भारताच्या शेजारील श्रीलंका देशाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. १९४८ साली ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाल्यापासून श्रीलंका सध्या अभूतपूर्व अशा आर्थिक संकटाला तोंड देत आहे. या संकटाचे एक प्रमुख कारण विदेशी चलनाचा अभाव हे आहे. याचाच अर्थ, मुख्य अन्न आणि इंधन यांच्या आयातीसाठी पैसे देण्याची देशाची क्षमता नाही. यामुळे देशात तीव्र टंचाई निर्माण झाली असून वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. करोना काळात श्रीलंकेचं कंबरडं मोडलं असून श्रीलंकेसमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. श्रीलंकेची विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी सरकारकडून आता प्रयत्न केले जात आहेत. विदेशी चलन आकर्षित करण्यासाठी श्रीलंकन सरकार ‘गोल्डन व्हिसा’ देण्याच्या तयारीत आहे. गोल्डन विजाच्या माध्यमातून विदेशी चलन जमवण्याचा श्रीलंकन सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी श्रीलंकेनं ‘गोल्डन पॅराडाइस व्हिसा प्रोग्राम’ सुरु केला आहे.
विश्लेषण: आर्थिक संकट सोडवण्यासाठी श्रीलंकन सरकार घेणार ‘गोल्डन व्हिसा’चा आधार? नेमकं काय आहे जाणून घ्या
भारताच्या शेजारील श्रीलंका देशाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. १९४८ साली ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाल्यापासून श्रीलंका सध्या अभूतपूर्व अशा आर्थिक संकटाला तोंड देत आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-04-2022 at 10:32 IST
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lankan government to adopt golden visa to solve economic crisis rmt