Tata Chip Plant Made In India Semiconductors : देशातील महत्त्वाच्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेला टाटा समूह भारतातील पहिला मोठा खासगी चिप प्लांट स्थापन करण्याच्या अंतिम तयारीत आहे. त्यामुळे आपल्या देशात लवकरच सेमीकंडक्टरचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होणार आहे. टाटा समूह (Tata Group) आणि इस्रायलच्या टॉवर सेमीकंडक्टर(Tower Semiconductors) नेही भारतात सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी याबाबत माहिती दिली. मोदी सरकारच्या इंडिया सेमीकंडक्टर मिशनने (ISM) या प्रस्तावांना मंजुरी दिल्यास अनेक दशकांच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर शेवटी देशात फॅब्रिकेशन प्लांट तयार करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. देशांतर्गत नोकरीच्या संधींना चालना देण्याबरोबरच चीन आणि अमेरिकेचा दबदबा असलेल्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपली भूमिका मजबूत होऊन त्याचा भारताला फायदा मिळू शकतो. चिप निर्मात्यांना आकर्षित करण्यासाठी भारत त्यांच्या काही प्रमुख मित्र राष्ट्रांशी जसे की, अमेरिका आणि चीन यांच्याशी स्पर्धा करीत आहे. खरं तर मोदी सरकार केंद्रीय स्तरावर चीप प्लाँटसाठी अर्ज करणाऱ्या यशस्वी अर्जदारांना ५० टक्के भांडवली खर्च अनुदान देत आहे. भारतात लवकरच अब्जावधी डॉलर्सचे दोन पूर्ण विकसित सेमीकंडक्टर प्रकल्प उभारले जाणार आहेत. याशिवाय अनेक चिप असेंब्ली आणि पॅकेजिंग युनिट्स तयार करण्यासाठीही गुंतवणूक प्रस्तावित आहे, असंही केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणालेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा