जगभरात लोकप्रिय असलेली स्टारबक्स कंपनी संकटात आहे. जगभरातील कॉफीप्रेमींमध्ये या ब्रॅंडची प्रचंड मागणी आहे. परंतु, आता या कंपनीवर मोठ्या प्रमाणात नोकर कपात करण्याची वेळ आली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन निकोल यांच्या नेतृत्वाखाली स्टारबक्स घटती विक्री आणि ऑपरेशनल अकार्यक्षमता दूर करण्यासाठी पुनर्रचनेचा प्रयत्न करत आहे. कंपनीने जागतिक स्तरावर १,१०० कॉर्पोरेट नोकऱ्या काढून टाकण्याची घोषणा केली आहे. अलीकडेच इन्फोसिस कंपनी ४०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याने चर्चेत आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निकोल यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, “आम्ही आमची रचना सुलभ करत आहोत. हा कंपनीच्या पुनर्रचनेचा एक भाग आहे. आमचा हेतू अधिक कार्यक्षमतेने कार्य करणे, जबाबदारी वाढवणे, गुंतागूंत कमी करणे आणि एकत्रीकरण करणे हा आहे.” स्टारबक्स बाजारातील आव्हानांना तोंड देत असून यावर प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात येत आहेत. नोकर कपातीचा स्टारबक्सच्या बॅरिस्टा, रोस्टिंग, मॅन्युफॅक्चरिंग किंवा वेअरहाउसिंग स्टाफवर परिणाम होणार नाही. परंतु, कंपनीत प्रमुख भूमिकांमध्ये असणाऱ्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांवर याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे. ही कपात कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि सर्व स्तरांवर निर्णय प्रक्रिया सुव्यवस्थित असल्याची खात्री करण्यासाठी असल्याचे कंपनीचे सांगणे आहे. कंपनी ११०० कर्मचाऱ्यांना कामावरून का काढणार आहे, त्यविषयी जाणून घेऊ.

स्टारबक्स संघर्षात

स्टारबक्स १,१०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. या कर्मचाऱ्यांची यादीदेखील तयार करण्यात आली आहे. जगभरात स्टारबक्सचे तब्बल १६,००० कर्मचारी आहेत आणि ८० देशांमध्ये याचे ३६,००० पेक्षा जास्त स्टोअर आहेत. विशेष म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांची स्टारबक्स हकालपट्टी करणार आहे, त्यांना २ मे २०२५ पर्यंतचे पगार आणि इतर लाभ देणार आहे. स्टारबक्स टाटा उद्योग समूहाबरोबर जॉईंट वेंचर असलेली कंपनी आहे. अनेक देशांमध्ये कंपनीला आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे.

स्टारबक्स १,१०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

स्टारबक्सने सलग चार तिमाहींपासून विक्रीत घसरण नोंदवली आहे. कंपनीने २०२४ या आर्थिक वर्षात जागतिक विक्रीत दोन टक्क्यांची घट नोंदवली. यासाठी अनेक बाबी कारणीभूत आहेत. यात वाढत्या किमती आणि ग्राहकांची बदलती पसंती यांसारख्या सर्वच बाबी कारणीभूत आहेत. अमेरिकेमध्ये, स्टारबक्स ड्रिंक्सच्या चढ्या किमती आणि विशेषत: पीक अवर्समध्ये लागणारा जास्त प्रतीक्षा वेळ यामुळे ग्राहकांची निराशा वाढली आहे. याव्यतिरिक्त, मोबाइल ऑर्डरिंगचा विस्तार वेगाने वाढत आहे, याद्वारेच ३० टक्क्यांहून अधिक व्यवहार होत आहे.

त्यामुळे ऑपरेशनल अडथळे निर्माण झाले आहेत, त्यामुळे अनेक ग्राहक नाराज आहेत. स्टारबक्स केवळ अमेरिकेतच नव्हे चीनमध्येही आर्थिक मंदीचा सामना करत आहे. चीनमध्ये स्टारबक्सची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ कंपनीला स्थानिक कॉफी ब्रँड्सकडून स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. या आव्हानांनी निकोल यांना स्टारबक्सच्या ऑपरेशन्स आणि ग्राहक प्रतिबद्धता धोरण सुधारण्यासाठी आक्रमक पावले उचलण्यास प्रवृत्त केले आहे.

स्टारबक्सच्या मेन्यूमध्ये कपात

स्टारबक्स अमलात आणत असलेल्या सर्वात लक्षणीय बदलांपैकी एक म्हणजे त्यांच्या मेन्यूमध्ये करण्यात आलेली घट. २०२५ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस सुमारे ३० टक्के खाद्यपदार्थ आणि पेय ऑफर काढून टाकण्याची कंपनीची योजना आहे. ऑपरेशन्स सुलभ करण्यासाठी, प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी आणि बॅरिस्टासची कार्यक्षमता सुधारण्यासाठी हे धोरण तयार करण्यात आले आहे. ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या मेन्यू कट्समुळे स्टारबक्स कमी लोकप्रिय असलेली अनेक पेये काढून टाकणार आहेत.

स्टारबक्सने सलग चार तिमाहींपासून विक्रीत घसरण नोंदवली आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

ग्राहकांचा अनुभव सुधारण्यावर लक्ष

मेन्यू बदलांव्यतिरिक्त, दुकानातील ग्राहक अनुभव सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. स्टारबक्सने त्यांची प्रतिष्ठा पुनर्संचयित करण्याच्या उद्देशाने अनेक बदल केले आहेत. त्यात सेल्फ-सर्व्ह कंडिमेंट बार परत आणणे, कपांवर हस्तलिखित नोट्स पुन्हा सुरू करणे, स्टोअरमधील ग्राहकांसाठी सिरॅमिक मगचा वापर वाढवणे, अधिक आरामदायी आसन आणि अधिक आकर्षक वातावरण तयार करण्यासाठी स्थानांचे पुनर्निर्माण करणे यांचा समावेश आहे. तसेच स्टारबक्सने आपली स्टोअर धोरणेही अपडेट केली आहेत. आता केवळ पैसे देणाऱ्या ग्राहकांनाच स्वच्छतागृहात प्रवेश मिळणार आहे. कंपनीला विश्वास आहे की, हे बदल ग्राहकांसाठी अधिक स्वागतार्ह वातावरण तयार करण्यात मदत करतील.

स्टारबक्सची आर्थिक मंदीवर प्रतिक्रिया

स्टारबक्सदेखील कर्मचाऱ्यांकडून वाढत्या दबावाचा सामना करत आहे. नोकर कपातीचा प्रामुख्याने कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांवर परिणाम होत आहे. मात्र, स्टारबक्सने त्यांच्या स्टोअरस्तरीय कर्मचाऱ्यांना खात्री दिली आहे की, या कपातीमुळे त्यांच्या भूमिका किंवा स्टोअर ऑपरेशन्सवर परिणाम होणार नाही. त्याऐवजी कंपनीने कार्यक्षमतेला समर्थन देण्यासाठी आणि ग्राहकांसाठी प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी स्टाफिंग प्रक्रियेत सुधारणा करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.

निकोल यांच्या नेतृत्वाखाली स्टारबक्स

आर्थिक आव्हाने असूनही, स्टारबक्सचे स्टॉक २०२५ मध्ये वरती जात असल्याचे दिसले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये स्टारबक्समध्ये सामील झाल्यापासून, निकोल यांनी ग्राहकांचे अनुभव सुधारण्यासाठी आणि कार्यक्षमता संतुलित करण्यासाठी ब्रँडच्या धोरणांमध्ये बदल करण्यावर भर दिला आहे. निकोल यांच्या प्रमुख उपक्रमांपैकी एक म्हणजे स्टारबक्सच्या मोबाइल ऑर्डरिंग सिस्टमला अनुकूल करणे. कंपनी एका नवीन वैशिष्ट्याची चाचणी करत आहे, जी ग्राहकांना पिकअपच्या विशिष्ट वेळेची निवड करण्यास अनुमती देणार आहे. पीक अवर्समध्ये दुकानातील गर्दी कमी करणे हे याचे उद्दिष्ट आहे.