महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ मध्ये शिवसेना भाजपपासून बाजूला झाल्यानंतर नव्या समीकरणाने आकार घेतला. ही घडामोड अनपेक्षित होती. हिंदुत्ववादी विचार असलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मैत्री करत, महाविकास आघाडी (मविआ) निर्माण झाली. यात भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले. त्यानंतर अडीच वर्षांनी शिवसेना व पुढे राष्ट्रवादीत फूट पडली. दोन्हीकडील एक गट भाजपच्या आघाडीत गेला. लोकसभेला महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळाले, मात्र दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला मोठे बहुमत मिळाले. तेथेच महाविकास आघाडीला तडे जाण्यास सुरुवात झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिवसेनेची कोंडी

मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिले. विधानसभेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पराभव स्वीकारावा लागल्याची भावना या पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये आहे. ठाकरे गटाला विधानसभेला जवळपास दहा टक्के मतांसह २० जागा मिळाल्या. लोकसभेच्या तुलनेत त्यांची सात टक्के मते घटली. निकालानंतर पक्षाच्या आमदारांनीही बैठकीत स्थानिक निवडणुका स्बळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. पक्षाच्या मुंबईतील एका खासदाराने तर विधानसभाच स्वबळावर लढायला हवी होती अशी भावना व्यक्ती केली. यातून पराभवानंतर पक्षातील नेत्यांच्या तीव्र भावना दिसतात. शिवसेनेचा सारा भर हा मुंबईवरच राहील. कारण, पुणे, नागपूर या ठिकाणी त्यांची फारशी ताकद नाही. ठाणे पट्ट्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राबल्य आहे. या भागात ठाण्यासह उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिका आहेत. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेची ताकद दिसते. तरी पक्षाची सारी भिस्त मुंबईवर आहे. जवळपास ४० हजार कोटींहून अधिक अर्थसंकल्प असलेल्या मुंबई पालिकेचा आकार काही राज्यांपेक्षाही मोठा आहे. येथे गेली तीन दशके शिवसेनेची सत्ता राहिलीय. मुंबईतील राजकारणाचा प्रभाव कोकणावरही पडतो. यंदा विधानसभेला कोकणात म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या तीन जिल्ह्यांत गटनेते भास्कर जाधव यांच्या रूपात एकमेव जागा पक्षाला जिंकला आली. यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात पक्षाची कोंडी झाली आहे. ती फोडून कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी स्वबळावर मुंबई काबीज करणे हे आव्हानात्मक आहे.

हेही वाचा >>> स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?

कार्यकर्त्यांना संधी

लोकसभा किंवा विधानसभेत तीन पक्षातील आघाडीने ठरावीक कार्यकर्त्यांना संधी मिळाली. जे पहिल्या फळीतील कार्यकर्ते किंवा पक्षाचा जो वर्षानुवर्षे रस्त्यावर उतरून काम करणारा आहे अशांना विशेष संधी मिळाली नाही. जर एखाद्या लोकसभा किंवा विशेषतः विधानसभा मतदारसंघात जर मित्र पक्ष लढत असेल तर ज्येष्ठ कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्याचा परिणाम पक्ष विस्तारावर होतो. यामुळे स्थानिक पातळीवर पक्ष वाढीसाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना अशा स्वबळाने संधी मिळेल. बऱ्याच वेळा स्थानिक निवडणुका या तेथील समस्यांवर होतात. अनेक ठिकाणी एकाच पक्षाच्या अगदी स्थानिक आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या दोन आघाड्या रिंगणात असतात. यामुळे स्वबळ हे पक्षाची ताकद जोखण्यासाठी सर्वांनाच उत्तम संधी आहे.

हेही वाचा >>> Lal Bahadur Shastri Death : लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं?

एकला चलो रे कितपत शक्य?

मुंबईत ५० ते ६० हजार मतदारांचा एक प्रभाग आहे. तर राज्यातील अन्य महापालिकांमध्ये तीन ते चार वॉर्डचा एक प्रभाग, अशी रचना दिसते. तेथेही जवळपास आठ ते दहा हजार मते एका ठिकाणी आहेत. थोडक्यात विजय मिळवण्यासाठी पक्ष संघटना भक्कम असेल तरच इतक्या मतदारांपर्यंत पोहोचता येईल. महापालिकेत सरासरी ६० ते ६५ टक्के मतदान होत असल्याचा अनुभव आहे. मुंबईचा विचार केला तर, काँग्रेसचा पारंपरिक मतदार सर्वत्र आहे. ठाकरे गट स्वबळावर गेल्यास त्यांना काँग्रेसची संबंधित प्रभागातील मते मिळणार नाहीत. त्यामुळे हा धोका लक्षात घ्यावा लागेल. राज्यातील राजकीय चित्र पाहता शिवसेनेचे महापालिकेतील अनेक प्रबळ इच्छुक महायुतीमधील भाजप किंवा शिवसेना शिंदे गटातून संधी मिळतेय का, त्याकडे डोळे लावून आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला स्वबळाबरोबरच कार्यकर्ते टिकवणे आव्हानात्मक आहे. ज्यांना जायचे त्यांनी जावे, हे वाक्य सभेत ठीक आहे. पण निवडणूक लढण्यासाठी दमदार फौज गरजेची आहे हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदुत्वाचा मुद्दा विचारात घेतला तर, भाजप व शिंदे गट हेही जोरकसपणे ही भूमिका मांडत, गेल्या पाच वर्षांतील ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार. केंद्र तसेच राज्यातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता पाहता ठाकरे गटासाठी स्बळाचा विचार आव्हानात्मक आहे. शिवसेनेच्या घोषणेनंतर काँग्रेस व राष्ट्रवादीतूनही स्वबळाबाबत प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यांनी आम्हीही तयार आहोत असा सूर लावला. आता यातून मविआत वरिष्ठ पातळीवर पुन्हा खल होईल अशी चिन्हे आहेत. मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढविताना महायुतीच्या एकत्रित ताकदीचा विचार मविआतील पक्षांना करावा लागेल.

महायुतीत भाऊगर्दी

राज्यात व केंद्रात सत्ता असल्याने महायुतीकडे कार्यकर्त्यांचा ओढा आहे. विधानसभा निकालानंतर स्थानिक पातळीवर जी पक्षांतरे सुरू आहेत, त्यावरून हा अदमास बांधता येतो. महायुती म्हणून स्थानिक निवडणुकीला सामोरे गेल्यास त्यांच्यातही सर्वांना संधी कठीण आहे. भाजपचा विचार केला तर, राज्यातील मुंबई, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, सांगली असा अपवाद वगळता आताच बहुतेक महापालिकांवर त्यांचा झेंडा आहे. सध्या प्रशासकीय राजवट आहे हा भाग वेगळा. आता भाजपचे सारे लक्ष मुंबईवरच आहे. गेल्या म्हणजे २०१७ च्या फेब्रुवारीत झालेल्या मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेना ८४ तर भाजप ८२ व काँग्रेसला ३१ जागा मिळाल्या होत्या. आता विधानसभेला ठाकरे गटाला त्यांनी राज्यात जिंकलेल्या वीस पैकी निम्म्या म्हणजेच १० या मुंबईतील आहेत. भाजप येनकेनप्रकारेण मुंबई जिंकून ठाकरे गटाला रोखण्याचा प्रयत्न करेल. भाजपकडे प्रत्येक प्रभागात दोन ते चार इच्छुक आहेत. त्यात जुने त्याचबरोबर बाहेरून आलेले असा संघर्ष आहे. त्यातच महायुतीतील शिंदे गटाचीही मुंबईत काही भागांत ताकद आहे. यातून भाजपला उमेदवारी वाटप कटकटीचे आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट मुंबईत तितके प्रभावी नाहीत. यामुळे चार प्रमुख पक्ष मुंबईत दावेदारी करतील. अशात मविआत फूट पडल्यास या घडामोडी महायुतीच्या पथ्यावर पडतील हे निश्चित.

hrishikesh.deshpande@expressindia.com