जागतिक फुटबॉल संघटनेने (फिफा) अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर क्रीड जगतात नाराजी व्यक्त केली गेली. भारतीय फुटबॉल महासंघात (एआयएफएफ) तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप वाढल्याचे कारण देत ही करण्यात आली होती. या निलंबानाच्या काराईनंतर सर्वोच्च न्यायालयाने एआयएफएफवरील प्रशासकीय समितीचा कारभार संपुष्टात आणण्याचा आदेश दिला आहे. यासोबतच न्यायालयाने एआयएफएफची निवडणूकदेखील आठवडाभराने लांबणीवर टाकण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान, कोर्टाच्या या आदेशानंतर भारतीय फुटबॉल महासंघावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली जाणार का? कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी भारताला मिळणार का? असे विचारले जात आहे.

हेही वाचा >> FIFA suspends AIFF: ‘फिफा’चा भारताला मोठा धक्का, फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
India Alliance News
INDIA Alliance : इंडिया आघाडी महाराष्ट्रातील निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, भाजपाने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Why Siraj Get Heavier Penalty Than Head after Adelaide Controversy
Siraj-Head Fight: मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडपेक्षा ICCने जास्त शिक्षा का ठोठावली? काय आहे नेमकं कारण?
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

कोर्टाने काय आदेश दिला?

जागतिक फुटबॉल संघटनाने अखील भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली होती. भारतीय फुटबॉल महासंघात (एआयएफएफ) तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप वाढला असल्याचे सांगत ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर एआयएफएफवर नियुक्त केलेली प्रशासकीय समिती हटवण्यात यावी अशी मागणी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर या मागणीची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने ही समिती रद्द केली. तसेच एआयएफएफचा दैनंदिन कारभार प्रभारी महासचिवांनी पाहावा असे निर्देश कोर्टाने दिले. मागील वर्षी या समितीची नियुक्ती करण्यात आली होती. यासोबतच येत्या २८ ऑगस्ट रोजी होणारी एआयएफएफची निवडणूक एका आठवडा पुढे ढकलण्याचा निर्णयदेखील कोर्टाने दिला. या निर्णयामुळे आता एआयएफएफला आपले निर्णय स्वत: घेता येतील. तसेच एआयएफएफमध्ये कोणत्याही त्रयस्त समितीचा हस्तक्षेप नसेल.

हेही वाचा >> विश्लेषण : इम्रान खान यांच्यावर दहशतवादाचे आरोप; पाकिस्तानातील राजकीय तणावाची नेमकी कारणं काय?

कोर्टाने एआयएफएफ निवडणुकीच्या पद्धतीमध्येही काही बदल केला आहे. या निवडणुकीसाठीच्या मतदार यादीमध्ये राज्य तसेच केंद्रशासित संटनांचे ३६ प्रतिनिधी असावेत. तसेच एआयएफएफच्या कार्यकारिणीत २३ सदस्य असावेत. या कार्यकारिणीत सहा खेळाडूं असावेत. यामध्ये दोन महिला खेळाडूंचा समावेश असावा अशी सूचनादेखील कोर्टाने केली.

हेही वाचा >> विश्लेषण : ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या प्रिक्वलमध्ये उलगडणार ‘हाऊस ऑफ ड्रॅगन’चं रहस्य; कोणत्या प्रश्नांची मिळणार उत्तरं? जाणून घ्या…

कार्यकारी समिती संपुष्टात आल्यामुळे काय होणार?

अखील भरतीय महासंघावरील कार्यकारी समिती संपुष्टात आल्यामुळे एआयएफएफला काही प्रमाणात स्वातंत्र्य मिळेल. एआयएफएफचे कामकाज आता महासंघाद्वारेच केले जाईल. कार्याकारी समिती नसल्यामुळे जागतिक फुटबॉल महासंघाच्या नियमाप्रमाणेच एआयएफएफ काम करेल.

भारताला कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद मिळणार?

हेही वाचा >> विश्लेषण : महाराष्ट्राच्या सुपुत्राचा मेक्सिकोत पुतळा, कोण होते स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग खानखोजे?

दरम्यान, एआयएफएफमध्ये त्रयस्त समितीचा हस्तक्षेप वाढल्यामुळे फीफआने निलंबनाची कारवाई केली होती. मात्र आता प्रशासकीय समितीच नसल्यामुळे फिफाकडून निलंबनाची कारवाई रद्द केली जाऊ शकते. परिणामी भारताला कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद मिळू शकते.

Story img Loader