ड्रोनचा वापर विविध क्षेत्रांमध्ये केला जात आहे. भारतामध्ये ड्रोन तंत्रज्ञान मोठया प्रमाणात वापरात आहे. देशात स्वयंचलित ड्रोन वापर हा प्रामुख्याने रेल्वे, खाण उद्योग, मनोरंजन या क्षेत्रामध्ये केला जात आहे. रेल्वे प्रकल्पाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन यंत्रणेचा वापर सुरू केला आहे. चित्रपट मालिकांच्या चित्रीकरणासाठी याचा वापर वाढत जात आहे. आता ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणारी स्विगी डिलिव्हरी सेवेत आणखी सुधारणा करत आहे. स्विगी ग्राहकांकडे सामान झटपट पोहोचवण्यासठी ड्रोनचा वापर करणार आहे. यासाठी जूनमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू केला जाणार आहे. या माध्यमातून सामान डार्क स्टोरपर्यंत पोहोचवलं जाईल. या चाचण्यांसाठी कंपनीने चार ‘ड्रोन-एज-ए-सर्व्हिस’ ऑपरेटर्सची नियुक्ती केली आहे. या चाचण्या दोन टप्प्यांत घेतल्या जातील. ड्रोनमध्ये नेव्हिगेशन सिस्टीम, जीपीएस, वेगवेगळे सेन्सर्स, उच्चतम प्रतीचे कॅमेरे, प्रोग्राम करण्यायोग्य नियंत्रक यांचा समावेश असतो.

स्विगी ड्रोन चाचण्या कोठे घेत आहे?
ब्लॉगपोस्टमध्ये कंपनीने सांगितलं आहे की, स्विगी दिल्ली-एनसीआर आणि बेंगळुरूमध्ये ड्रोन वितरणासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करेल. बेंगळुरूमधील गरूडा एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड आणि दिल्ली-एनसीआरमधील स्कायएअर मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे चाचणी केली जाईल. त्यानंतर ANRA आणि TechEagle आणि Marut Dronetech Pvt Ltd द्वारे आयोजित केलेल्या चाचण्यांचा दुसरा टप्पा पार पडेल. पहिल्या टप्प्यात आलेल्या अडचणी दुसऱ्या टप्प्यात सोडवल्या जातील, असं कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

डिलिव्हरी ग्राहकांच्या घरापर्यंत असेल का?
नाही. सध्यातरी कंपनी पायलट प्रोजेक्टद्वारे सामान डार्क स्टोअरपर्यंत पोहोचवणार आहे. त्यानंतर या स्टोअरमधून डिलिव्हरी बॉय सामान ग्राहकांच्या घरी पोहोचवणार आहेत. त्यामुळे ड्रोन थेट दारात येईल असं सध्यातरी होणार नाही.

ड्रोन वितरणासाठी काय नियम आहेत?
ड्रोन डिलिव्हरीचा सर्वात महत्त्वाचा घटक BVLOS ऑपरेशन्स असून सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. परंतु गेल्या वर्षी, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने BVLOS प्रायोगिक उड्डाणे आयोजित करण्यासाठी स्विगी, एएनआरए कन्सोर्टियम आणि मारुत ड्रोनटेकसह २० संस्थांना सशर्त सूट दिली आहे.

विश्लेषण : वेबसीरीज, चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन कसे शूट केले जातात?

ड्रोन ऑपरेशनमध्ये इतर वितरण कंपन्या आहेत का?
भारतात अनेक ड्रोन ऑपरेटर्सनी ड्रोनद्वारे लस आणि आरोग्य सेवा पुरवठ्याच्या चाचण्या घेण्यासाठी राज्य सरकार आणि इतर प्राधिकरणांशी भागीदारी केली आहे. लॉजिस्टिक सेवा कंपनी डेल्हीवेरीने डिसेंबरमध्ये कॅलिफोर्निया-आधारित ट्रान्झिशन रोबोटिक्ससोबत करार केला असून ड्रोन प्लॅटफॉर्म विकसित करणार आहे. जागतिक स्तरावर, इंटरनेट दिग्गज अल्फाबेटच्या ड्रोन डिलिव्हरी युनिट विंगने अलीकडेच डॅलस, टेक्सास येथील वॉलग्रीन्सकडून औषधांच्या बॉक्सेसचा पुरवठा करून अमेरिकेच्या एका प्रमुख महानगरात आपली पहिली खेप वितरित केली आहे.

Story img Loader