Sunita Williams नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर आठ दिवसांसाठी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी अंतराळात गेले होते. परंतु, त्यांना अंतराळात जाऊन आता दोन महिने उलटून गेले आहेत. यानात बिघाड झाल्यामुळे त्यांच्या परतीच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता त्यांना पृथ्वीवर परतण्यासाठी २०२५ उजाडेल, असा इशाराही नासाने दिला आहे. याचे नेमके कारण काय? त्यांच्या परतीच्या मार्गात का अडचणी निर्माण होत आहेत? याचा अर्थ काय? ते आपण समजून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विल्यम्स, विल्मोर अजूनही अवकाशात का अडकलेत?

५ जून रोजी सुनीता विल्यम्स आणि विल्मोर बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर (आयएसएस) रवाना झाले. ही स्टारलायनरची पहिलीच मानवी मोहीम होती. ते आठ दिवसांत परत येण्याची अपेक्षा होती; परंतु त्यांच्या परतीच्या प्रवासापूर्वी अंतराळयानातील काही प्रमुख यंत्रणांमध्ये समस्या आढळून आल्या. प्रोपल्शन सिस्टीममध्ये म्हणजेच यानाला पुढे ढकलणार्‍या उपकरणात गळती झाली आणि त्यातील काही थ्रस्टर्स बंद पडले. स्टारलायनर झेपावले तेव्हाच या उपकरणात त्रुटी होत्या; मात्र असे असूनही यान सुरक्षितपणे अंतराळस्थानकावर पोहोचले.

यानात बिघाड झाल्यामुळे सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर यांच्या परतीच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : Earthquake In Japan: जपानने पहिल्यांदाच दिला महाभूकंपाचा इशारा; याचा नेमका अर्थ काय?

सुरुवातीला या समस्या लहान वाटल्या; परंतु यान पृथ्वीवरून अंतराळात झेपावल्यापासून कॅप्सूलमधून पाचवेळा हेलियमची गळती झाली. हेलियम वायू रॉकेटवर दबाव आणतो आणि अंतराळयानाला पुढे नेण्यास मदत करतो. परंतु, हा एकमेव मुद्दा नाही. ‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार, २८ मॅन्युव्हरिंग थ्रस्टर्सपैकी पाच थ्रस्टर्स पूर्णपणे बंद पडले आहेत. अंतराळातील क्रू आणि ह्युस्टनमधील मिशन व्यवस्थापक या बाबतीतील समस्या निवारणाचा पाठपुरावा करीत आहेत. बोईंगने दावा केला आहे की, सिम्युलेशनद्वारे बहुतेक समस्यांचे निराकरण केले गेले आहे आणि २७ थ्रस्टर्स आता पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत. परंतु, नासाने बोईंगकडे अधिक डेटा देण्याची विनंती केली आहे. कारण- अशी शंका वर्तवण्यात आली आहे की, स्टारलायनर पृथ्वीवर परत येण्याच्या दृष्टीने असुरक्षित आहे.

स्टारलायनर पृथ्वीवर परतण्यासाठी योग्य नसल्यास पुढे काय?

सध्या बोईंग आणि नासा अंतराळयानामधील समस्या सोडविण्यासाठी झटत आहेत. हे दोन अंतराळवीर दुसऱ्या वाहनात म्हणजेच ‘स्पेस एक्स’च्या क्रू ड्रॅगनमध्ये परत येऊ शकतील का याची तपासणी नासा करीत आहे. त्यात बुधवारी असे म्हटले आहे की, जर स्टारलायनर परतीसाठी अजूनही असुरक्षित असल्याचे लक्षात आल्यास अंतराळवीर फेब्रुवारी २०२५ मध्ये ‘स्पेस एक्स’च्या क्रू ड्रॅगनवर परत येऊ शकतात. एलोन मस्कच्या ‘स्पेस एक्स’ने हाती घेतलेले मिशन सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे. सुरुवातीला चार क्रू मेंबर्स या यानावर जाणार होते. मात्र, विल्यम्स व विल्मोर यांना परत आणण्यासाठी दोन जागा रिकाम्या ठेवल्या जाऊ शकतात. स्पेस एक्स हे ‘कमर्शियल क्रू प्रोग्राम’ (सीसीपी) अंतराळयान आहे. ड्रॅगन कॅप्सूल क्रू-९ मोहीम सुरुवातीला १८ ऑगस्ट रोजी लाँच करण्यात येणार होती; परंतु ती २४ सप्टेंबरच्याही पुढे ढकलण्यात आली आहे.

याचा अर्थ अंतराळवीर आठ महिन्यांहून अधिक काळ अंतराळात घालवतील. परंतु, नासाच्या अधिका-यांनी सांगितले की, पुढील पावलाबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. ‘बीबीसी’च्या वृत्तानुसार अंतिम निर्णयासाठी एक आठवडा किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो. या संकटातून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग नाही. अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी अनेक योजना अस्तित्वात आहेत; ज्यात त्यांना रशियन सोयुझ क्राफ्टवरदेखील परत आणले जाऊ शकते, असे ‘अमेरिका टुडे’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे.

अंतराळवीरांवर याचा काय परिणाम होणार?

अंतराळवीर ६० दिवसांपासून अंतराळस्थानकात अडकले आहेत. अलीकडे ‘नासा’ने अतिरिक्त कपड्यांसह अधिक अन्नपुरवठा करण्यासाठी ‘स्पेस एक्स’ रॉकेटचा वापर केला. अलीकडील ब्रीफिंग कॉलमध्ये विल्यम्स यांनी पत्रकारांना सांगितले, “आम्ही येथे पूर्णपणे कामात व्यग्र आहोत. इथल्या क्रूबरोबर आम्ही मिसळून गेलो आहोत. असे तरंगत राहणे चांगले वाटत आहे. अंतराळात राहणे आणि आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकातील पथकाबरोबर काम करणे छान वाटत आहे.” विल्यम्स व विल्मोर हार्मनी मॉड्युलवर काम करीत आहेत. हे मॉड्युल आंतरराष्ट्रीय अंतराळ प्रयोगशाळा आणि अवकाशयान यांच्यातील जोडणी मार्ग म्हणून काम करते.

मात्र, अवकाशात जास्त काळ राहण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे, जी चिंताजनक बाब आहे. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या दीर्घकाळ संपर्कामुळे विल्यम्स यांच्या हाडांची घनता कमी होत आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, यामुळे दृष्टिदोष आणि डीएनए खराब होण्याचा धोका यांसारख्या आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात, असे सांगण्यात आले आहे. अंतराळवीरांना परत आणणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे नासाच्या स्पेस ऑपरेशन्सचे सहयोगी प्रशासक केन बोवर्सॉक्स यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : ‘या’ देशात उष्णतेच्या लाटेमुळे रक्ताचा भीषण तुटवडा, तज्ज्ञांनी दिला संकटाचा इशारा; कारण काय?

दोन्ही अंतराळवीर ठरलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ अंतराळात घालवणार आहेत. परंतु, असेही काही अंतराळवीर आहेत, ज्यांनी यापेक्षाही अधिक काळ अंतराळात घालवला आहे. त्यातील एक नाव आहे वॅलरी पोलेकोव्ह. ते ४०० हून अधिक दिवस अंतराळस्थानकावर होते. त्यामुळे आता नासा या अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नेमक्या कोणत्या मार्गाचा अवलंब करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.