मनोरंजनसृष्टी बाहेरून जितकी झगमगीत दिसते, पण आतून या विश्वाचा विद्रूप चेहेरा आपण बऱ्याचदा पाहिला आहे. ड्रग्स, डिप्रेशन, आणि आत्महत्या या गोष्टी या क्षेत्रात आपल्याला सरसकट पाहायला मिळतात. नुकतंच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आणि कित्येकांच्या पायाखालची जमीनच हादरली. तिने मालिकेच्या सेटवर गळफास लावून जीवन संपवल्याचं स्पष्ट झालं. तुनिषा ही केवळ २० वर्षांची होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलंय. तिने तिच्या करिअरची सुरुवात इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून केली होती. तुनिषा सोनी सब टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’मध्ये मुख्य भूमिका साकारत होती.

तुनिषाच्या आत्महत्येमुळे पुन्हा सेलिब्रिटी लोकांचं खासगी आयुष्य आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या यावर चर्चा सुरू झाली आहे. कोविड काळात अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली तेव्हापासून या गोष्टींची चर्चा व्हायला सुरुवात झाली. खरंतर डिप्रेशन, आत्महत्या हा मनोरंजनसृष्टीला लागलेला खूप जुना शाप आहे. गुरु दत्त, परवीन बाबी, राज किरणपासून कित्येक कलाकारांना या गोष्टीचा सामना करावा लागला आहे. कारणं जरी वेगवेगळी असली त्याचं रूपांतर डिप्रेशनमध्येच झालं. पण यशाच्या शिखरावर विराजमान असलेली ही सेलिब्रिटी मंडळी अचानक आत्महत्या का करतात? त्यामागची कारणं नेमकी काय आहेत? याबद्दल लेखक रॉबर्ट मोट्टा यांनी त्यांच्या ‘suicide’ या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे. या पुस्तकातील काही माहिती लेखिका निशी मिश्रा आणि क्षोभना श्रीवास्तव यांनी मांडली आहे. या पुस्तकातील रिसर्चनुसार यामागची नेमकी कारणं काय हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करुयात.

Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
school boy suicide news
शालेय साहित्य न मिळाल्याने मुलाची आत्महत्या; पित्यानेही संपवले जीवन
suicide in barabanki uttar pradesh
“अधुरी एक कहाणी…”, पत्नीच्या कुटुंबीयाच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; फेसबूकवर लिहिली सुसाईड नोट!
due to torture of wife and in laws youth committed suicide
पत्नीच्या छळामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नी,सासूसह मेहुणीविरुद्ध गुन्हा दाखल
Nagpur,couple made video before committing suicide on their wedding anniversary
नागपूर : लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याची आत्महत्या, अपत्य होत नसल्यामुळे…
nashik 25 year old woman hanged herself
जिल्हा रुग्णालय आवारात महिलेची आत्महत्या
Young man commits suicide after being harassed by moneylender Pimpri chinchwad news
धक्कादायक: “पत्नीकडे अंतिम संस्कारासाठी पैसे नाहीत”.., मुलांनो जे मिळेल ते खा, सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

यशस्वी लोक आत्महत्या का करतात?

प्रत्येकालाच यश किंवा अपयश पचवता येतंच असं नाही. खासकरून मनोरंजनविश्वात प्रत्येकालाच या गोष्टी नीट हाताळता येत नाहीत. काही लोक छोट्याश्या गोष्टीमुळे हुरळून जातात तर एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की हिरमुसून जातात आणि याचंच रूपांतर हळूहळू डिप्रेशनमध्ये होतं. मग याच गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी ती व्यक्ति एकलकोंडी होते, विविध व्यसनांच्या आहारी जाते आणि यानंतरच हळूहळू त्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार घोळू लागतात. आत्महत्या करण्यामागे केवळ एक गोष्ट कारणीभूत नसते, शारीरिक किंवा मानसिक व्याधी, रिलेशनशीप प्रॉब्लेम, कामाचा तणाव, आर्थिक तंगी, कायदेशीर समस्या, घरगुती समस्या अशा विविध कारणांमुळेच आत्महत्येचे विचार मनात यायला सुरुवात होते. तरीही यशस्वी माणसं आत्महत्या करतात यामागची कारणंही तितकी वेगळी आहेत.

आणखी वाचा : २० वर्षीय तुनिषा शर्माच्या नावे कोट्यवधींची संपत्ती, आकडा ऐकून व्हाल थक्क

१. ‘Perfection’चं प्रेशर :

सेलिब्रिटी किंवा यशस्वी लोकांच्या बाबतीत ही गोष्ट तुम्हाला बऱ्याचदा आढळून येईल. इतरांशी स्पर्धा करण्याच्या नादात स्वतःला इतरांपेक्षा परफेक्ट सिद्ध करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. शिवाय खासगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यामध्येसुद्धा ते स्वतःला परफेक्ट असल्याचं सिद्ध करायचा आटोकाट प्रयत्न करतात, पण त्यात प्रत्येकालाच यश मिळतं असं नाही. याच ‘परफेक्क्षनीजम’चा जेव्हा कडेलोट होतो तेव्हा ही लोक आत्महत्येचा विचार कारायल सुरुवात करतात. इतरांशी स्पर्धा करताना स्वतःवर असलेला विश्वासही ही लोक गमावून बसतात. अर्थात ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी आणखी जास्त रिसर्चची गरज आहे, पण ही यामागची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

२. एकाकीपणा :

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला एका मुलाखतीमध्ये विचारलं होतं की “यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर नेमकं कसं वाटतं?” त्यावर त्याने उत्तर दिलं “खूप एकटं वाटतं.” अर्थात हे शाहरुखसारखं यशस्वी अभिनेता जरी सांगत असला तरी तो इतर लोकांपेक्षा नक्कीच वेगळा आहे. हीच गोष्ट बऱ्याच यशस्वी लोकांच्या बाबतीत आढळून येते. एकाकी वाटण्यासाठी केवळ यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायची गरज असते असं नाही. कामाचं स्वरूप आणि त्यात योग्य समतोल न साधल्याने मैत्री, प्रेम, लग्न अशा गोष्टींवरसुद्धा परिणाम होतो आणि मग यात योग्य समतोल न साधता आल्याने ती व्यक्ती आपसूकच या गोष्टीपासून लांब राहायला सुरुवात करते आणि हळूहळू एकलकोंडी होते. हळूहळू हा एकाकीपणा इतका वाढतो की छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा ती व्यक्ती कोणाशी शेअर करू शकत नाही. त्यामुळे योग्य संवाद न झाल्याने त्या व्यक्तीच्या मनात कालांतराने आत्महत्येचे विचार येऊ लागतात.

३. अपयश पचवता येणं :

यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यशाचा गर्व जसा धोकादायक तसंच अपयशाचं ओझंसुद्धा हानिकारकच असतं. ज्याला या दोन्ही परिस्थितींशी झुंज देता येते तोच खरा माणूस. सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध लोकांच्या बाबतीत याच गोष्टीची कमतरता आपल्याला प्रकर्षाने जाणवते. १७ वर्षांची कुस्तीपटू रितिका फोगाटची आत्महत्या हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. एखादी गोष्ट आपल्या मानसारखी न घडल्याने हतबलतेची भावना मनात निर्माण होते आणि मग यातूनच आत्महत्येचा विचार डोक्यात घोळायला सुरुवात होते.

आणखी वाचा : तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी बॉयफ्रेंड शिझान खान पोलिसांनी केली अटक; अभिनेत्रीने त्याच्याच खोलीत घेतलेला गळफास

४. सोशल मीडिया :

आपण कितीही नाकबूल केलं तरी सोशल मीडिया यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. सोशल मीडियावर आपण स्वतःची जी खोटी प्रतिमा तयार करतो त्यामुळे समाजात त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. शिवाय या सोशल मीडियामुळे एखाद्या व्यक्तीला अंधपणे फॉलो करायचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे. यामुळे बऱ्याचदा काही लोक स्वतःचं अस्तित्त्व हरवून बसतात आणि ते आभासी विश्वच त्यांच्यासाठी खरं विश्व बनतं. खासकरून मनोरंजनक्षेत्रात तर सोशल मीडियावरून जेवढी स्पर्धा चालते ती किती जीवघेणी आहे याची उदाहरणं आपण बघितली आहेत. २ मिनिटांच्या व्हिडिओने स्टार बनलेल्या व्यक्तीला अपयश नेमकं काय असतं याची पुसटशी कल्पनाही नसते. जेव्हा त्यांना ती कल्पना येते तेव्हा मात्र वेळ आधीच हातातून निसटून गेलेली असते.

Story img Loader