संगीत ऐकणे, हुक्का पिणे आणि वेस्टर्न पद्धतीने केस कापणे हे सर्व अफगाणिस्तानमधील तालिबानच्या शासनात दंडनीय कृत्ये असल्याचे नुकत्याच संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून समोर आले आहे. तालिबानींनी ‘मिनिस्ट्री फॉर द प्रपोगेशन ऑफ वर्च्यु अँड द प्रीव्हेंशन’ची स्थापना केली होती. याला एमपीव्हीपीव्ही म्हणूनही ओळखले जाते. या अंतर्गत अफगाणिस्तानमधील लोकांचे मानवी हक्क हिसकावून घेतले जात आहेत. तालिबानी विशेषत: महिला आणि मुलींना लक्ष्य करत आहे आणि त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. नेमके अफगाणिस्तानमध्ये काय घडत आहे? या दडपशाहित अफगाणिस्तानमधील लोक कसे जगत आहेत? आतापर्यंत कशाकशावर निर्बंध लादण्यात आले आहेत? याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
२०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर परतले आणि सत्तेवर परतल्यानंतर तालिबानींच्या हुकूमशाहीची सुरुवात झाली. एमपीव्हीपीव्ही इस्लामिक कायद्याचे कठोर पालन करते, त्यानुसार मानव आणि प्राण्यांच्या प्रतिमा प्रदर्शित करणे आणि व्हॅलेंटाईन डे सारखे दिवस साजरे करणे यासारख्या बाबी गैर-इस्लामिक समजल्या जातात. १५ ऑगस्ट २०२१ आणि ३१ मार्च २०२४ दरम्यान प्रसिद्ध झालेल्या अहवालात, तालिबानी अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी हिंसाचाराचा वापर केल्याच्या किमान १,०३३ घटना नोंदवण्यात आल्या. एमपीव्हीपीव्हीच्या अंमलबजावणी पद्धतींमध्ये धमकावणे, अटक करणे, ताब्यात घेणे, वाईट वागणूक देणे आणि सार्वजनिक मारहाण करणे आदी गोष्टींचा समावेश होतो. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्याने माघार घेतल्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता.
अहवालात काय समोर आले?
एमपीव्हीपीव्हीने लादलेल्या पहिल्या निर्बंधांपैकी एक म्हणजे चित्रपटांमध्ये महिलांच्या काम करण्यावर बंदी आणि परदेशी संस्कृती दाखवण्यात आलेल्या चित्रपटांच्या प्रसारणावर बंदी. या सूचनांनुसार माध्यमांमध्ये काम करणाऱ्या महिला पत्रकारांनाही इस्लामिक हिजाब परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे, असे या अहवालात म्हटले आहे. यात शरिया तत्त्वे आणि अफगाण मूल्यांच्या विरोधात असलेले चित्रपट तसेच पुरुषांनी त्यांचे शरीर उघड करणारे चित्रपट आणि व्हिडिओंवरदेखील बंदी घालण्यात आली आहे.
‘एमपीव्हीपीव्ही’ने पुरुषांच्या योग्य दिसण्याबाबत अनेक सूचनाही जारी केल्या आहेत. ‘एमपीव्हीपीव्ही’ने पुरुषांना दाढी न कापण्याचे आणि वेस्टर्न पद्धतीची हेअरकट न करण्याचे निर्देश दिले आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये, तालिबानी पोलिसांनी वेस्टर्न पद्धतीने केस कापणार्या आणि दाढी कापणारे २० केस कर्तनालये बंद केलीत. त्यांनी तालिबानच्या नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ताब्यात घेतलेल्या दोन व्यक्तींना सोडण्यात आले.
संगीत वाजवल्यामुळे मारहाण आणि अटक
पुरुषांना मशिदींमध्ये सामूहिक प्रार्थना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अहवालात असे म्हटले आहे की ज्या पुरुषांनी यात सहभाग घेतला नाही त्यांना दंडीत करण्यात आले आहे. हा आदेश न पळणार्या पुरूषांना व्यवसायातून निलंबन आणि शारीरिक शिक्षाही भोगावी लागली आहे. १० सप्टेंबर २०२३ रोजी फर्याब विद्यापीठातील २९ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या एका वर्गमित्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी संगीत वाजवल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी अटकेदरम्यान काही विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्यांचे मुंडन केले. १८ तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली.
महिला आणि मुलींना लक्ष्य
‘एमपीव्हीपीव्ही’ने महिलांसाठी विशिष्ट ड्रेस कोड आणि सार्वजनिक जागांवर त्यांचा प्रवेशही प्रतिबंधित केला आहे. महिलांच्या मालकीचे व्यवसाय बंद करण्यात आले आहेत, महिलांना चित्रपटांमध्ये दिसण्यास बंदी आहे आणि ब्युटी पार्लरही बंद घालण्यात आली आहे. त्यासह गर्भनिरोधक गोळी आणि इतर गोष्टींच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे. अफगाणिस्तानातील महिलांना उद्याने, व्यायामशाळा आणि सार्वजनिक स्नानगृहांमध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे. महिलांना घरापासून ७८ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करायचा असल्यास पुरुषाला बरोबर घेऊन जाणे आवश्यक आहे. १२ नोव्हेंबर २०२३२ रोजी नांगरहार प्रांतात महिलांना चेतावणी देण्यात आली होती की त्या पुरुषांशिवाय दवाखान्यात जाऊ शकत नाहीत. त्याच्या एक महिन्यानंतर ही अट मागे घेण्यात आली. अफगाणिस्तानमधी महिलांनी हिजाब घालणेदेखील बंधनकारक आहे.
लोकांच्या फोनवरील संभाषणावरही पाळत
तालिबानी अधिकार्यांकडून लोकांचे फोन आणि कारच्या हालचालींवरही लक्ष ठेवण्यात येते. मशिदीतील उपस्थितीचीही नोंद ठेवली जाते. तालिबानने मात्र सर्व दावे फेटाळून लावले आहेत. “अफगाणिस्तानचे मुस्लीम समाज म्हणून मूल्यांकन केले पाहिजे. इथे बहुसंख्य लोकसंख्या मुस्लिम आहे; ज्यांनी शरिया प्रणालीच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण बलिदान दिले आहे,” असे तालिबानने म्हटले. देशात प्रसारमाध्यमे मुक्त आहेत आणि पत्रकारांवर अद्याप कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत, असा दावाही तालिबानने केला आहे. महिलांबरोबर पुरुषांच्या उपस्थितीवर तालिबानने म्हटले की, महिलांबरोबर महरम (पुरुष पालक) ची उपस्थिती केवळ इस्लामिक मूल्य नाही, तर हे एक सांस्कृतिक मूल्यदेखील आहे.”
हेही वाचा : आयआरएस अधिकारी अनुसूया झाली अनुकाथिर सूर्या; महिला आयआरएस अधिकार्याने लिंग बदलून कसा रचला इतिहास?
दडपशाहीमुळे महिलांच्या आत्महत्येच्या प्रयत्नांमध्ये वाढ
महिलांवरील दडपशाहीमुळे आत्महत्येच्या प्रयत्नांमध्ये वाढ झाली आहे, असे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे. या वृत्तात ‘सीएनएन’ने १६ वर्षांच्या मुलीने बॅटरी ऍसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. महिलांना उद्यान आणि सार्वजनिक ठिकाणी बंदी असल्याच्या आरोपांबाबत तालिबान म्हणाले, “तुम्ही बघू शकता की, महिला बाजारात खरेदी आणि व्यवसाय करताना दिसतात. अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीचा ताबा घेतल्यापासून कामगार आणि सामाजिक व्यवहार मंत्रालयाने महिलांना जवळपास नऊ हजार वर्क परमिट जारी केले आहेत.”