बदलती जीवनशैली बघता, लठ्ठपणाची समस्या म्हणजेच ओबेसिटी हा आजार दिवसेंदिवस वाढत आहे. ओबेसिटीमुळे हृदयरोग, टाईप टू डायबेटिस व कर्करोगासारखे नवनवीन आजार उद्भवू शकतात. प्रामुख्याने चुकीच्या आहारपद्धतीमुळे लठ्ठपणा वाढतो. वजन कमी करण्यासाठी लोक आजकाल निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यासाठी ते योग्य आहारासह जिमिंग, योगा करताना दिसत आहेत. मात्र, व्यायामामुळे त्वरित वजन कमी करणे कठीण आहे. वजन कसे कमी करण्यासाठी लोक नवनवीन उपाय शोधत असतात. सध्या लोक वजन कमी करण्यासाठी चक्क टेपवर्मच्या अंड्यांनी तयार केलेल्या गोळ्या घेत असल्याची काही उदाहरणे दिसून आली आहेत. वजन कमी करण्यासाठीचा झटपट उपाय म्हणून या गोळ्या घेणाऱ्या अमेरिकेतील एका महिलेचे विचित्र प्रकरण समोर आले आहे. डॉक्टरांनी तिला गंभीर आजाराचा धोका उद्भवू शकतो, असा इशाराही दिला. टेपवर्मच्या अंड्यांनी तयार झालेल्या या गोळ्यांचे सेवन केल्यास शरीरात ३० फुटांपर्यंत त्याची वाढ होऊ शकते, असेही डॉक्टर्स सांगतात. नेमके हे प्रकरण काय? या गोळ्या घेतल्याने शरीरात नक्की काय बदल होतात? शरीरसाठी या गोळ्या किती घातक? ते जाणून घेऊ.

नेमके प्रकरण काय?

टीई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २१ वर्षीय आयोवा येथील स्थानिक महिलेने क्रिप्टोकरन्सी वापरून टेपवर्मच्या अंड्याने भरलेल्या कॅप्सूल खरेदी केल्या. अमेरिकेतील ऑन्कोलॉजिस्ट डॉ. बर्नार्ड हसू यांनी त्यांच्या ‘यूट्यूब’वर या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही महिला लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करीत होती आणि त्यामुळे लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी म्हणून तिने हा उपाय अवलंबण्याचे ठरवले. त्यांनी सांगितले की, टीई हिने सुरुवातीला दोन गोळ्या घेतल्या आणि तिला शरीरात हवे तसे बदल दिसून आले. मात्र, आठवडाभरानंतर तिला पोटदुखीचा त्रास जाणवू लागला; परंतु वजन कमी होत असल्याचे पाहून तिने होणार्‍या लक्षणांकडे दुर्लक्ष केले. मात्र, तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. तिला शौचालयात धक्कादायक अनुभव आला. तिला तिच्या गालावर काही चालत असल्याचे जाणवले आणि जेव्हा ती फ्लश करायला गेली तेव्हा, तिला काही आयताकृती तुकडे तरंगताना दिसले.

cockroaches how to get rid of cockroaches by using home remedy rice helps to remove cockroaches jugaad
झुरळांचा त्रास आता कायमचा होईल गायब! ‘रात्रीचा भात’ वापरून होईल कमाल, पाहा जुगाडू उपाय
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
Ancient Egypt medicine Serqet goddess
Ancient Egyptian History: ४,१०० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील फॅरोचे उपचार करणाऱ्या डॉक्टरचा शोध लागला; का आहे हा शोध महत्त्वाचा?
nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात
Tokyo subsiding epidurals for pregnant women
वेदनारहित प्रसूतीसाठी ‘या’ देशात महिलांना पैसे का दिले जातायत? काय आहे एपिड्युरल?
plastic banned
खबरदार प्लास्टिकचा वापर कराल तर… कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई…

हेही वाचा : काय आहे ‘मुरिन टायफस’? हा आजार कसा पसरतो? भारतात हा दुर्मीळ जीवाणू आला कुठून?

काही दिवसांत तिला इतरही गंभीर लक्षणे जाणवू लागली. तिच्या हनुवटीच्या खाली काही गाठी जाणवू लागल्या, तिला तीव्र डोकेदुखीचा त्रास होऊ लागला आणि ओटीपोटातही तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्रास असह्य झाल्यानंतर तिने जीवाणू संसर्गाची चाचणी केली; परंतु ती नकारात्मक आली. असे असले तरी दिवसेंदिवस तिला गंभीर लक्षणे दिसून येत होती. डॉ. हसू म्हणाले की, तिला गेल्या काही तासांच्या गोष्टी लक्षात ठेवणेही कठीण होऊ लागले. डॉक्टरांना तिच्या मेंदू, जीभ व यकृतासह शरीराच्या इतर भागांवरही जखमा आढळून आल्या. त्यानंतर तिने आपण टेपवर्मच्या गोळ्या घेतल्या असल्याची माहिती दिली.

टेपवर्म पिल्स म्हणजे टेपवर्मच्या अंड्यांपासून बनविलेली गोळी. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आढळले की, टीईने टेपवर्मच्या दोन प्रजातींचे सेवन केले होते; ज्यात ‘Taenia saginata’ व ‘Taenia solium’ यांचा समावेश होता. या गोळ्यांचे सेवन केल्यानंतर अंडी तिच्या रक्तप्रवाहात सोडली गेली होती; ज्यामुळे तिला संसर्ग झाला. उपचारासाठी तिला दोन औषधे लिहून देण्यात आली होती. त्यातील एक औषध कृमींची स्थिती अर्धांगवायू होण्यासारखी करते आणि त्यांना आतड्यांपासून वेगळे करते. तर दुसरे औषध त्यांना जगण्यासाठी आवश्यक ‘ग्लुकोज’ मिळण्यापासून दूर ठेवते. त्यांनी तिच्या मेंदूतील जळजळ कमी करण्यासाठी तिला स्टिरॉइड्सदेखील लिहून दिली. मात्र, तरीही डॉक्टरांना याची खात्री नव्हती की, तिच्या शरीरातील अंडी पूर्णपणे नाहीशी होतील. रुग्णालयात तीन आठवडे राहिल्यानंतर तिच्या मेंदूमध्ये अंडी नसल्याचे आढळून आले आणि तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

सहा महिन्यांच्या फॉलोअपमध्ये डॉक्टरांना असे आढळून आले की, टीईमध्ये आता कोणतीही नवीन लक्षणे आढळून येत नसून, आता ती निरोगीपणे वजन कमी करीत आहे. “सक्षम शरीर असलेल्या माणसामध्ये आहार आणि व्यायामाने वजन कमी करणे शारीरिकदृष्ट्या शक्य आहे,” असे ते म्हणाले. २०१९ मध्ये फरीदाबाद येथील एका १८ वर्षाच्या मुलाच्या मेंदुमध्ये टेपवर्मची अंडी आढळून आली होती. त्याने डुकराच्या मासाचे सेवन केल्यानंतर त्याला ही लक्षणे दिसून आली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

टेपवर्मचे सेवन का केले जाते?

टेपवर्म पिल्स म्हणजे टेपवर्मच्या अंड्यांपासून बनविलेली गोळी. या गोळीचे सेवन केल्याने कॅप्सूलमधील अंडी रक्तात शिरतात आणि टेपवर्म शरीरात वाढू लागतात. ज्या अन्नपदार्थांचे आपण सेवन करतो, ते शरीरातील सर्व अन्न या अळ्या खातात. त्यामुळे आपण हवे ते खाऊ शकतो आणि वजनही वाढत नाही; परंतु शरीरावर याचा घातक परिणाम होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुमच्या आतड्यातील टेपवर्म तुमच्या शरीरातील पोषक घटक खाऊ लागतात आणि शरीरात टेपवर्मची संख्या वाढू लागते.

कोणताही घातक परिणाम नसलेली टेपवर्म अंडी घेण्यास योग्य असल्याच्या जाहिराती व्हिक्टोरियन काळातील आहेत. त्या काळात लोकांनी वजन कमी करण्यासाठी जाणूनबुजून टेपवर्म खाण्यास सुरुवात केली. परंतु, १८०० च्या दशकात जाहिरातींचे कायदे आताच्यासारखे कठोर नव्हते. उत्पादनांमध्ये खरोखरच टेपवर्म अंडी समाविष्ट आहेत की नाही किंवा हा केवळ मार्केटिंगचा भाग आहे का, याविषयी काही इतिहासकारांनी विवाद केला आहे. आता अन्न आणि औषध प्रशासनाने या गोळ्यांवर बंदी घातली आहे. परंतु, लोकांची फसवणूक करणारे बरेच स्रोत आहेत. डेली मेलच्या मते, अमेरिका आणि हाँगकाँगसारख्या ठिकाणी अशी मोजकीच प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

त्याची लक्षणे काय आहेत?

टेपवर्मशी संबंधित संसर्गाचा मुख्य धोका हा आहे की, हे टेपवर्म शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतील, यावर तुमचे नियंत्रण नसते; ज्यामुळे तुमच्या पचनमार्गाबाहेरील ऊती किंवा अवयवांना मोठी हानी होऊ शकते. टेपवर्म गोळीच्या सेवनाने आढळू शकणारी लक्षणे खालीलप्रमाणे :

-अतिसार
-तीव्र पोटदुखी
-मळमळ
-अशक्तपणा
-ताप
-जीवाणू संक्रमण
-न्यूरोलॉजिकल समस्या

हेही वाचा : ब्लड प्रेशर तपासताना हात कसा ठेवावा? बीपी तपासण्याची योग्य पद्धत काय?

त्याचे सेवन धोकादायक आहे का?

टेपवर्मचे सेवन धोकादायक आहे. काही प्रकरणांमध्ये व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो. पित्तनलिका, अपेंडिक्स किंवा स्वादुपिंड नलिकेत अडथळा निर्माण होऊ शकतो. स्मृतिभ्रंश होऊ शकतो आणि दृष्टीशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात. तसेच फुप्फुस आणि यकृतासह इतर अवयवांच्या कार्यामध्येही व्यत्यय निर्माण होऊ शकतो.

Story img Loader