाली प्रक्षेपकाचा वापर करण्यात आला होता, त्यापेक्षा दुप्पट शक्ती निर्माण करण्याची ताकद Starship च्या Raptor इंजिनात आहे.

स्पेस एक्सचे मत काय?

या चाचणी प्रक्षेपणानंतर स्पेस एक्सने प्रतिक्रिया दिली. या चाचणीतून आम्हाला भरपूर डेटा मिळालेला आहे. आगामी प्रक्षेपणासाठी आम्हाला या डेटाची मदत होईल, असे स्पेस एक्सने सांगितले. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (एफएए) या चाचणी प्रशिक्षणादरम्यान कोणतीही हानी झालेली नाही, असे सांगितले. तसेच या चाचणी प्रक्षेपणादरम्यान नेमकी काय चूक झाली, याचा आम्ही तपास करू, असेही एफएएने सांगितले.

पहिली चाचणी झाली होती अयशस्वी

स्पेस एक्सने स्टारशीप या प्रक्षेपकाची पहिली प्रक्षेपण चाचणी एप्रिल महिन्यात घेतली होती. या चाचणीत Starship रॉकेटचे दोन टप्पे (Two-Part Rocket) होते. पहिल्या टप्प्याला Super Heavy booster म्हटले गेले. एकूण ६९ मीटर उंचीच्या या पहिल्या टप्प्यात ३३ छोटी इंजिन होती. तर दुसऱ्या टप्प्याला Starship असे नाव देण्यात आले होते. हा टप्पा ५० मीटर उंचीचा होता. म्हणजेच हे अंतराळयान साधार ३९० फूट उंचीचे होते. स्पेस एक्सने केलेली ही पहिली चाचणी अयशस्वी ठरली होती.

इंजिन आणि कॉम्प्यूटर्समध्ये लागली होती आग

ही प्रक्षेपण चाचणी अयशस्वी झाल्यानंतर एलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली होती. स्टारशीप प्रक्षेपकाच्या इंजिन आणि कॉम्प्यूटर्समध्ये आग लागली होती. ज्यामुळे हे प्रक्षेपक आपल्या मार्गापासून भरकटले होते. तसेच या प्रक्षेपकाची ऑटोमॅटिक डिस्ट्रक्ट कमांड साधारण ४० सेकंद उशिराने सक्रिय करण्यात आली होती. त्यामुळे आम्हाला निश्चित परिणाम मिळाले नाही, असे मस्क म्हणाले होते. हे प्रक्षेपक परत जमिनीवर आल्यामुळे स्फोट झाला होता. त्यात लॉन्च पॅडचे नुकसान झाले होते. या परिसरातील साधारण ३.५ एकर परिसरात आग लागली होती. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नव्हते. या घटनेनंतर स्पेस एक्सने लॉन्च पॅड अधिक मजबूत करण्यासाठी काही अपायोजना केल्या. या परिसरात मोठ्या वॉटर-कुल्ड स्टील प्लेट्स लावण्यात आल्या होत्या.

स्पेस एक्स आणि नासा करत आहेत एकत्र काम

स्टारशीप या प्रक्षेपकाचे प्रक्षेपण शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) केले जाणार होते. मात्र ऐनवेळी प्रक्षेपकाच्या प्रक्षेपणाची तारीख बदलण्यात आली. या प्रकल्पात अमेरिकेची नासा ही संस्था एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स या संस्थेसह एकत्रित काम करत आहे. याआधीच्या प्रक्षेपण चाचणीत अपयश आलेले असले तरी नासा आणि स्पेस एक्स या दोन्ही संस्थांनी अशा प्रकारचे अपयश येतच असतात. त्यामुळे या अपयशांचे स्वागतच आहे, अशी भूमिका घेतलेली आहे.

Story img Loader