Suchir Balaji found dead: सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार २६ नोव्हेंबर रोजी भारतीय वंशाचे अमेरिकन संशोधक सुचित्र बालाजी यांचा मृतदेह सॅन फ्रान्सिस्को येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये सापडला. पूर्वी ते OpenAI मध्ये काम करत होते. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे म्हटले आहे. बालाजी यांच्यावर यापूर्वी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने एक लेख प्रकाशित केला होता. त्या लेखात बालाजी यांनी कंपनीवर ChatGPT-चॅटबॉट विकसित करताना यूएस कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

बालाजी कोण होते?

२५ वर्षीय बालाजी यांचे बालपण क्यूपर्टिनो, कॅलिफोर्नियामध्ये गेले. ऑक्टोबरमध्ये त्यांनी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला माहिती देताना सांगितले की, २०१३ मध्ये लंडनस्थित स्टार्टअप डीपमाइंडने एआय विकसित केले होते. ते स्वतः अटारी गेम्स खेळायला शिकले होते. त्यामुळे त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल आकर्षण निर्माण झाले. यामुळे त्यांनी न्यूरल नेटवर्क्स या मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. हे तंत्रज्ञान डिजिटल डेटा विश्लेषणासाठी मानवी मेंदूची नक्कल करते आणि तेच डीपमाइंडच्या एआय तंत्रज्ञानाचा मुख्य आधार होते.

Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”
What Suresh Dhas Said About Walmik Karad?
Suresh Dhas : “संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना मोक्का लावा, यांचा ‘तेरे नाम’ मधला सलमान…”; सुरेश धस यांची टीका
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप; “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी बिक्कडने पळवले, वाल्मिक कराड आणि…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे
shashank ketkar shares post about delayed payment
आधी निर्मात्यांवर आरोप, आता व्यक्त केली दिलगिरी! शशांक केतकरची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “गैरसमज दूर…”

अधिक वाचा: ‘Sapiosexuality’ म्हणजे काय? बुद्धिमत्तेच्या आकर्षणाचं विज्ञान आणि वाद नेमका काय आहे?

बालाजी हे २०२१ साली कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठातून संगणकशास्त्रात पदवीधर झाले आणि OpenAI मध्ये तांत्रिक कर्मचारी (Technical staff) म्हणून सहभागी झाले. एका वर्षानंतर त्यांनी कंपनीच्या GPT-4 प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली. या प्रकल्पावर काम करत असताना त्यांनी विश्लेषणासाठी मोठ्या प्रमाणात डिजिटल डेटा गोळा केला.

OpenAI च्या डेटाच्या वापराबाबत त्यांनी कोणती चिंता व्यक्त केली?

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे की, सुरुवातीला त्यांचा असा समज होता की, कंपनीला कॉपीराइटचा विचार न करता कोणताही इंटरनेट डेटा वापरण्याची मुभा आहे. त्यावेळी GPT-4 प्रकल्पाला “अस्तित्वात असलेल्या इंटरनेट सेवांशी स्पर्धा करेल” असे मानले जात नव्हते. कारण GPT-3 स्वतः ‘एक चॅटबॉट नव्हता’ तर ‘व्यवसाय आणि संगणक प्रोग्रामर्सना इतर सॉफ्टवेअर अॅप्स तयार करण्यासाठी मदत करणारे तंत्रज्ञान’ होते. नोव्हेंबर २०२२ साली ChatGPTच्या लाँचिंगनंतर मात्र त्या समजास तडा गेली. त्यानंतर बालाजी यांना खात्री पटली की, ChatGPT आणि इतर चॅटबॉट्सने ज्या सेवांकडून एआय प्रणालींसाठी डेटा घेतला गेला होता, त्या सेवा आता अनवधानानेच चॅटजीपीटीच्या स्पर्धक झाल्या होत्या.

त्यांनी OpenAI विरुद्ध कोणते आरोप केले?

त्यांच्या वैयक्तिक ब्लॉगवरील एका पोस्टमध्ये त्यांनी असा दावा केला की, OpenAI ने अमेरिकेच्या कॉपीराइट कायद्याच्या ‘फेअर यूज’ तरतुदींचे उल्लंघन केले आहे. कंपनीने जनरेटिव्ह एआय मॉडेलसाठी अभ्यास आणि विश्लेषण करण्यासाठी कॉपीराइटेड डेटाची अनधिकृत कॉपी तयार केली होती. या प्रक्रियेमुळे जनरेटिव्ह मॉडेल्स ऑनलाइन डेटाची नक्कल करू शथतात आणि इंटरनेटवरील सर्वच गोष्टींना पर्याय ठरू शकतात. एआयचा प्रभाव एवढा वाढला आहे की, अनेक गोष्टींच्या शोधासाठी नेटकर आता ‘सर्च’ ऐवजी जनरेटिव्ह एआयचा वापर करतात. तर पलीकडे मात्र अशेही लक्षात येते आहे की, एआय मॉडेल्स प्रसंगी चुकीची किंवा निरर्थक माहितीही मोठ्या प्रमाणावर निर्माण करत आहेत, याला नेटवरचे ‘हॅल्यूसिनेशन्स’ असेही म्हटले जात आहे. “तुम्हीही माझ्यासारखाच विचार करत असाल, तर तुम्हाला कंपनी सोडण्याशिवाय पर्याय नाही,” असे त्यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले होते.

OpenAI ने या आरोपांवर कोणती प्रतिक्रिया दिली?

डिसेंबर २०२३ मध्ये ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि इतरांनी OpenAI आणि Microsoft विरोधात त्यांच्याकडील कॉपीराइटेड सामग्रीचा वापर ‘प्रशिक्षण डेटा’ म्हणून केल्याबद्दल खटले दाखल केले.

OpenAI ने बालाजी यांचे आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळले. कंपनीने ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही आमची एआय मॉडेल्स सार्वजनिकरित्या उपलब्ध डेटाचा उपयोग करून विकसित करत असतो. हा उपयोग फेअर यूज आणि संबंधित तत्त्वांना धरूनच आहे. तसेच दीर्घकाळ प्रस्थापित आणि व्यापकपणे मान्य असलेल्या कायदेशीर आधारांवरही आधारित आहे. आम्ही या तत्त्वाला निर्मात्यांसाठी न्याय्य, नवोपक्रमासाठी अनिवार्य आणि अमेरिकेच्या जागतिक स्पर्धेसाठी महत्त्वाचे मानतो.”

अधिक वाचा: Nazca Lines AI discovery: अत्याधुनिक AIने उलगडली प्राचीन कातळशिल्पं!

एआयचा वापर, जनरेटिव्ह एआय आदींबाबत सध्या जगभरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. विख्यात लेखक, इतिहासकार युवाल नोआ हरारी यांनीही त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये एआयच्या वाढलेल्या वापराविरोधात भूमिका घेतलेली आहे. एवढेच नव्हे तर मध्यंतरी जगभरातील १०० विचारवंत, लेखकांनीही एकत्र येऊन एआयच्या वाढच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली होती. एआयमुळे लोक आत्महत्या करण्यासही प्रवृत्त ठरतील, अशीही टीका करण्यात आली होती. एआयच्या या वापराविरोधात शड्डू ठोकणाऱ्या सुचित्र बालाजी यांच्या मृत्यू नंतर आता पुन्हा एकदा हा वाद जोरदार उफाळून वर आला आहे.

Story img Loader