सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. आज अगदी लहान मुलांच्या हातातही सहजपणे मोबाईल पाहायला मिळतो. परंतु, याचाच लोक गैरफायदा घेत मुलांची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे स्वीडनमध्ये मोठे संकट निर्माण झाले आहे. ‘कॉन्ट्रॅक्ट किलिंग’मध्ये ११ वर्षे वयाच्या मुलांचा वापर करण्यासाठी गुन्हेगार आपल्या टोळ्यांमध्ये त्यांचा समावेश करून घेत आहेत. अलीकडच्या वर्षांत देशभरात हत्यांचे प्रमाण वाढले आहे. कारण- टोळ्या अमली पदार्थांच्या बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि एकमेकांना बाहेर काढण्यासाठी विवादात गुंतल्या आहेत. २०२३ मध्ये गोळीबारात ५३ जणांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक निष्पापांचा समावेश होता. लहान मुलांची फसवणूक करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर कसा केला जात आहे? त्यामागील कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ.

कॉन्ट्रॅक्ट किलर

‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, टोळ्यांनी संपूर्ण स्वीडनमध्ये डझनभर बाल कॉन्ट्रॅक्ट किलरचा आपल्या टोळीमध्ये समावेश करून घेतला आहे. हे बहुतेक सोशल मीडियावरील मध्यस्थांकडून केले जाते, जे सुमारे १३,००० डॉलर्सची ऑफर देतात. स्वीडनमधील टोळ्या किशोरवयीन मुलांचा समावेश करून घेण्यासाठी टेलीग्राम, स्नॅपचॅट व सिग्नल यांसारख्या एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅपचा वापर करतात. उदाहरणार्थ- स्वीडिश अमली पदार्थांच्या टोळीत १४ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. एक युवक युथ क्लबमध्ये फिफा व्हिडीओ गेम खेळत असताना त्याला एक मेसेज मिळाला. फर्नांडो अशी ओळख असणाऱ्या या मुलाला बंदुका गोळा करण्याचे, लक्ष्याच्या घरी जाण्याचे आदेश देण्यात आले होते. अशा प्रकारे मुलांना मध्यस्थाकडून आदेश देण्यात येतात. त्या आदेशांत लक्ष्याच्या घरी पिस्तूल पोहोचवणे, नियोजित ठिकाणाला कुलूप असल्यास ते दगडाने फोडून काम पूर्ण करणे आणि संपूर्ण काम संपल्यावर घरी येऊन अंघोळ करून कपडे धुणे यांसारख्या कृत्यांचा समावेश असतो.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : पाकिस्तानच्या हॉटेलसाठी न्यूयॉर्कवासीयांना अब्जावधीचा भुर्दंड का?

‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, स्वीडनमध्ये बाल संशयितांचा समावेश असलेल्या हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०२३ च्या पहिल्या आठ महिन्यांत झालेल्या हत्या प्रकरणांत ३१ मुलांवर संशय होता. स्वीडनमधील सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार या वर्षातील याच कालावधीतील आकडा १०२ वर पोहोचला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अनेक मुले गरीब किंवा परदेशी पार्श्वभूमीतील आहेत. एक्स्प्रेसच्या मते, युरोपियन युनियनमध्ये स्वीडनमध्ये बंदुकीच्या हिंसाचाराचा दर सर्वाधिक आहे. स्वीडनमध्ये मुख्यत्वे बाल्कनमधून बेकायदा बंदुका आणल्या जातात.

हत्या प्रकरणात ११ वर्षीय मुलाचा समावेश

११ वर्षांच्या मुलाचादेखील स्वीडनमधील एका हत्या प्रकरणात समावेश असल्याचे तपासात उघड झाले. इन्स्टाग्रामवर त्याने मध्यस्थाबरोबर साधलेल्या संवादातून हे प्रकरण पुढे आले. वर्मलँडच्या पश्चिम प्रांतात गेल्या वर्षी झालेल्या एक्स्चेंजच्या पोलीस तपासानुसार, या मुलाचा वापर हत्या करण्यात येणाऱ्या ठिकाणी कपडे आणि काही गोष्टी पोहोचविण्यासाठी करण्यात आला होता. या प्रकरणात १८ ते २० वयोगटातील चार तरुणांवर ११ ते १७ वयोगटातील चार अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी टोळीत काम करण्यासाठी भरती केल्याचा आरोप आहे. या सर्वांना गुन्हे करण्यापूर्वीच अटक करण्यात आली होती. प्राथमिक चौकशीत अनेक स्क्रीनशॉट्स आहेत, जे तरुणांनी मुखवटे घालून एकमेकांना पाठवले आहेत.

टोळीमध्ये मुलांची भरती करण्याचे कारण काय?

स्टॉकहोम युनिव्हर्सिटी क्रिमिनोलॉजीचे प्राध्यापक स्वेन ग्रनाथ यांनी एएफपीला सांगितले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या टोळ्यांच्या ग्रुपची साहसी आणि रोमांचक अशी नावे आहेत.स्वेन ग्रनाथ यांनी अलीकडे घडलेली घटना सांगितली. जिथे एका १६ वर्षांच्या मुलाने दोन मुलांच्या वडिलांची हत्या केली आणि नंतर त्याची पत्नी व मुलांना मारण्याचा प्रयत्न केला. “हे इतके क्रूर कृत्य आहे की, तुम्ही त्यावर विश्वास ठेवू शकत नाही,” डी सँटोस यांनी वृत्तपत्राला सांगितले. “एका परिवारातील वडिलांची हत्या करण्यात आली. आईला पाठीवर गोळी लागली. ती एक डॉक्टर होती आणि त्यामुळे तिने स्वतःला व मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी झाल्याने ते दोघेही वाचले. मी म्हणेन की, माझ्या कारकिर्दीतील ही सर्वांत वाईट घटना आहे“, असे त्या म्हणाल्या.”

टोळ्या मुली आणि मानसिक अपंग मुलांची भरतीही करत आहेत. इतर गुन्हेगार वैयक्तिकरीत्या भरती करत आहेत. ते त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात फिरणाऱ्या मुलांना शोधतात. स्वेन ग्रनाथ म्हणाले की, ज्या मुलांची भरती केली जाते, ते अनेकदा अभ्यासात फार हुशार नसतात, त्यांना व्यसनाच्या समस्या असतात किंवा ते आधीच कायद्याने अडचणीत आलेले असतात. “त्यांना अशा संघर्षांमध्ये भरती केले जाते, ज्यांच्याशी त्यांचा कोणताही संबंध नाही आणि त्यांना पैशांचे आमिष दाखवले जाते,” असे ते पुढे म्हणाले.

हेही वाचा: कोल्ड्रिंकसह तंबाखू, सिगारेट महागणार? काय आहे कारण?

मुलांचे शोषण

नॅशनल कौन्सिल फॉर क्राईम प्रिव्हेन्शन (बीआरए)च्या अहवालानुसार, काही मुले पैसे, ओळख किंवा आपलेपणाची भावना शोधत असतात. ते चकचकीत कपडे आणि अखंड निष्ठा यांसारख्या गोष्टींनी आकर्षित होतात, असे तज्ज्ञ म्हणतात. “आजकाल प्रत्येकाला गुन्हेगार व्हायचे आहे,” असे २५ वर्षीय टोळीचा माजी सदस्य व्हिक्टर ग्रेवे याने सांगितले. तो १३ वर्षांचा असताना टोळीत सहभागी झाला होता. “मुलांची हीच इच्छा आहे हे पाहून दुःख होत आहे. काही सोशल मीडिया वापरकर्ते ‘टिकटॉक’वर गुन्हेगारी जीवनशैलीचा गौरव करतात; ज्यामुळे मुलांचे शोषण होते,” असे स्टॉकहोमच्या पश्चिमेकडील ओरेब्रो येथील पोलीस कमांडर टोनी क्विरोगा यांनी एएफपीला सांगितले. सोशल मीडियावर गुन्हेगार खोट्या नावाने असतात. अलीकडील ‘बीआरए’च्या अहवालानुसार, मुलांची भरती करणे हा टोळ्यांच्या व्यवसाय मॉडेलचा एक भाग आहे.

Story img Loader