लिंगाधारित भेदभाव दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने एखाद्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश, वकिलांनी, तसेच न्यायालयाच्या कामकाजात महिलांशी संबंधित वापरले जाणारे काही शब्द बदलले आहेत. सध्या प्रचलित शब्दांऐवजी सर्वोच्च न्यायालयाने पर्यायी शब्द दिले असून, त्यासाठी एक महिती पुस्तिकादेखील (Hand Book) प्रसिद्ध केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता न्यायालयीन कामकाज, वकील, न्यायाधीशांना महिलांशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या पर्यायी शब्दांचा वापर करावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर हे पर्यायी शब्द काय आहेत? सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेताना काय म्हटले आहे? हे जाणून घेऊ या…

सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या लैंगिकतेशी संबंधित शब्दांना पर्यायी शब्द दिले आहेत. त्यासाठी न्यायालयाने माहिती पुस्तिका प्रकाशित केली आहे. या माहिती पुस्तिकेत ‘करिअर वूमन’ या शब्दाला फक्त वूमन (महिला) तसेच ‘इव्ह टिजिंग’ या शब्दाला स्ट्रीट सेक्शुअल हॅरॅसमेंट (रस्त्यावर होणारा लैंगिक छळ), ‘फोर्सिबल रेप’ या शब्दाला रेप (बलात्कार) असे पर्यायी शब्द सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या शब्दांची माहिती पुस्तिका सार्वजनिक करताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. “न्यायिक प्रक्रियेत महिलांसाठी जेथे जुन्या, पुराणमतवादी, तसेच चुकीच्या संकल्पना असतात, तेथे संविधान आणि कायद्याच्या परिवर्तनवादी विचारांना विरोध होतो. भारतीय संविधानाला लिंगाचा विचार न करता, प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार असावेत, असे अभिप्रेत आहे,” असे धनंजय चंद्रचूड म्हणाले.

Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nagpur Prostitution , college girls Prostitution Nagpur,
नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
Who is Telangana Thalli?
Telangana Thalli : ‘तेलंगणा थळ्ळी’ कोण आहेत? त्यांच्या नव्या पुतळ्यावरुन नेमका वाद का पेटला आहे?
Chandrakant Patil appeal to Pune residents regarding the book festival Pune news
नागपूरचा की पुण्याचा पुस्तक महोत्सव मोठा करायचा हे तुम्ही ठरवा- चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन
markadwadi women angry
Markadwadi : “मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा पेटला पाहिजे”, शरद पवारांसमोरच महिलांनी एल्गार पुकारला!

न्यायालयाने सार्वजनिक केलेल्या माहिती पुस्तिकेत काय आहे?

सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेली माहिती पुस्तिका एकूण ३० पानांची आहे. न्यायाधीश, वकील, तसेच न्यायालयीन प्रक्रियेत काम करणाऱ्यांना महिलांविषयीच्या जुन्या, रूढीवादी संकल्पना समजून घेण्यास मदत व्हावी, तसेच त्यासाठी पर्यायी शब्द असावेत यासाठी ही माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. या पुस्तिकेत महिलांसाठी वापरल्या जाणाऱ्या जुन्या संकल्पना, शब्द, म्हणी, वाक्प्रचार यांची यादी देण्यात आली आहे. या माहिती पुस्तिकेतील शब्द न्यायालयीन कामकाजात हमखास वापरले जातात.

सर्वोच्च न्यायालयाने ही माहिती पुस्तिका सादर करताना दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्काराचा तसेच केरळ उच्च न्यायालयाने २०१७ साली दिलेल्या एका निकालाचा उल्लेख केला आहे. निर्भयाप्रकरणी निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने बलात्कार झाला हे सूचित करण्यासाठी वारंवार रॅविश्ड (ravished) हा शब्द वापरला होता.

कोणकोणत्या शब्दांसाठी दिले पर्यायी शब्द?

महिलांविषयीचा रूढीवादी दृष्टिकोन असलेले शब्द सर्वोच्च न्यायालयाने चुकीचे ठरवले आहेत. तसेच न्यायालयाने त्यासाठी पर्यायी शब्द दिले आहेत. जसे की न्यायालयाने कॉन्क्युबाईन / कीप या शब्दांसाठी ‘एखाद्या पुरुषाचे पत्नीव्यतिरिक्त लैंगिक संबंध असलेली अन्य स्त्री’ अशी पर्यायी व्याख्या सुचवली आहे. तसेच ‘वूमन ऑफ इझी व्हर्च्यू’ (लैंगिक सुखासाठी उपलब्ध असलेली स्त्री) या व्याख्येला फक्त ‘वूमन’ म्हणजेच स्त्री, ‘चाइल्ड प्रोस्टिट्युट’ या शब्दाला ‘तस्करी केलेले मूल’ असे पर्यायी शब्द दिले आहेत.

न्यायाधीशांनी योग्य शब्द वापरणे का गरजेचे आहे?

न्यायाधीशांनी योग्य शब्द वापरणे गरजेचे असल्याचे या माहिती पुस्तिकेत सांगण्यात आले आहे. एखाद्या न्यायाधीशाने वापरलेल्या शब्दांची मदत घेऊनच कायद्याचा अर्थ लावला जातो. तसेच वापरलेल्या शब्दांमधून न्यायाधीशाची समाजाबद्दलची धारणा स्पष्ट होते, असेही या पुस्तिकेत म्हटले आहे. “अगोदर अस्तित्वात असलेल्या म्हणजेच जुन्या संकल्पनांचा वापर केल्यास निकाल बदलणार नाही. मात्र, आपल्या संवैधानिक मूल्यांविरोधात असणाऱ्या गोष्टींना या भाषेमुळे बळ मिळू शकते. जगण्याच्या नियमांसाठी भाषा ही फार महत्त्वाची आहे. कायद्याचे महत्त्व या शब्दांमधूनच प्रतीत होते. शब्द हे कायद्याचे वाहक आहेत. शब्दांच्या मदतीनेच कायदा बनवणाऱ्यांचा, तसेच न्यायाधीशांचा उद्देश स्पष्ट होतो,” असेही या पुस्तिकेत म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने कोणकोणत्या शब्दांत बदल केला?

(अगोदर जुना शब्द, नंतर न्यायालयने दिलेला पर्यायी शब्द, व्याख्या)

अडल्ट्रेस (व्यभिचार करणारी स्त्री) – अशी स्त्री; जिचे अन्य पुरुषाशी विवाहबाह्य लैंगिक संबंध आहेत.

अफेअर- लग्नाव्यतिरिक्त बाहेरचे नाते

करिअर वूमन- वूमन

चाइल्ड प्रोस्टिट्युट – तस्करी केलेले छोटे मूल

ड्युटीफुल वाइफ, फेथफुल वाइफ, गुड वाइफ- वाइफ

इझी व्हर्च्यु- वूमन

फॉलन वूमन- वूमन

फोर्सिबल रेप- रेप

हूकर- सेक्स वर्कर

हाऊसवाइफ- होममेकर

इंडियन वूमन, वेस्टर्न वूमन- वूमन

स्लट- वूमन

व्होअर- वूमन

प्रोस्टिट्युट- सेक्स वर्कर

प्रोव्हायडर, ब्रेडविनर- एम्प्लॉईड, अर्निंग

रॅविश्ड- रेप्ड, सेक्शुअली हॅरॅस्ड

सेडक्ट्रेस- महिला

सेक्स चेंज- जेंडर ट्रान्झिशन

सर्वोच्च न्यायालयाने असे अनेक पर्यायी शब्द दिले आहेत.

Story img Loader