पर्यावरणाची हानी हा मुद्दा संपूर्ण जगाला भेडसावतो आहे. वायु, जल, हवा प्रदूषणामुळे पर्यावरणासह मानवी आरोग्यावरही अनिष्ट परिणाम होत आहेत. याच कारणामुळे जागतिक पातळीवर प्लास्टिकचा वापर कमी व्हावा तसेच पर्यावरणीय हानी टाळता यावी यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. पर्यावरण हानीला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. मात्र वाचून आश्चर्य वाटेल पण सिगारेटचे थोटूक हेदेखील पर्यावरणीय ऱ्हासासाठी कारणीभूत ठरते. याच कारणामुळे स्पेन देशाने सिगारेटच्या थोटकामुळे होणारी पर्यावरणीय हानी रोखण्यासाठी अभूतपूर्व कायदा लागू केला आहे. हा नवा कायदा काय आहे? या कायद्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी काय फायदा होऊ शकतो? या सर्व बाबी जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन’ योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी, नेमकी काय आहे योजना? जाणून घ्या

न्युझीलंड देशाने १ जानेवारी २००९ या तारखेनंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास प्रतिबंध केलेला आहे. स्पेन सरकारनेही धुम्रपान तसेच पर्यावरणीय हानी रोखण्यासाठी अनोखा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत सिगारेटच्या थोटकाची विल्हेवाट लावण्यासाठी येणारा खर्च सिगारेटची निर्मिती करणाऱ्या कंपनीलाच द्यावा लागणार आहे. दरवर्षी सिगारेटच्या थोटकाची विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येतो. तसेच थोटकामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. त्यामुळे मायक्रोप्लास्टिकचा वापर कमी व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

स्पेनमध्ये हा कायदा ६ जानेवारीपासून लागू झाला आहे. मागील वर्षी पर्यावरण संवर्धनासाठी स्पेन सरकारने अनेक निर्णय घेतले होते. हा निर्णयही यापैकीच एक आहे. या कायद्यांतर्गत सिंगल यूज प्लास्टिक, कॉटन बड्स, पॉलिस्टरीन कप, प्लास्टिकचे स्ट्रॉ, प्लास्टिक फूड पॅकेजिंगवरही बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: ‘रोमियो अँड ज्युलिएट’च्या प्रदर्शनानंतर ५४ वर्षांनी कलाकारांचे गंभीर आरोप; फसवून न्यूड सीनचं चित्रीकरण केल्याचा दावा!

स्पेन सरकारच्या या निर्णयामुळे काय होणार?

स्पेन सरकारने लागू केलेल्या या अभूतपूर्व कायद्यामुळे पर्यावरणीय हानी टाळता येऊ शकते. या कायद्यातर्गंत सिगारेटच्या थोटकामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांसंबंधी जनजागृतीची जबाबदारी सिगारेट निर्मिती करणाऱ्या कंपन्यावर येईल. या कायद्यामुळे सिगारेटच्या थोटकांची विल्हेवाट लावण्यासाठी किती खर्च येईल तसेच ही प्रक्रिया कशी राबवली जाईल, याबाबत अस्पष्टता आहे. मात्र सिगारटेची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना एकूण ८७८५ कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता शक्यता आहे. कंपन्यांकडून हा खर्च कसा वसूल केला जाईल याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. मात्र हा खर्च भरून काढण्यासाठी कंपन्या खर्चाचा भार ग्राहकांवर टाकू शकतात.

स्पेनचा धूरमुक्त देश होण्यासाठी प्रयत्न

या नव्या नियमामुळे युरोपीयन देशांमध्ये धुम्रपान करणाऱ्यांची संख्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारी आकड्यांनुसार स्पेनध्ये एकूण २२ टक्के नागरिक धुम्रपान करतात. यामध्ये २३.३ टक्के पुरुष तर स्त्रियांचे प्रमाण १६.४ टक्के आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार स्पेनमध्ये २०२० साली १८ टक्के प्रौढ व्यक्तींनी धुम्रपान केले. तर २०१९ साली १५-१६ वयोगटातील २१ टक्के मुलांनी धुम्रपान केले. स्पेनमधील नागरिकांना धुम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाने मान्य केलेले आहे.

याच कारणामुळे स्पेनकडून धुम्रपानाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्पेन हा सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहतुकीदरम्यान धुम्रपान करण्यास बंदी घालणारा पहिला युरोपीयन देश आहे. स्पेन सरकारने २०२१ साली समुद्र किनाऱ्यांवर धुम्रपान करण्यावर बंदी घातलेली आहे. येथे ५२५ समुद्र किनारे धूरमुक्त असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : नोटबंदीचा निर्णय वैधच! सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; मात्र आक्षेप काय होता? कोर्टाचा नेमका निर्णय काय?

दरम्यान, स्पेनच्या या निर्णयाचे जागतिक आरोग्य संघटनेने स्वागत केले आहे. या निर्णयामुळे अनेक फायदे होतील. तंबाखूच्या धुरामुळे दरवर्षी १.२ दसलक्ष अकाली मृत्यू होतात. या निर्णयामुळे मृतांची संख्या कमी होण्यास मदत होईल. तसेच वातावरणातील धूरही कमी होईल. या निर्णयामुळे कचरादेखील कमी होईल. त्याचा पर्यावरण संवर्धनासाठी उपयोग होईल, असे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे.

सिगारेटचे थोटूक सर्वात घातक

हेही वाचा >>> विश्लेषण : वयाच्या ९ व्या वर्षी लग्न, १७ व्या वर्षी मुलींसाठी पहिली शाळा, वाचा सावित्रीबाईंचं संपूर्ण जीवनकार्य…

सिगारेटचे फिल्टर पर्यावरणास सर्वात घातक असणाऱ्या घटकांपैकी एक आहे. दरवर्षी साधारणपणे ४.५ ट्रिलियन सिगारेटची थोटकं समुद्र, नद्या, शहरातील पदपथ, बाग-बगीचे, माती, समुद्र किनारे यांना प्रदूषित करतात. सिगारेटच्या थोटकात मायक्रोप्लास्टिक असते. हे मायक्रोप्लास्टिक पर्यावरणीय हानीस कारणीभूत ठरते. प्लास्टिक पिशव्या, बॉट्लसपेक्षाही सिगारेटच्या थोटकांमुळे अधिक सागरी प्रदूषण होते. याच सिगारेटच्या थोटकांची विल्हेवाट लावणे अधिक खर्चिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या आकड्यांनुसार सिगारेटच्या थोटकांची विल्हेवाट लावण्यासाठी चीन दरवर्षी २१५३३ कोटी रुपये, भारत ६३४२ कोटी, ब्राझील देश १४८५ कोटी रुपये खर्च करतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spain government pass law cigarette company to pay for cigarette butts clean know details prd