जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांनी रविवारी इतिहास रचला. मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ या अंतराळ प्रक्षेपक कंपनीने स्टारशिप रॉकेटची पाचवी यशस्वी चाचणी केली. मात्र यापूर्वीच्या चार चाचण्यांपेक्षा ही चाचणी वेगळी होती. कारण यावेळी बूस्टर रॉकेट पुन्हा माघारी आले आणि उड्डाणस्थळी स्थिरावलेही. स्टारशिपची चाचणी नेमकी काय होती याविषयी…

स्टारशिप रॉकेटची चाचणी कशी वैशिष्ट्यपूर्ण?

मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने त्यांच्या स्टारशिप रॉकेटला पाचव्यांदा चाचणीसाठी १३ ऑक्टोबर रोजी प्रक्षेपित केले. स्टारशिपचे प्रक्षेपण हे यापूर्वी झालेल्या चार चाचण्यांसारखेच होते. मात्र यापूर्वीची रॉकेट्स उड्डाण झाल्यानंतर हवेत नष्ट झाली. मात्र नव्या चाचणीत उड्डाण केलेले रॉकेट पुन्हा प्रक्षेपक स्थळी आणण्यात स्पेसएक्सला यश आले. जवळपास ४०० फूट उंच असलेल्या स्टारशिपला सूर्यादयाच्या वेळी टेक्सासच्या दक्षिणकडे मेक्सिकोच्या सीमेजवळ प्रक्षेपित करण्यात आले. मेक्सिकोच्या समुद्रावर घिरट्या घातल्यानंतर ज्या ठिकाणी प्रक्षेपण करण्यात आले, तिथे सात मिनिटांनंतर स्टारशिप परतले.

आणखी वाचा-भारतीयांसाठी आनंदाची बातमी; ऑस्ट्रेलियाने लाँच केला वर्किंग हॉलिडे व्हिसा, याचा अर्थ काय? कसा होणार फायदा?

नव्या स्टारशिपची वैशिष्ट्ये काय?

स्टारशिप ‘सुपर हेवी’ बूस्टरद्वारे प्रक्षेपित करण्यात आली आहे. हा चमकदार स्टील सिलिंडर नऊ मीटर रुंद आणि ७१ मीटर उंच आहे; त्याची लांबी बोईंग ७४७ इतकीच आहे. प्रक्षेपक मनोऱ्यावर धातूचा मोठा स्तंभ आहे, ज्यांना चापॅस्टिक म्हणतात. स्टारशिपमध्ये ३३ रॅप्टर इंजिन आहेत. एखाद्या पक्ष्यासारखे भासणारे स्टारशिप रॉकेट थोडे लहान पण अधिक स्टायलिश आहे. तीक्ष्ण नाक, पक्ष्यांच्या पखांवर असतात तसे काळे ठिपके आणि काळसर रंगाचे पोट… जणू एखादा पक्षीच. सुपरहेवी असलेले तीन रॅप्टर्स वातावरणापेक्षा अवकाशाच्या पोकळीत काम करण्यासाठी अनुकूल आहेत.

इतर चाचण्या आणि या चाचणीत फरक काय?

स्टारशिपच्या पहिल्या चाचणी उड्डाणात सुपर हेवी आणि स्टारशिप वेगळे होऊ शकले नाहीत. दुसऱ्या चाचणीत ते वेगळे झाले, परंतु सुपरहेवी तुटले आणि स्टारशिपला आग लागली. तिसऱ्या चाचणीत सुपरहेवीने मेक्सिकोच्या आखातातील एका ठरावीक ठिकाणी स्टारशिपला खाली आणण्यासाठी आवश्यक अंतराळ अभ्यास पूर्ण केला. या वेळी स्टारशिप नियंत्रणात होते. मात्र प्रक्षेपक स्थळी पुन्हा प्रवेश करताना स्टारशिप तुटले. चौथ्या चाचणीत सुपरहेवीने आखातात स्टारशिपच्या अवतरणाचे व्यवस्थापन केले. मात्र ते प्रक्षेपक स्थळी येऊ शकले नाही. या वेळी मात्र कंपनीने ते पुन्हा प्रक्षेपक स्थळी आणण्याची योजना आखली. प्रक्षेपक स्थळी येताना बरेच नुकसान झाले असले तरी स्टारशिप शेवटच्या चाचणीदरम्यान अबाधित राहिले आणि ही चाचणी यशस्वी झाली.

आणखी वाचा-डेन्मार्कमध्ये उत्खननात सापडले ‘वायकिंग्ज’चे ५० सांगाडे; इतिहासावर आणखी प्रकाश पडण्याची आशा!

या चाचणी उड्डाणचा उपयोग काय?

स्टारशिप ही पूर्णपणे पुन्हा वापरण्यायोग्य अशी पहिली प्रक्षेपण प्रणाली आहे, जी स्पेसएक्सच्या स्टारलिंक या उपग्रह डेटा नक्षत्राच्या विस्ताराच्या योजनेत मध्यवर्ती आहे; अमेरिकेला चंद्रावर परत पाठवण्याच्या नासाच्या योजनेला, मस्क यांच्या मंगळावरील मानवी वसाहतीच्या स्वप्नाला या चाचणीमुळे बळकटी मिळू शकते. या चाचणी उड्डाणामुळे कंपनीच्या दीर्घकालीन उद्दिष्टांची पूर्तता केली जाऊ शकते. जर स्पेसएक्स यशस्वी झाली तर ही कंपनी एका वर्षात प्रक्षेपित करू शकणाऱ्या वस्तुमानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल (ही रक्कम इतर कोणत्याही कंपनी किंवा देशापेक्षा जास्त आहे). यामुळे ते अधिक संख्येने आणि अधिक विशाल स्टारलिंक उपग्रह स्थापित करण्यास अनुमती देईल, ज्यामुळे हाय-स्पीड इंटरनेट ॲक्सेस प्रदान करण्याची प्रणालीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल.

sandeep.nalawade@expressindia.com