प्रत्येक प्रकरणात घोटाळे, राजकारणात होणारे भ्रष्टाचार, गुन्हे हीच कारणे एखाद्या मंत्र्याच्या किंवा खासदाराच्या राजीनामा देण्याचे कारण ठरते. मात्र, न्यूझीलंडमध्ये एका खासदाराने चोरीच्या आरोपामुळे राजीनामा दिला आहे. न्यूझीलंडच्या संसदेवर पहिल्या निर्वासित खासदार म्हणून निवडून येत इतिहास घडवणाऱ्या न्यूझीलंड ग्रीन पार्टीच्या खासदार आणि न्याय प्रवक्त्या असलेल्या गोलरीझ गहरामन यांनी शॉपलिफ्टिंगच्या आरोपांमुळे राजीनामा दिला आहे. यासाठी त्यांनी ‘क्लेप्टोमेनिया’ आजाराला कारणीभूत ठरवले आहे. ‘क्लेप्टोमेनिया’ हा आजार तणावातून होऊ शकतो का? यावर उपाय काय? जाणून घेऊ सविस्तर..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे, त्यांनी त्यांच्या या गैरवर्तनाला कामाशी संबंधित तणावाला कारणीभूत ठरवले आहे. त्या हेही म्हणाल्या की, त्या त्यांच्या या कृतीला माफ करू शकत नसल्या तरी त्यांना यावर स्पष्टीकरण द्यायचे होते.

न्यूझीलंडच्या खासदार शॉपलिफ्टिंगबद्दल काय म्हणाल्या?

लहान वयात इराणमधून न्यूझीलंडला आलेल्या ४२ वर्षीय गहरामन यांच्यावर बुटीक कपड्यांच्या दुकानातून चोरी केल्याचे तीन आरोप आहेत. यातील दोन घटना ऑकलंडच्या एका लक्झरी कपड्यांच्या दुकानात घडल्या, तर तिसरी घटना ही वेलिंग्टनच्या एका हाय-एंड कपड्यांच्या किरकोळ दुकानात घडली.

हे आरोप पहिल्यांदा न्यूज टॉक झेडबी प्लसद्वारे १० जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात आले होते. ज्यात असे नोंदवले गेले होते की, गहरामन यांनी सणासुदीच्या काळात पॉन्सनबीच्या ऑकलंड उपनगरातील प्रसिद्ध लक्झरी ब्रँड स्कॉटीज बुटीक या दुकानातून चोरी केली. पोलिस याची पुष्टी करत म्हणाले की, ते या आरोपाची चौकशी करत आहेत. परंतु, अद्याप ते कोणत्याही वैयक्तिक ओळखीची पुष्टी करू शकले नाहीत.

मंगळवारी या आरोपांना प्रत्युत्तर देत त्यांनी तत्काळ पदाचा राजीनामा दिला. त्यांनी दिलेल्या एका निवेदनात गहरामनवर म्हणाल्या, “माझ्यासाठी हे स्पष्ट आहे की, माझ्या कामाशी संबंधित तणावामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. यामुळे मी अशा प्रकारे वागू लागले जे पूर्णपणे चुकीचे आहे. मी माझ्या कृतींना माफ करू शकत नसले तरी मला हे स्पष्ट करायचे आहे. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा करणे चुकीचे नाही, यात मी कमी पडले, मला माफ करा.”

“मला माहीत होते मी बरी नाही. मानसिक आरोग्यतज्ज्ञ सांगतात की माझे अलीकडील वर्तन या घटनांशी सुसंगत आहे. मला माझे मानसिक आरोग्य लपवायचे नाही. मी माझ्या हातून घडलेल्या संपूर्ण कृत्यांची पूर्ण जबाबदारी घेते, ज्याचा मला मनापासून पश्चाताप आहे. मी मला निवडून दिलेल्या बऱ्याच लोकांना दुखावले आहे, ज्याचे मला खूप वाईट वाटत आहे.”

“माझ्या मानसिक आरोग्यासाठी सर्वात योग्य संसद सदस्य म्हणून राजीनामा देणे, स्वतःवर काम करणे आणि जगात सकारात्मक बदलासाठी कार्य करण्याचे इतर मार्ग शोधणे आहे.”

गहरामनच्या पक्षातील सहकारी मारामा डेव्हिडसन आणि जेम्स शॉ यांनी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, लोकांकडून तिला गैरवर्तन दिले जात आहे. लैंगिक आणि शारीरिक हिंसाचार धमक्यांसह जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे.

हेही वाचा : सर्व बाजूंनी सुरक्षित असणार भव्य राम मंदिर सोहळा; पहिल्यांदाच होणार ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर

तणावामुळे तुम्हालाही ‘क्लेप्टोमेनिया’ हा चोरीचा आजार होऊ शकतो का ?

गहरामनने शॉपलिफ्टिंगच्या गैरवर्तनाला मानसिक तणावामुळे होणारा आजार (क्लेप्टोमेनिया) नाव दिले आहे. परंतु, असे खरंच शक्य आहे का? जाणून घेऊ सविस्तर..

शॉपलिफ्टिंग हा चोरीच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे. हे स्पष्ट करताना तज्ज्ञ आणि जाणकारांमध्ये विरोधाभास पाहायला मिळाला आहे. काही जण म्हणतात की, शॉपलिफ्टिंग हा इमपल्स कंट्रोल डिसॉर्डरचा एक प्रकार आहे. तर इतरांचे सांगणे आहे की उदासीनता, चिंता, आघात आणि तणाव यामुळे एखादी व्यक्ती या कठीण भावनांचा सामना करण्यासाठी शॉपलिफ्ट अर्थात चोरी करण्याची अधिक शक्यता असते.

मानसशास्त्रज्ञ सांगतात की, अनेक प्रकरणांमध्ये चोरीच्या कृतीमुळे त्या व्यक्तीला तणावातून समाधानाची भावना निर्माण होते, ज्यामुळे ही व्यक्ती आपली वागणूक तशीच सुरू ठेवतात.

‘समथिंग फॉर नथिंग : शॉपलिफ्टिंग अॅडिक्शन अँड रिकव्हरी’ या पुस्तकाचे लेखक टेरेन्स डॅरिल शुलमन यांनी लिहिले आहे, “चोरी करणारे जास्तीत जास्त लोक मदतीसाठी रडतात. त्यांच्यासोबत काही चुकीचे किंवा अयोग्य घडले असते.” त्यांनी हेदेखील सांगितले आहे की, शॉपलिफ्टिंग करण्याची प्रमुख तीन भावनिक कारणे म्हणजे राग, दुःख आणि नैराश्य आहेत.

यूएस येथे स्थित एनजीओ ‘नॅशनल असोसिएशन फॉर शॉपलिफ्टिंग प्रिव्हेन्शन’ने असे म्हटले आहे की, लोक नैराश्य आणि तणावातून मद्यपान करतात. याचप्रमाणे चोरीदेखील करू शकतात.

अनेक शॉपलिफ्टिरला चोरी का करता असा प्रश्न केला असता त्यांनी असे उत्तर दिले की, हे कृत्य करताना ते अधिक उत्साही होतात. मानसशास्त्रज्ञांनी नोंद केल्याप्रमाणे शॉपलिफ्टिंगमुळे शरीरात डोपामाइन हार्मोन तयार होतात, ज्याला ‘फील गुड’ हार्मोनदेखील म्हणतात. यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती तणावात असते आणि त्याला त्या तणावातून मुक्तता हवी असेल, तेव्हा ते चोरीसारखे कृत्य करू लागतात आणि यात गुंतत जातात; कारण यातून त्यांना आनंद मिळतो.

‘क्लीव्हलँड क्लिनिक’च्या वर्तणूक आरोग्य केंद्रातील मानसशास्त्रज्ञ अॅडम बोरलँड यांनी सांगितले आहे, “शॉपलिफ्टिंग करणाऱ्या अनेक व्यक्तींना इतर व्यसन करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे डोपामाइनमुळे आनंदाची भावना निर्माण होते आणि हीच भावना हे लोक पुन्हा पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करतात.”

बीबीसीच्या अहवालानुसार, जेन नावाच्या एका महिलेने सांगितले की जेव्हा तिला जगण्यासाठी अडचणी येऊ लागल्या, तेव्हा तणावातून तिने अन्न शोधण्यास सुरुवात केली; ज्यामुळे नंतर यातूनच तिला आनंद मिळू लागला. त्यावेळी ती अशी नोकरी करत होती, ज्यामुळे ती तणावात होती. या काळात शिक्षणाची दुरवस्था झाली होती आणि याचा फटका शिक्षकांना सहन करावा लागला होता. यामुळे तणावाचा याच्याशी खूप संबंध आहे, असे तिने सांगितले.

हेही वाचा : जास्त वेळ बसून राहण्यामुळे आरोग्यावर होत आहेत दुष्परिणाम? रोज फक्त पाच ते दहा मिनिटे व्यायाम करा; जाणून घ्या, तज्ज्ञांनी सांगितलेले सहा व्यायाम

शॉपलिफ्टिंगवर उपचार घेता येऊ शकतो का?

मानसिक आरोग्यतज्ज्ञ म्हणतात की, या समस्येवर मदत करण्यासाठी अनेक उपचार कार्यक्रम आहेत. अनेक मानसिक आरोग्यतज्ज्ञ शॉपलिफ्टिंगसाठी थेरपी (सीबीटी)ची शिफारस करतात. यामुळे चोरीच्या वर्तनाला अधोरेखित करणारे ट्रिगर पॉईंट्स आणि त्यांच्या भावना ओळखण्यास मदत होते, ज्यामुळे उपाय करणे शक्य होते. काही तज्ज्ञ व्यायामाचा, मनोरंजनाचा आणि स्वतःची करमणूक करून घेण्याचा किंवा स्वतःला वेगळ्या कामांमध्ये गुंतवून घेण्याचाही सल्ला देतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stress lead to kleptomania new zealand mp resign on shoplifting allegation rac
Show comments