Air India Express Ticket Discount : एअर इंडिया एक्सप्रेसने परवडणाऱ्या किमतीत विमान तिकीट ऑफर जाहीर केली आहे. टाटा समूहाच्या एअर इंडिया एक्सप्रेसने चेक इन बॅगेजशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलतीच्या दरात तिकीट देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने मंगळवारी (२० फेब्रुवारी २०२४) ही माहिती दिली. ‘एक्सप्रेस लाइट’च्या माध्यमातून प्रवासी एअर इंडिया एक्सप्रेसचे तिकीट सामान्य किमतीच्या तुलनेत सवलतीत बुक करू शकतात. तसेच १५ किलो आणि २० किलोंवरील सवलतीच्या चेक इन बॅगेजसह प्री बुक केलेल्या किमतीसुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. एक्सप्रेस लाइटच्या भाड्यांद्वारे बुकिंग करताना प्रवाशांना अधिक चांगली सुविधा दिली जाणार आहे.”
खरं तर विमानतळावरील काउंटरवर चेक इन करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ऑनलाइन चेक इन करू शकता आणि थेट सुरक्षा तपासणीवर जाऊ शकता. तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय केबिनमध्ये ३ किलोपर्यंत हँड बॅगचे सामान घेऊन जाऊ शकता. तसेच तुम्ही अतिरिक्त चेक इन सामान भत्ता खरेदी करू शकता, परंतु तुम्ही हे आगाऊ बुक केल्यास तुम्हाला सवलत मिळेल. एअर इंडिया एक्सप्रेसने ऑफर केलेल्या भाड्याचा एक प्रकार जो इतर भाड्यांपेक्षा स्वस्त आहे, परंतु काही निर्बंधांसह येतो.
मिळालेल्या माहितीनुसार, Xpress Lite भाड्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तीन किलो अतिरिक्त केबिन बॅगेज प्री बुक करण्याचा पर्याय असेल आणि तो विनामूल्य आहे. प्रवाशांना नंतर चेक इन बॅगेज बुक करायचे असल्यास ते १५ किलो आणि २० किलो ऍक्सेस बॅगेज टप्प्यासह अतिरिक्त चेक इन बॅगेज पैसे देऊन आगाऊ तिकीट खरेदी करू शकतात. एअरलाइनचे म्हणणे आहे की, ते विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेस चेक इन बॅगेज सेवा अतिरिक्त शुल्क देऊन घेऊ शकतात. एअर इंडिया एक्सप्रेस ही टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडियाची उपकंपनी आहे. त्याच्या ताफ्यात एकूण ६५ विमाने आहेत. सध्या कंपनी ३१ देशांतर्गत आणि १४ आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आपली सेवा चालवते.
हेही वाचाः लाल समुद्रातील हुथींच्या संकटात भारतानं इस्रायलसाठी तयार केला नवा व्यापारी मार्ग, नेमका फायदा काय?
उत्तर अमेरिका, युरोप आणि आग्नेय आशियातील अनेक विमान कंपन्यांकडून ‘झिरो बॅगेज’ किंवा ‘नो चेक इन बॅगेज’ भाडे ऑफर केले जाते. २०२१ मध्ये १५ किलोच्या चेक इन सामानासाठी अतिरिक्त शुल्क २०० रुपयांची मर्यादा काढून टाकण्यात आली होती. भारतीय ग्राहकांना बऱ्याचदा विमान प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणात सामान घेऊन जाण्याची सवय असते. त्यामुळेच प्रवाशांच्या सोयीसाठी १५ किलोपर्यंत शुल्क मर्यादा काढून टाकण्यात आली होती. परंतु एअर इंडिया एक्स्प्रेसने या भाडे श्रेणीचा परिचय करून दिल्याने आता इतर भारतीय विमान कंपन्यांना विशेषत: इंडिगो, आकासा एअर आणि स्पाइसजेट यांसारख्या विमान कंपन्यांनाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ही सुविधा द्यावी लागू शकते. त्यामुळेच भारतातील विमान भाड्याच्या संरचनेत लक्षणीय बदल होऊ शकतो, असे उद्योग तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचाः भोपाळ गॅस प्रकरणापासून ‘या’ ऐतिहासिक निकालांमध्ये नरिमन यांचा सहभाग होता निर्णायक
एअर इंडिया एक्सप्रेसची नवी भाडे श्रेणी काय असणार?
एअर इंडिया एक्सप्रेसने मंगळवारी एक्सप्रेस लाइट भाडे जाहीर केले, जे खरं तर शून्य चेक इन बॅगेज भाडे तत्त्वावर आधारित आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या नव्या सवलतीनुसार ७ किलो व्यतिरिक्त ३ किलो मोफत केबिन बॅगेज ऑफर करून भाड्यात समाविष्ट असलेले एकूण लगेज १० किलोपर्यंत नेले आहे. प्रवासी विमानतळावर चेक इन बॅगेज अतिरिक्त शुल्क देऊन खरेदी करू शकतात, परंतु त्यांना मोठी किंमत मोजावी लागू शकते. Xpress Lite चे तिकीट दर सध्या फक्त एअरलाइनच्या वेबसाइट आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. “एक्सप्रेस लाइट भाडे सवलत लॉन्च केल्याने आम्हाला आशा आहे की, भारतात उड्डाण करण्याचा एक नवीन मार्ग निर्माण होणार आहे, भारतातून उड्डाण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसह जगभरातील फ्लायर्समध्ये आधीपासूनच लोकप्रिय असलेल्या प्रस्तावाचा विस्तार होईल,” असे इंडिया एक्सप्रेसचे हवाई मुख्य व्यावसायिक अधिकारी अंकुर गर्ग म्हणाले.
भाड्यात सवलत दिल्यास विमान कंपन्यांना कसा फायदा होतो?
सिद्धांतानुसार, अनबंडलिंग म्हणजे उत्पादन किंवा सेवा अनेक घटकांमध्ये विभागणे. तसेच प्रत्येक घटक वेगळ्या किमतीला विकण्याचाही त्यात समावेश आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास अनबंडलिंग म्हणजे मूळ उत्पादनाची विक्री करून खरेदी करणाऱ्याला अनावश्यक गोष्टी टाळून एकसमान उत्पादन खरेदी करण्यास भाग पाडणे आहे. विमान भाड्यांमधून सामान आणि उड्डाणातील खाद्यपदार्थ, पेय सेवा यांसारख्या सेवांना वेगळे करून काहीसे स्वस्तात उड्डाण करण्यासाठी अशा सेवा सोडून देण्यास इच्छुक असलेल्या प्रवाशांना आकर्षित करून विमान कंपन्या नफा वाढवू शकतात. कमी सामानाचा भार विमान कंपन्यांना इंधनाच्या खर्चातही बचत करण्यास मदत करतो. त्याव्यतिरिक्त मालवाहतूक करून सहाय्यक महसूल मिळवण्यासाठी ते कार्गो होल्डमधील उपलब्ध जागेचा वापर करू शकतात.
अनबंडलिंग हे जागतिक स्तरावर (प्रामुख्याने कमी किमतीच्या) विमान कंपन्यांमध्ये एक स्थापित धोरण आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक स्तरावर कमी तिकीट दराच्या एअरलाइन्सच्या यशात अनेकदा गैर भारतीय बाजारपेठांमध्ये अनबंडलिंग धोरण स्वीकारण्याची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. हे त्यांना कमी किमतीच्या तिकीट दराच्या तुलनेत मूलभूत विमानभाडे ठेवण्यास अनुमती देते, अशा प्रकारे किंमत विमान प्रवाशाला आकर्षित करतात, जे अन्यथा एअरलाइनचा विचार करू शकत नाहीत.
भारतातील ‘केबिन बॅगेज ओन्ली’ भाड्याचा इतिहास काय?
भारतात आणि तेथून उड्डाण करणाऱ्या अनेक परदेशी विमान कंपन्या अनेक वर्षांपासून कोणत्याही चेक इन भत्त्याशिवाय कमी किमतीतील विमान भाडे ऑफर करीत आहेत. भारतीय विमान कंपन्यांनी हे मॉडेल वापरून पाहिले. परंतु भारताच्या विमान वाहतूक नियामक महासंचालनालयाने (DGCA) चेक इन बॅगेज शुल्कावर मर्यादा आणल्यामुळे ते स्वतः विमान कंपन्यांसाठी किंवा त्यांच्या प्रवाशांसाठी व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकले नाहीत. २०१६ मध्ये DGCA ने ‘केबिन बॅगेज ओन्ली’ भाड्याला परवानगी दिली, परंतु एअरलाइन्स फक्त हातातील सामानाच्या व्यतिरिक्त विमानतळावर चेक इन केल्यानंतर प्रवाशांकडून सर्वात कमी भाड्याच्या तुलनेत ऑफर केलेल्या तिकीटदरात लगेजची रक्कम आकारू शकतात, असे सांगितले.