सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या मार्गात एकापाठोपाठ एक अडचणी येत होत्या. अमेरिकेत चक्रीवादळाचा धोका असल्याने नासा आणि स्पेसएक्सने फ्लोरिडामधील केप कॅनवेरल येथून क्रू-९ चे होणारे प्रक्षेपण पुढे ढकलले होते. मात्र, आज क्रू-९ चे प्रक्षेपण यशस्वीरीत्या पार पडले आहे. नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर यांच्या यानात बिघाड झाल्यामुळे त्यांच्या परतीच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या. त्यांना परत आणण्यासाठी नासाचे प्रयत्न सुरू आहेत. क्रू-९ २६ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित होणार होते; मात्र वादळामुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते. काय आहे क्रू-९ मोहीम? वादळामुळे झालेल्या विलंबाचा बचाव मोहिमेवर काय परिणाम होईल? त्याविषयी जाणून घेऊ.

काय आहे क्रू ड्रॅगन आणि क्रू-९ मोहीम?

क्रू ड्रॅगन हे ‘स्पेसएक्स’कडील ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या दोन प्रकारांपैकी एक आहे. ‘स्पेसएक्स’च्या या स्पेसक्राफ्टने आधीही अंतराळवीरांशिवाय आणि अंतराळवीरांसह, अशी दोन्ही प्रकारची उड्डाणे केली आहेत. हे स्पेसक्राफ्ट पुन्हा वापरण्यायोग्य आहे. स्पेसक्राफ्टचा दुसरा प्रकार म्हणजे कार्गो ड्रॅगन. त्यांच्या नावांप्रमाणे, क्रू ड्रॅगन प्रामुख्याने अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर नेते आणि कार्गो ड्रॅगन अंतराळस्थानकावर मालाचा पुरवठा करते. २०११ मध्ये स्पेस एजन्सीचा स्पेस शटल प्रोग्राम संपल्यानंतर अंतराळस्थानकाकडे नेणारी उड्डाणे अमेरिकन कंपन्यांकडे सोपविण्याच्या नासाच्या योजनेचा एक भाग म्हणून ‘स्पेसएक्स’ने क्रू ड्रॅगन लाँच केले. क्रू ड्रॅगनची आयएसएसमधील पहिली मोहीम २०२० मध्ये झाली होती. या यानाने आतापर्यंत नासासाठी अंतराळ स्थानकावर आठ क्रू रोटेशन मोहिमा केल्या आहेत. ही क्रू ड्रॅगनची नववी मोहीम असेल.

nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
On December 13 and 14 there will also meteor shower in space and feast for astronomy lovers
आकाशात १३, १४ डिसेंबरला उल्कावर्षाव; पृथ्वी लहान-मोठ्या कणांजवळून…
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Cold weather Thane district, Thane district temperature,
ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस
Loksatta explained What will be achieved by purchasing Rafale M fighter jets
विश्लेषण: ‘राफेल एम’ लढाऊ विमाने खरेदी करण्याने काय साध्य होणार ?

हेही वाचा : हिजबुल प्रमुखाच्या हत्येनंतर संघर्ष पेटणार? भारतासह इतर देशांवर काय परिणाम होणार?

स्पेसएक्सच्या क्रू-९ मध्ये अमेरिकेतील अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्हला आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर पाठविण्यात आले आहे. क्रू-९ मूलत: ऑगस्टच्या मध्यात प्रक्षेपित होणार होते. परंतु, अंतराळस्थानकावर डॉक असलेल्या बोईंगच्या स्टारलायनर स्पेसक्राफ्टसह समस्यांचे विश्लेषण करण्यासाठी अधिक वेळ लागला. त्यामुळे ही मोहीम एक महिना पुढे ढकलण्यात आली होती.

हेलेन वादळामुळे नियोजित वेळेत क्रू-९ चे प्रक्षेपण झाले नाही. (छायाचित्र-एपी)

हेलेन वादळामुळे प्रक्षेपणास विलंब का झाला?

हेलेन वादळामुळे नियोजित वेळेत क्रू-९ चे प्रक्षेपण झाले नाही. हेलेन चक्रीवादळ मेक्सिकोच्या आखातातून पुढे गेले आणि या वादळाचा फ्लोरिडाच्या वायव्येकडील प्रदेशावर जास्त परिणाम झाला. मात्र, केप कॅनाव्हेरल प्रदेशातून क्रू-९ चे प्रक्षेपण होणार होते, त्या प्रदेशात या वादळामुळे जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस होता. नॅशनल हरिकेन सेंटरने म्हटले होते की, हेलेन श्रेणी ४ मधील चक्रीवादळ आहे, ज्याचा वेग १२९ किलोमीटर प्रतितासपेक्षा जास्त आहे. अमेरिकेच्या नॅशनल हरिकेन सेंटरच्या म्हणण्यानुसार हे चक्रीवादळ टॅम्पा, फ्लोरिडाच्या नैर्ऋत्येस सुमारे ७३५ किलोमीटर अंतरावर होते आणि त्यावेळी ताशी १४० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. गुरुवारी उशिरा फ्लोरिडाच्या वायव्य किनारपट्टीच्या भागात हे वादळ चक्रीवादळाचे विशाल रूप घेईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे नासाची बचाव मोहीम पुढे ढकलण्यात आली होती.

मोहिमेचा विलंब विल्यम्स यांच्या बचाव मोहिमेवर परिणाम करील?

विल्यम्स आणि विल्मोर फेब्रुवारी २०२५ मध्ये ड्रॅगन क्राफ्टमध्ये बसून हेग आणि गोर्बुनोवसह परतणार आहेत. स्पेसएक्स वेबसाइटनुसार “ते क्रू ड्रॅगनवर स्वायत्तपणे अनडॉक करतील, अंतराळ स्थानक सोडतील आणि पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतील.” ते फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर पोहोचल्यानंतर, स्पेसएक्स रिकव्हरी जहाज स्पेसक्राफ्ट आणि क्रू यांना घेऊन येईल. आता अशी चिंता आहे की, क्रू-९ मोहिमेला आणखी विलंब केल्याने नासा विल्यम्स आणि विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्याच्या स्वतःच्या योजनांमध्ये बदल करू शकेल. ‘द गार्डियन’च्या म्हणण्यानुसार, विल्यम्स आणि विल्मोर यांना बोईंग स्टारलायनरवर परत पाठवता आले नाही. कारण- त्यांना त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल अनिश्चितता आहे. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी ‘आउटलेट’ला सांगितले, “नासाने ठरवले आहे की, बुच आणि सुनीता पुढील फेब्रुवारीमध्ये क्रू-९ बरोबर परततील.”

हेही वाचा : Mpox in India: देशात मंकीपॉक्सचा धोका वाढतोय का? केंद्राने जारी केलेले नवीन नियम काय आहेत?

अनेक महिन्यांपासून सुनीता विल्यम्स यांच्या परतीचा प्रवास रखडत असल्याचे चित्र होते. या बचाव मोहिमेत अगदी क्रू-९ च्या प्रक्षेपणापर्यंत अडचणी आल्यात. मात्र, अखेर क्रू-९ चे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे आणि कुठेतरी सुनीता विल्यम्स यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत क्रू-९ सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन पृथ्वीवर परतेल, अशी माहिती आहे.

Story img Loader