२ जुलै रोजी नैर्ऋत्य मान्सून भारताच्या सर्व भागांत पोहोचल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. भारतात जून ते सप्टेंबर या काळात नैर्ऋत्य दिशेकडून म्हणजेच अरबी समुद्राकडून हिमालयाकडे वारे वाहतात. त्यालाच नैर्ऋत्य मान्सून, असे म्हणतात. यंदा बहुतांश भौगोलिक प्रदेशांमध्ये स्थिर किंवा सतत पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. १२ सप्टेंबरपर्यंत देशभरात ८३६.७ मिलिमीटर पाऊस पडला होता, जो या हंगामातील आठ टक्के अतिरिक्त पाऊस होता. सेंट्रल वॉटर कमिशन (CWC)कडील नवीन साप्ताहिक जलाशय आणि नदीखोऱ्यांच्या डेटामधून हे स्पष्ट होते की, यंदा एकूण साठवण स्थिती मागील वर्षाच्या तुलनेत चांगली आहे. देशातील एकूण जलाशयांच्या स्थितीवर एक नजर टाकू.

देशातील एकूण जलाशयाची स्थिती

देशातील १५५ जलाशयांमध्ये एकूण १८०.८५२ अब्ज घनमीटर (बिलियन क्युबिक मीटर (बीसीएम)) साठवण क्षमतेपैकी सध्या १५३.७५७ अब्ज घनमीटर उपलब्ध साठा आहे. हा साठा जलाशयांच्या एकूण साठवण क्षमतेच्या ८५ टक्के आहे. गेल्या वर्षी याच वेळी एकूण पाणीसाठा ११९.४५१ अब्ज घनमीटर होता. गेल्या १० वर्षांचा आकडा बघता, सरासरी साठा १३०.५९४ अब्ज घनमीटर आहे. आज १५५ जलाशयांपैकी १४१ जलाशयांमध्ये त्यांच्या साठवण क्षमतेच्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त साठा आहे. त्यातील केवळ पाच जलाशयांमध्ये ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी साठा आहे.

Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Chandrapur city Rain of Rs 200 notes morning aam aadmi party BJP election campaign
आश्चर्य! चंद्रपूर शहरात पहाटे चक्क २०० रूपयांच्या नोटांचा पाऊस…
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
rupee falls for fourth consecutive session
रुपयाचे ८-१० टक्क्यांपर्यंत अवमूल्यनाचा अंदाज; सलग चौथ्या सत्रात घसरण; रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाने मोठे नुकसान टळले
देशातील एकूण जलाशयाची स्थिती (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : तुम्हीही तासनतास बसून काम करता का? मग तुम्हाला होऊ शकतो डेड बट सिंड्रोम

प्रदेशनिहाय जलाशयांतील पाणीसाठा

उत्तर : हिमाचल प्रदेश, पंजाब व राजस्थानमधील ११ जलाशयांमध्ये १९.८३६ अब्ज घनमीटर साठवणूक क्षमता आहे. या जलाशयांमध्ये या आठवड्यातील डेटानुसार उपलब्ध पाणीसाठा १३.४६८ अब्ज घनमीटर आहे, जो एकूण साठवण क्षमतेच्या ६८ टक्के आहे. मागील वर्षी या जलाशयांमध्ये याच कालावधीत साठवणूक थेट साठवण क्षमतेच्या ८१ टक्के होती. त्यानुसार बघितल्यास, यंदाची साठवण कमी असल्याचे चित्र आहे. ११ सप्टेंबरपर्यंत हिमाचलमध्ये ५३५.९ मिमी आणि पंजाबमध्ये ३०४.५ मिमी म्हणजेच सामान्यतेपेक्षा अनुक्रमे २१ टक्के आणि २४ टक्के कमी पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे या राज्यांमध्ये संपूर्ण हंगामात सामान्य पाऊस झालेला नाही.

(छायाचित्र-पीटीआय)

पूर्व : आसाम, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, नागालँड व बिहारमध्ये सेंट्रल वॉटर कमिशनद्वारे निरीक्षण केलेल्या २५ जलाशयांची एकत्रितपणे साठवण क्षमता २०.७९८ अब्ज घनमीटर आहे. १२ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध साठा १५.७९७ अब्ज घनमीटर होता, जो क्षमतेच्या ७६ टक्के होता आणि दशकातील सरासरी ६९ टक्के आहे. ११ सप्टेंबरपर्यंत नागालँड आणि बिहारमध्ये २८ टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे; परंतु उर्वरित राज्यांमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे या प्रदेशातील जलाशयांच्या साठ्यावर त्याचा परिणाम झालेला नाही.

पश्चिम : गुजरात, महाराष्ट्र व गोव्यात सेंट्रल वॉटर कमिशनद्वारे निरीक्षण केलेले एकूण ५० जलाशय आहेत, ज्यांची एकूण साठवण क्षमता ३७.३५७ अब्ज घनमीटर आहे. या जलाशयांमध्ये सध्या उपलब्ध जलसाठा ३३.५२६ अब्ज घनमीटर आहे, जो एकूण साठवण क्षमतेच्या ९० टक्के आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये याच कालावधीत उपलब्ध पाणीसाठा ७५ टक्के होता आणि दशकातील सरासरी ७३ टक्के आहे. हा मुबलक साठा आहे. कारण- गुजरात आणि महाराष्ट्रात या हंगामात चांगला पाऊस झाला आहे. विशेषतः या कालावधीत गुजरातला मोठ्या प्रमाणावर पुराचा सामना करावा लागला आहे आणि कच्छच्या वाळवंटातही पाऊस पडला आहे.

प्रदेशनिहाय जलाशयांतील पाणीसाठा (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

मध्य : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये २६ जलाशय आहेत, ज्यांची एकूण साठवण क्षमता ४८.२२७ अब्ज घनमीटर आहे. १२ सप्टेंबरपर्यंत या जलाशयांमध्ये ४२.८०८ अब्ज घनमीटर इतका पाणीसाठा होता, जो एकूण साठ्याच्या ८९ टक्के होता. २०२३ मध्ये हे प्रमाण ७६ टक्के होते आणि दशकातील सरासरी ७७ टक्के आहे. जूनमध्ये मान्सून हंगाम सुरू झाल्यापासून एकूणच या प्रदेशात सामान्य किंवा जास्त पाऊस पडला आहे; ज्याचा प्रदेशाला फायदा झाला आहे.

दक्षिण: या प्रदेशात सेंट्रल वॉटर कमिशनने ४३ जलाशयांची नोंद केली आहे, ज्यांची सामूहिक साठवण क्षमता ५४.६३४ अब्ज घनमीटर आहे. सध्या या जलाशयांतील पाणीसाठा ४८.१५८ अब्ज घनमीटर आहे, जो साठवण एकूण क्षमतेच्या ८८ टक्के आहे. २०२३ मध्ये याच कालावधीत जलसाठा अत्यंत कमी म्हणजेच ४९ टक्के होता आणि हा साठा दशकातील सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा खूपच चांगला. दक्षिण भारतातही गेल्या चार महिन्यांत भरपूर प्रमाणात पाऊस झाला आहे. तमिळनाडू, किनारी आंध्र प्रदेश आणि त्यांच्या शेजारी प्रदेशात फारसा नैर्ऋत्य मोसमी पाऊस पडत नाही. मात्र, त्यांनाही या हंगामात फायदा झाला आहे. त्यामुळेच धरणांचे साठेही वाढले आहेत. कर्नाटकातील जलसाठे उन्हाळ्यात अगदी कोरडे पडले होते; मात्र आता हे जलसाठे चांगल्या प्रमाणात भरले आहेत.

हेही वाचा : दोन महिन्यांसाठी पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र; ही दुर्मीळ खगोलीय घटना काय आहे?

२०२३ च्या तुलनेत यंदाची साठवणूक चांगली की वाईट?

झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, नागालँड, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ व तमिळनाडूमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत साठवण परिस्थिती चांगली आहे. गोवा व तेलंगणात परिस्थिती २०२३ सारखीच आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब व उत्तराखंडमध्ये २०२३ पेक्षाही वाईट स्थिती आहे. प्रमुख नदीखोऱ्यांमध्ये सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त साठा आहे. त्यामध्ये बराक नदीत (९८.७२ %), कृष्णा (९४.५३ %), कावेरी (९३.५४ %), नर्मदा (९२.१९ %), गोदावरी (९१.८५ %), तापी (८५.९६ %), गंगा (८३.२९ %), महानदी (८३.४८ %), माही (८३.९१ %) व ब्रह्मपुत्रा (६६.९३%) या नद्यांचा समावेश आहे.