-ज्ञानेश भुरे

आयसीसी ट्वेन्टी-२० २०२२ विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने पाकिस्तानचे आव्हान परतवून लावत दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविले. त्याचबरोबर एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा लागोपाठ जिंकण्याचा पराक्रमही इंग्लंडने केला. या वेळी साधारण सुरुवात झाल्यानंतरही इंग्लंडने विजेतेपदापर्यंत मजल मारली. इंग्लंड संघ या विजेतेपदापर्यंत कसा पोहोचला याचा आढावा…

Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
India Beat Ireland by 305 Runs and Registers Biggest Margin Victory in Womens ODI Cricket INDW vs IREW
INDW vs IREW: ऐतिहासिक! भारताच्या महिला संघाने नोंदवला इतिहासातील सर्वात मोठा विजय, आयर्लंडचा उडवला धुव्वा
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?
NZ vs SL Sri Lanka beat New Zealand by 140 runs Mark Chapman 82 runs in 3rd ODI match at Eden Park
NZ vs SL : तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ
Fan who caught Kane Williamson's sixer with one hand wins Rs 90 lakh prize in SA20 2025 Match
SA20 2025 : मॅच पाहायला गेला आणि लखपती झाला, केन विल्यमसनच्या षटकाराने चाहत्याचं नशीब कसं बदललं?

इंग्लंड विश्वचषक विजेतेपदासाठी कसे पात्र ठरते?

क्रिकेटचे जनक मानल्या जाणाऱ्या इंग्लंडला आयसीसीच्या स्पर्धेतील पहिल्या विजेतेपदासाठी इंग्लंडला २०१० ची वाट पहावी लागली. त्या वर्षी इंग्लंडने प्रथम ट्वेन्टी-२० स्पर्धा जिंकली. त्यानंतर २०१९ मध्ये इंग्लंडने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकली. आता २०२२ मध्ये पुन्हा ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकून इंग्लंडने सलग दोन विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली. सांघिक खेळ आणि सामन्याचा अभ्यास करण्याची इंग्लंडची सवय या दोन्ही वेळी सर्वांत महत्त्वाची ठरली. या वेळी ट्वेन्टी-२० क्रिकेटची गरज लक्षात घेता संघात सर्वाधिक अष्टपैलू खेळाडूंना दिलेली संधी इंग्लंडसाठी खूप महत्त्वाची ठरली. त्यामुळे स्पर्धेला साधारण सुरुवात आणि आयर्लंडविरुद्ध पत्करावा लागलेल्या पराभवानंतरही इंग्लंड संघ भक्कमपणे स्पर्धेत टिकून राहिला. या वेळी उपांत्य आणि अंतिम अशा दोन्ही सामन्यात इंग्लंडने आपल्या डावाला योग्य वेळी वेग दिला. त्यामुळे संथ वाटणारा इंग्लंडचा खेळ दोन्ही सामन्यात महत्त्वाच्या क्षणी उंचावला.

गोलंदाज सॅम करन इंग्लंडच्या विजयाच्या शिल्पकार कसा ठरतो?

सॅम करनची गणना प्रामुख्याने अष्टपैलू खेळाडूंमध्ये होते. आयपीएलमध्ये त्याने सर्व प्रथम सॅमने चमक दाखवली. यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड संघ व्यवस्थापनाने सॅमचा उपयोग प्रामुख्याने उत्तरार्धातील गोलंदाज म्हणून केला. मात्र, बाद फेरीत ख्रिस जॉर्डनचा समावेश झाल्यावर सॅमची भूमिका बदलली. सॅमकडे पॉवर प्लेमध्येच चेंडू सोपविला गेला. उपांत्य आणि अंतिम फेरीत त्याने पॉवर प्लेमध्ये दुसरे आणि नंतर उत्तरार्धात अखेरची दोन षटके टाकली. या बदलासही सॅमने जुळवून घेतले. पाकिस्तानची जोडी लयीमध्ये येत असतानाच सॅमने मोहंमद रिझवानला बाद केले. त्यानंतर उत्तरार्धातील षटकांत सॅमने शान मसूद, मोहंमद नवाझला बाद केले. चार षटकांत सॅमने १२ धावांत ३ गडी बाद करून पाकिस्तानला रोखण्यात यश मिळविले. इथेच इंग्लंडचे पारडे जड ठरले.

खोलवर असलेल्या फलंदाजीचा यशात किती वाटा?

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत विशेष करून सलामीच्या फलंदाजांना फारसे यश मिळाले नव्हते. इंग्लंडही त्याला अपवाद नव्हते. त्यांचे दोन सामने असेही पावसाने वाया गेले होते. त्यामुळे इंग्लंडच्या मधल्या फळीचा कस तसा लागला नव्हता. तरी एकदा लियाम लिव्हिंगस्टोनची फटकेबाजी निर्णायक ठरली होती. बेन स्टोक्सही एक सामना खेळून गेला होता. डेविड मलानही चमक दाखवू शकला नव्हता. पण, उपांत्य फेरीत जॉस बटलर, ॲलेक्स हेल्स यांना सूर गवसला. अंतिम सामन्यात आव्हान मोठे नसतानाही इंग्लंडच्या मधल्या फळीवर जबाबदारी येऊन पडली. तेव्हा इंग्लंडच्या खोलवर असलेल्या फलंदाजीचा अंदाज आला. मुख्य म्हणजे बेन स्टोक्स अखेरपर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला. नेहमीच्या आक्रमकतेला मुरड घालून स्टोक्सने दाखवलेला संयम महत्त्वाचा ठरला. त्यामुळे एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याप्रमाणे ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही स्टोक्सची स्ट्रोकफुल फलंदाजी महत्त्वाची ठरली. या वेळी मोईन अलीची साथ मिळाली. मोईनचा गोलंदाजीत उपयोग झाला नाही, तरी अंतिम सामन्यात मोईनची १९ धावांची खेळी खूप महत्त्व राखून जाते.

इंग्लंडच्या लेगस्पिनर रशिदचा प्रभाव किती महत्त्वाचा ठरला?

यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुरुवातीला रशिद प्रभावहीन ठरत होता. पहिल्या तीन सामन्यात त्याला एकही गडी बाद करण्यात यश आले नाही. यानंतरही खेळपट्टीचा अंदाज घेत इंग्लंडने रशिदवर विश्वास दाखवला. श्रीलंका, भारताविरुद्ध रशिदने अचूक गोलंदाजी केली. पाकिस्तानविरुद्ध रशिदने अंतिम सामन्यात इंग्लंडला दोनदा महत्त्वाचे यश मिळवून दिले. रशिदने प्रथम मोहमद हारिसला बाद केले आणि नंतर धोकादायक बाबर आझमला स्वतःच्या गोलंदाजीवर टिपले. पाकिस्तानच्या धावगतीला रोखण्यासाठी हे दोन्ही बळी महत्त्वाचे ठरले.

कर्णधार म्हणून जॉस बटलरचीही भूमिका ठरली निर्णायक?

जॉस बटलरसाठी देखील ही स्पर्धा खूप काही यशस्वी ठरली नाही. पण, उपांत्य सामन्यात बटलरला सूर गवसला आणि अंतिम फेरीत त्याचा फायदा झाला. त्याहीपेक्षा बटलरने इंग्लंडला दिलेले नेतृत्व सर्वांत महत्त्वाचे ठरते. उपांत्य आणि अंतिम सामन्यात हे प्रकर्षाने जाणवले. पावसाळी हवामानाचा अंदाज, खेळपट्टी आणि प्रतिस्पर्धी संघांतील उणिवांचा नेमका अभ्यास, गोलंदाजांचा अचूक वापर आणि धावा रोखण्यासाठी केलेली क्षेत्ररक्षकांची व्यूह रचना यातून बटलरचे नेतृत्वकौशल्य दिसून येते. पावसामुळे सामन्यापूर्वी आच्छादित राहिल्याने दमट झालेल्या खेळपट्टीचा विचार करून गोलंदाजांना स्लोअर वनवर भर देण्याचा दिलेला सल्ला आणि त्यानुसार पाकिस्तानच्या फलंदाजांना मिडविकेट क्षेत्रात अडकविण्याची रचना निश्चितच निर्णायक ठरली.

शाहिन शाह आफ्रिदीचे जायबंदी होणे पथ्यावर?

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी जायबंदी होणे इंग्लंडसाठी निश्चितच पथ्यावर पडले. कमी धावसंख्येचा बचाव करताना पाकिस्तानचे गोलंदाज प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. पॉवर प्लेमध्ये इंग्लंड आघाडीवर राहिले असले, तरी ११ ते १५ या चार षटकांत पाकिस्तानच्या नसीम शाह, मोहंमद वासीम, हारिस रौफ या वेगवान गोलंदाजांसह शादाब खानच्या फिरकीने इंग्लंडच्या फलंदाजांना जखडून ठेवले होते. शाहिनने पहिली दोन षटके कमालीची भेदक टाकली होती. त्यामुळे उत्तरार्धातील षटकांत शाहिनची षटके पाकिस्तानसाठी अस्त्र ठरणार होती. मात्र, शादाबच्या गोलंदाजीवर हॅरी ब्रुकचा झेल घेताना शाहिन आफ्रिदी गुडघ्यावर आपटला आणि त्याला मैदान सोडावे लागले. डावातील १६ वे षटक टाकण्यासाठी शाहिन मैदानात उतरला, पण त्याला केवळ एकच चेंडू टाकता आला. त्याचे उर्वरित पाच चेंडू इफ्तिकारने टाकले. या पाच चेंडूत स्टोक्स-मोईन अलीने १३ धावा करून आत्मविश्वास मिळविला.

Story img Loader