‘स्पेस एक्स’च्या पोलारिस डॉन या मोहिमेतील क्रू ड्रॅगन कॅप्सूलचे मंगळवारी (१० सप्टेंबर) फ्लोरिडा येथील ‘नासा’च्या केनेडी स्पेस सेंटरमधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सहा दिवस चालणाऱ्या या अंतराळ मोहिमेत चार क्रू सदस्यांपैकी जगातील खासगीरीत्या व्यवस्थापित केले गेलेले पहिले दोन क्रू सदस्य स्पेसवॉक करताना दिसणार आहेत. प्रक्षेपणापासून तिसर्या दिवशी हे स्पेसवॉक सुरू होईल. परंतु, ही मोहीम नक्की काय आहे? या मोहिमेला ऐतिहासिक महत्त्व का आहे? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘पोलारिस डॉन’ मोहीम काय आहे?
एलोन मस्क संचालित ‘स्पेस एक्स’ कंपनीने चार अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेत पाठविले आहे. कंपनीच्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलमधून हे अंतराळवीर प्रवास करणार आहेत. या पोलारिस कार्यक्रमात नियोजित तीन मोहिमांपैकी पोलारिस डॉन ही पहिली मोहीम आहे. ‘द कॉन्व्हर्सेशन’नुसार ट्रिप कंपनीच्या फाल्कन ९ रॉकेटद्वारे क्रू ड्रॅगनला प्रक्षेपित करण्यात आले . क्रू ड्रॅगन कॅप्सूलला रेझिलियन्सदेखील म्हणतात. ‘स्पेस.डॉटकॉम’नुसार, नासाने अपोलो मिशन पूर्ण केले होते. मात्र, अपोलो मिशनच्या तुलनेत या मिशनअंतर्गत चार अंतराळवीर पृथ्वीपासून आणखी जास्त अंतरावर जाण्याचा प्रयत्न करतील. क्रू ड्रॅगन आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात (आयएसएस) डॉक केले जाणार नाही. त्याऐवजी चालक दल सुमारे १,३६७ किलोमीटर उंचीवर पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालेल. हे अंतर पृथ्वीपासून ‘आयएसएस’पर्यंतच्या अंतराच्या तिप्पट आहे. पृथ्वीपासून ‘आयएसएस’पर्यंतचे अंतर सुमारे ४०० किलोमीटर आहे.
हेही वाचा : काय आहे ‘God of Chaos’? अंतराळातील या अशनीचा पृथ्वीला धोका किती? शास्त्रज्ञ चिंतेत असण्याचे कारण काय?
या अंतराळ मोहिमेतील क्रूमध्ये अब्जाधीश जेरेड इसाकमन, स्पेसएक्स अभियंत्या सारा गिलिस व अॅना मेनन आणि अमेरिकन एअर फोर्सचे माजी वैमानिक स्कॉट पोटेट या चार सदस्यांचा समावेश आहे. पोलारिस डॉन मोहिमेला वारंवार विलंबाचा सामना करावा लागला आहे. ‘मनीकंट्रोल’नुसार, २०२२ मध्ये हे मिशन लाँच होणार होते. पेमेंट प्रोसेसिंग फर्म ‘Shift4 Payments’चे कार्यकारी अधिकारी, अब्जाधीश व अनुभवी वैमानिक जेरेड इसाकमन पोलारिस डॉन हे या मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत. ‘द कॉन्व्हर्सेशन’नुसार, कमी गुरुत्वाकर्षण वातावरणात मानवी शरीराची प्रतिक्रिया, कॅप्सूलला प्राप्त होणारे रेडिएशन मोजणे यांसह सुमारे ४० प्रयोग या कार्यक्रमात केले जाणार आहेत.
ही मोहीम ऐतिहासिक का मानली जातेय?
या मोहिमेतील चार क्रू सदस्यांपैकी दोन सदस्य त्यांच्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलमधून पृथ्वीच्या कक्षेत ‘टेथर्ड स्पेसवॉक’साठी जातील; ज्याला एक्स्ट्राव्हिक्युलर अॅक्टिव्हिटी (ईव्हीए)देखील म्हणतात. इसाकमन व गिलिस हा इतिहास घडविणार आहेत. हा जगातील पहिलावहिला खासगी स्पेसवॉक असणार आहे. ‘स्पेस डॉटकॉम’नुसार, इसाकमन यांनी सांगितले की, स्पेसवॉकला सुमारे दोन तास लागतील. ही बाब ऐतिहासिक असण्याचे कारण स्पेसवॉक करणे अत्यंत धोकादायक आहे. आतापर्यंत केवळ सरकारी अंतराळवीरांनीच स्पेसवॉक केला आहे. केवळ इसाकमन आणि गिलिस स्पेसवॉक करतील आणि इतर सदस्य १५ ते २० मिनिटे क्रू ड्रॅगन कॅप्सूलच्या बाहेर घालवतील.
इसाकमन यांनी पोलारिस डॉननंतर पोलारिस कार्यक्रमांतर्गत आणखी दोन मोहिमा नियोजित केल्या आहेत. त्यात क्रू ड्रॅगनने आणखी एक उड्डाण करणे समाविष्ट आहे आणि ‘स्पेस एक्स’चे पुढील पिढीचे रॉकेटही विकासाधीन आहे. त्यांनी हे उड्डाण कधी होईल, याच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. इसाकमन यांनी ‘स्पेस डॉटकॉम’ला सांगितले की, एड व्हाईटच्या १९६५ च्या स्पेसवॉकसारख्या कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करू नका. हा अमेरिकेतील अंतराळवीराने केलेला पहिला स्पेसवॉक होता; ज्याच्या पहिल्या स्पेसवॉकचे छायाचित्र ऐतिहासिक ठरले होते. इसाकमन यांनी ‘सीएनबीसी’ला सांगितले, स्पेसवॉकमध्ये हवेच्या दबावातील बदल, तापमानातील बदल व अतिशय कठोर वातावरण यांचा सामना करावा लागतो. पण, अंतराळवीर या स्थितीसाठी तयार असतात. उदाहरणार्थ- गिलिस यांनी ‘नासा’ अंतराळवीरांना २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानके ड्रॅगन मिशन डेमो-२, क्रू-१ व इन्स्पिरेशन-४ मोहिमेसह अनेक ऑपरेशन्ससाठी प्रशिक्षित केले आहे. कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेऊन २०१५ मध्ये गिलिस यांनी ‘स्पेस एक्स’मध्ये त्यांच्या करिअरला सुरुवात केली. त्या आता कंपनीच्या वरिष्ठ स्पेस ऑपरेशन्स अभियंत्या आहेत. त्या अंतराळवीरांना सुरक्षा आणि उड्डाण ऑपरेशन्सचे प्रशिक्षण देतात.
‘स्पेस एक्स’च्या स्पेस सूट्सची चाचणी
‘स्पेस एक्स’ची ही मोहीम ‘स्पेस एक्स’च्या नवीन स्पेस सूटचीही पहिली मोठी चाचणी असणार आहे. ‘सीएनबीसी’नुसार, ‘स्पेस एक्स’ने गेल्या काही वर्षांत त्याच्या ‘इंट्राव्हेहिक्युलर ॲक्टिव्हिटी’ (IVA) सूटमधून त्याचा ईव्हीए सूट तयार केला आहे. पोटेट आणि मेनन स्पेसवॉक करणार नसले तरी ते याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवून असतील. याचे कारण असे की, क्रू ड्रॅगन कॅप्सूलमध्ये एअरलॉक नसतो. याचा अर्थ पोटेट आणि मेननसह सर्व चार क्रू सदस्यांना जगण्यासाठी त्यांच्या सूटवर अवलंबून राहावे लागेल. “सूटची चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. यामागील संकल्पना म्हणजे त्यातून जितक्या जास्त गोष्टी आम्हाला शिकता आल्या, अनुभवता आल्या, तितक्या चांगल्या असतील. कारण- भविष्यातील सूट डिझाईन करताना याचा अनुभव मोलाचा ठरेल,” असे इसाकमन यांनी सांगितले. या उड्डाणात त्याची चाचणी घेण्याची संधी मिळणे हा पुन्हा एक मोठा सन्मान वाटतो, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : ‘Symbiosexual’नंतर आता ‘Abrosexual’ची चर्चा; काय आहे ही नवीन लैंगिक ओळख?
वेंडी व्हिटमन कॉबने ‘द कॉन्व्हर्सेशन’मध्ये नमूद केल्याप्रमाणे, “या मोहिमेत यशस्वी झाल्यास, या मोहिमेमुळे खासगी कंपन्या चंद्र किंवा मंगळावर जाण्यासाठी आवश्यक क्षमता विकसित करण्यावर काम करतील.” कॉब म्हणाले, “स्पेस एक्सच्या अनेक उपक्रमांप्रमाणे पोलारिस डॉन हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे; परंतु कंपनीच्या भविष्यातील योजनांसाठी त्याला विशेष महत्त्व आहे.”