टॅल्कम पावडरचा वापर प्रत्येक जण दररोज करतो, ही काही वेगळी सांगण्यासारखी बाब नाही. घरातून बाहेर पडायचे असल्यास किंवा घरीही अंघोळ झाल्यावर आणखी फ्रेश दिसण्यासाठी लोक पावडर लावतात. असा वर्षानुवर्षाचा गैरसमज लोकांमध्ये आहे की, पावडर लावल्याने आपला रंग उजळतो. पण, खरे सांगायचे झाल्यास असे काहीही नाही; उलट एका नवीन संशोधनानुसार टॅल्कम पावडरविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दररोज पावडर लावल्याने गंभीर कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात सांगण्यात आले आहे. पावडर लावल्याने खरंच कॅन्सर होऊ शकतो का? या अहवालात नक्की काय माहिती समोर आली आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
सौंदर्यप्रसाधनातील ब्लश, आय शॅडो, पावडर आणि इतर कॉस्मेटिक वस्तूंमध्ये टॅल्कम पावडरचा वापर केला जातो. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोग एजन्सीने टॅल्कचे वर्गीकरण मानवांसाठी ‘कार्सिनोजेनिक” म्हणून केले आहे. टॅल्क निसर्गाद्वारे सहज उपलब्ध होते. हे एक प्रकारचे खनिज असून जगभरात याचे उत्खनन केले जाते. याद्वारेच टॅल्कम पावडर तयार केली जाते आणि त्याचा वापर बेबी पावडरसह सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो.
टॅल्कच्या सतत वापरामुळे कर्करोगाचा धोका
गट २ ब अंतर्गत टॅल्कचे वर्गीकरण करण्यात आले आहे. प्राण्यांवर केलेल्या काही संशोधनात आढळलेल्या त्रुटींच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामुळे माणसाला यामुळे कर्करोग होऊ शकतो, असा कोणताच पुरावा नाही. या अहवालात टॅल्कमुळे महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. उंदरांवर केलेल्या संशोधनानंतर ही माहिती समोर आली आहे. हा पुरावा पुरेसा असल्याचे शास्त्रज्ञांचे सांगणे आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोग एजन्सीने स्पष्ट केले आहे. यात आणखी संशोधन आवश्यक असल्याचेही शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
यूएस फार्मास्युटिकल आणि कॉस्मेटिक्स कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या टॅल्कम-आधारित पावडर उत्पादनांच्या सुरक्षिततेबद्दल ग्राहकांची दिशाभूल केल्याच्या आरोपांचे निराकरण करण्यासाठी ७०० दशलक्ष डॉलर्स देण्याचे मान्य केल्यानंतर ही माहिती देण्यात आली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने २०२० मध्ये उत्तर अमेरिकन बाजारातील आपले उत्पादन मागे घेतले होते.
टॅल्क आणि कर्करोग यांच्यातील संबंध
टॅल्क हे नैसर्गिकरित्या आढळणारे खनिज आहे. त्याचे उत्खनन जगाच्या अनेक भागांमध्ये केले जाते. बर्याचदा टॅल्कम बेबी पावडर तयार करण्यासाठी वापरले जाते. लियोन आधारित ‘आयएआरसी’ या कर्करोग संस्थेनुसार, बहुतेक लोक बेबी पावडर किंवा सौंदर्यप्रसाधनांच्या वापरामुळे टॅल्कच्या संपर्कात येतात. पृथ्वीवर, नैसर्गिकरित्या टॅल्क आणि एस्बेस्टोस नावाची खनिजे एकमेकांच्या जवळ आढळतात. ही खनिजे एकमेकांच्या जवळ असल्याने त्यांच्या खाणकामादरम्यान टॅल्क आणि एस्बेस्टोस एकमेकांत मिसळतात. आयएआरसीने टॅल्क वापरणाऱ्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाच्या दरात सातत्याने वाढ दर्शविली आहे. ज्या महिला त्यांच्या गुप्तांगांवर पावडर लावतात त्यांच्यात ही वाढ दिसून आली आहे. परंतु, हेही तितकेच खरे आहे की, टॅल्क कर्करोगास कारणीभूत असलेल्या एस्बेस्टोसने प्रदूषित होते.
‘द लॅन्सेट ऑन्कोलॉजी’मध्ये प्रकाशित एजन्सीच्या निष्कर्षांनुसार, “दोन लाख ५० हजार महिलांचा समावेश असलेल्या २०२० मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासाच्या सारांशात गुप्तांगांवर टॅल्कचा वापर आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका यांच्यात संबंध असल्याचे आढळून आले आहे. याव्यतिरिक्त, यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ने एस्बेस्टोस टॅल्क असलेल्या सौंदर्यप्रसाधनांचे मूल्यमापन केले आणि असे आढळले की, बहुतेक उत्पादनांमध्ये ही पावडर वापरली, त्यामुळे आहे/यावरून हे सिद्ध होत नाही.
हेही वाचा : जामीन मिळवायचा असल्यास पोलिसांना गुगल लोकेशन द्यावं लागणार का? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय?
संशोधनात सहभागी नसलेल्या ब्रिटनच्या मुक्त विद्यापीठातील सांख्यिकीशास्त्रज्ञ केविन मॅककॉनवे यांनी चेतावणी दिली की, ‘आयएआरसी’ची माहिती दिशाभूल करणारी आहे. हा अभ्यास निरीक्षणात्मक असून अद्याप कोणतेही कारण सिद्ध करू शकलेला नाही. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला डॉ. मनीष सिंघल यांनी सांगितले, एस्बेस्टोस असलेले टॅल्क आणि एस्बेस्टोस नसलेले टॅल्क यांच्यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. ते म्हणतात, आज बहुतेक कॉस्मेटिक-ग्रेड टॅल्क एस्बेस्टोस मुक्त आहेत. एफडीएसारख्या संस्था नियमितपणे टॅल्क असलेल्या वस्तूंच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करतात.