ड्रोनचा वापर विविध क्षेत्रांमध्ये केला जात आहे. भारतामध्ये ड्रोन तंत्रज्ञान मोठया प्रमाणात वापरात आहे. देशात स्वयंचलित ड्रोन वापर हा प्रामुख्याने रेल्वे, खाण उद्योग, मनोरंजन या क्षेत्रामध्ये केला जात आहे. रेल्वे प्रकल्पाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन यंत्रणेचा वापर सुरू केला आहे. चित्रपट मालिकांच्या चित्रीकरणासाठी याचा वापर वाढत जात आहे. आता ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणारी स्विगी डिलिव्हरी सेवेत आणखी सुधारणा करत आहे. स्विगी ग्राहकांकडे सामान झटपट पोहोचवण्यासठी ड्रोनचा वापर करणार आहे. यासाठी जूनमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू केला जाणार आहे. या माध्यमातून सामान डार्क स्टोरपर्यंत पोहोचवलं जाईल. या चाचण्यांसाठी कंपनीने चार ‘ड्रोन-एज-ए-सर्व्हिस’ ऑपरेटर्सची नियुक्ती केली आहे. या चाचण्या दोन टप्प्यांत घेतल्या जातील. ड्रोनमध्ये नेव्हिगेशन सिस्टीम, जीपीएस, वेगवेगळे सेन्सर्स, उच्चतम प्रतीचे कॅमेरे, प्रोग्राम करण्यायोग्य नियंत्रक यांचा समावेश असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा