Tata Chip Plant Made In India Semiconductors : देशातील महत्त्वाच्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेला टाटा समूह भारतातील पहिला मोठा खासगी चिप प्लांट स्थापन करण्याच्या अंतिम तयारीत आहे. त्यामुळे आपल्या देशात लवकरच सेमीकंडक्टरचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होणार आहे. टाटा समूह (Tata Group) आणि इस्रायलच्या टॉवर सेमीकंडक्टर(Tower Semiconductors) नेही भारतात सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी याबाबत माहिती दिली. मोदी सरकारच्या इंडिया सेमीकंडक्टर मिशनने (ISM) या प्रस्तावांना मंजुरी दिल्यास अनेक दशकांच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर शेवटी देशात फॅब्रिकेशन प्लांट तयार करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. देशांतर्गत नोकरीच्या संधींना चालना देण्याबरोबरच चीन आणि अमेरिकेचा दबदबा असलेल्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपली भूमिका मजबूत होऊन त्याचा भारताला फायदा मिळू शकतो. चिप निर्मात्यांना आकर्षित करण्यासाठी भारत त्यांच्या काही प्रमुख मित्र राष्ट्रांशी जसे की, अमेरिका आणि चीन यांच्याशी स्पर्धा करीत आहे. खरं तर मोदी सरकार केंद्रीय स्तरावर चीप प्लाँटसाठी अर्ज करणाऱ्या यशस्वी अर्जदारांना ५० टक्के भांडवली खर्च अनुदान देत आहे. भारतात लवकरच अब्जावधी डॉलर्सचे दोन पूर्ण विकसित सेमीकंडक्टर प्रकल्प उभारले जाणार आहेत. याशिवाय अनेक चिप असेंब्ली आणि पॅकेजिंग युनिट्स तयार करण्यासाठीही गुंतवणूक प्रस्तावित आहे, असंही केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणालेत.
मंत्र्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, दोन प्रकल्पांपैकी ८ अब्ज डॉलरचा एक प्रस्ताव इस्रायलच्या टॉवर सेमीकंडक्टरचा आहे आणि दुसरा टाटा समूहाचा आहे. या प्रस्तावांचे एकत्रित मूल्य २२ अब्ज डॉलर आहे. मला हे सांगताना आनंद होत आहे आणि कदाचित तुम्ही पहिले व्यक्ती आहात ज्यांना मी हे सांगत आहे. दोन पूर्ण प्रकल्प लवकरच भारतात येणार आहेत. हे ६५, ४० आणि २८ नॅनोमीटर तंत्रज्ञानामध्ये अब्जावधी किमतीचे प्रकल्प असतील. आम्ही इतर अनेक प्रस्तावांचे देखील मूल्यांकन करीत आहोत. टाटा समूह तैवान स्थित युनायटेड मायक्रोइलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन (UMC) किंवा पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (PSMC) बरोबर भागीदारी करण्यास उत्सुक असल्याचेही समजतेय.
हेही वाचाः मध्यमवर्गीयांना परवडणार्या बाईक-टॅक्सीला भारतात अधिक व्यवहार्य करण्यासाठी काय करता येईल?
टॉवर सेमीकंडक्टरने मांडलेल्या ८ अब्ज गुंतवणुकीच्या प्रस्तावावर आणि भारताच्या सेमीकंडक्टर योजनेची स्थिती यावर विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाला मंजुरी मिळाली नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात या प्रकल्पाला मंजुरी दिली जाईल, असे मंत्री म्हणाले. मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो की, तुम्ही नमूद केलेल्या नावांनी मोठे, अत्यंत विश्वासार्ह, अतिशय महत्त्वाचे गुंतवणूक प्रस्ताव सादर केले आहेत. टाटाने इतर जाहीर केलेले प्रस्ताव देखील आहेत. आम्हाला आशा आहे की हे प्रस्ताव लवकरच पूर्ण होतील.
सरकारला चार सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्सच्या स्थापनेसाठी १३ आणि चिप असेंब्ली, टेस्टिंग, मॉनिटरिंग आणि पॅकेजिंग (ATMP) युनिट्ससाठी १३ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. हे प्रस्ताव गुजरातमध्ये यूएस मेमरी चिप निर्माता कंपनी मायक्रॉनद्वारे २२,५१६ कोटी रुपयांच्या चिप तयार करणाऱ्या प्लांटच्या व्यतिरिक्त आहेत.
सध्या कोणते प्रस्ताव प्रलंबित आहेत?
भारताच्या चिप क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेत परिसंस्थेतील तीन पैलूंचा समावेश होतो. पूर्ण विकसित प्रकल्प जे चिप्स तयार करू शकतात; दुसरे म्हणजे एमपीच्या सुविधा असणारे पॅकेजिंग प्रकल्प, तिसरे म्हणजे असेंबली आणि चाचणी प्रकल्प ज्यांना OSAT प्लांट म्हणतात. आतापर्यंत अमेरिकेवरच्या आधारित मायक्रोन टेक्नॉलॉजीने गुजरातमध्ये २.७५ अब्ज डॉलर एटीएमपी प्लांट उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
मुंबईतल्या सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडने भारतात सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्टिंग प्लांट स्थापन करण्यासाठी रेनेसास इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबरोबर संयुक्त उपक्रम (JV) करार केला आहे. केन्स टेक्नॉलॉजीने OSAT प्लांट उभारण्याचा प्रस्तावही पाठवला आहे. टाटा समूहानेही एटीएमपी प्लांटसाठी अर्ज केल्याचे समजते. याशिवाय HCL ने फॉक्सकॉनबरोबर अशाच प्रकारचा प्लांट उभारण्यासाठी अर्ज केल्याचीही माहिती मिळतेय.
पूर्वीच्या फॅब्रिकेशन प्रस्तावांचे काय झाले?
iPhones निर्माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फॉक्सकॉन आणि वेदांता यांच्यातील १९.५ अब्ज डॉलर्सचा चिप प्लांट उभारण्याचा संयुक्त उपक्रम गेल्या वर्षी अचानक थांबला. वेदांतासह संयुक्त उपक्रमातून बाहेर पडत असल्याचेही फॉक्सकॉनने जाहीर केले. दोघे स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात, परंतु अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही.
इंटरनॅशनल कन्सोर्टियम ISMC च्या भागीदारीत कर्नाटकात ३ बिलियन डॉलर प्लांट उभारण्याच्या योजनेसाठी यापूर्वी अर्ज केला होता. कंपनीच्या इंटेलमध्ये येऊ घातलेल्या विलीनीकरणामुळे ही योजना अडकली आहे. गेल्या ऑगस्टमध्ये नियामक समस्यांमुळे इंटेलने टॉवर सेमीकंडक्टर ५.४ बिलियन डॉलरमध्ये विकत घेण्याची योजना रद्द केली.
भारत सेमीकंडक्टर उत्पादनावर का भर देत आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या आर्थिक धोरणासाठी चिप उत्पादनाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, कारण त्यांना जागतिक कंपन्यांना आकर्षित करून इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात नव्या युगाची सुरुवात करायची आहे. त्यामुळे देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स पुरवठा शृंखला विकसित करण्याच्या आणि शेवटी परदेशातून विशेषत: चीनकडून आयात कमी करण्याच्या सरकारच्या दृष्टीसाठी देशांतर्गत सेमीकंडक्टर तयार करणे महत्त्वाचे आहे. चिप हा कोडचा एक महत्त्वाचा भाग असल्याने भारतासाठी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात पाऊल टाकण्याची ही एक महत्त्वाची वेळ आहे. सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये सेमीकंडक्टर चिप्स असतात आणि अधिक कंपन्या चीनमधील सेमीकंडक्टर प्लांटमधून त्यांच्या उत्पादनात विविधता आणण्याचा प्रयत्न करत असल्याने भारताला आता सेमीकंडक्टरमध्ये उदयास येण्याची संधी आहे.