– पावलस मुगुटमल

फेब्रुवारीच्या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात सर्वत्र किमान तापमान सरासरीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर घटलेले होते. त्यामुळे यंदा प्रथमच दीर्घकाळ थंडीचा कडाका अनुभवता आला. परंतु, फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यात तापमानात एकदमच मोठा बदल नोंदविला गेला. दिवसाचे कमाल तापमान सर्वत्र सरासरीच्या पुढे गेले आणि उन्हाचा चटका वाढला. तो मार्चच्या सुरुवातीलाही कायम आहे. या कालावधीत रात्रीच्या किमान तापमानातही वाढ होऊन थंडी झाकोळली गेली. थंडी जाता-जाता उन्हाळा सुरू होण्याचा हा कालावधी असला, तरी दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या पुढे राहात आहे. कमाल आणि किमान तापनामातील अंतर नेहमीपेक्षा अधिक असल्याने हे हवामान सहसा अनुभवाला येत नाही.

temperature drops in vidarbha region
थंडीचा कहर, उपराजधानी गारठली; किमान तापमानात वेगाने घसरण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mumbais maximum temperature rise with Santacruz recording 35 Celsius
मुंबईकर घामाघूम
decrease in Mumbai s minimum temperature maximum temperature
सात वर्षांनी शुक्रवार ठरला जानेवारीमधील सर्वाधिक उष्ण दिवस, सांताक्रूझ येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Vidarbha lowest temperature winter
विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद
north-south winds Temperature increase December winter
गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या डिसेंबरमध्ये तापमानवाढ; उत्तर-दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम
Mumbai felt hotter on Wednesday due to humidity despite
वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकर उकाड्याने त्रस्त
Cold increases the risk of heart disease and respiratory problems Pune news
थंडीमुळे हृदयविकारासह श्वसनविकाराच्या धोक्यात वाढ; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…

हे असे का घडते ?

दिवसा निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाची स्थिती हे त्याचे एक कारण असले, तरी पश्चिमी प्रक्षोभामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह अडवले गेल्याने तापमानात चढ-उतार झाले. अद्यापही राज्याच्या अनेक भागात दिवसाचे कमाल तापमान सरासरीपुढे आहे, तर काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा कमी झाले आहे. रात्रीच्या किमान तापमानाची स्थितीही तशीच आहे.

पश्चिमी प्रक्षोभ म्हणजे काय?

मोसमी पावसाच्या कालावधीत नैर्ऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे देशात पाऊस पडतो. समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे, कमी दाबाचे पट्टे आदींमुळेही पाऊस होतो. पश्चिमी विक्षेप या प्रकारामुळेही प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यांत पाऊस होतो. हिमालयात बर्फवृष्टी होते. या दोन्हींचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही होतो. पश्चिमी प्रक्षोभ म्हणजे उत्तरेकडे समुद्रावरून येणारे वारे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत हे वारे हिमालयीन विभागात हिमवृष्टी घडवून आणतात. पश्चिमी प्रक्षोभ आणि इतर वारे समोरासमोर आल्यास चक्रवाताची स्थिती निर्माण होऊन उत्तरेकडील राज्यात अवकाळी पाऊस पडतो. कधीकधी उत्तरेपासून थेट महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होऊन राज्यातही पाऊस होतो. यंदा पश्चिमी विक्षेपांची मालिकाच सुरू होती. त्यामुळे हिमवृष्टी होऊन उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह आपल्याकडे आले आणि थंडी अवतरली. मात्र, त्याने उलटा परिणामही केला. फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यानंतर उत्तरेकडील वारे अडविले गेले. त्यामुळेच दिवसाचे तापमान वाढले आणि रात्रीचे तापमानही सरासरी पार गेले.

वेगवेगळे तापमान कसे?

सध्या कोकणात बहुतांश भागात रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा काही प्रमाणात कमी आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मात्र ते सरासरीपेक्षा अधिक आहे. दिवसाच्या कमाल तापमानाचीही अशीच स्थिती असून, एकाच विभागात कमाल तापमानातील तफावत मोठी आहे. उदाहरणार्थ : नगरमधील कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी अधिक असताना पुणे, सांगली, साताऱ्यात ते सरासरीच्या खाली आहे. दिवसा आकाश निरभ्र राहिल्यास उन्हाची किरणे थेट जमिनीपर्यंत विनाअडथळा येतात आणि उन्हाचा चटका वाढतो. सध्या दक्षिणेकडून राज्याकडे बाष्पाचा पुरवठा होतो आहे. त्यामुळे राज्यात काही भागांत दिवसा आकाश अंशत: ढगाळ राहात आहे, तर काही भागात ते निरभ्र असते. त्यामुळे कमाल तापमानात तफावत निर्माण झाली आहे. दिवसा आकाश निरभ्र, पण रात्री ढगाळ राहिल्यास रात्रीचे किमान तापमान वाढते. दिवसा जमिनीवर निर्माण झालेली उष्णता ढगांमुळे वातावरणात निघून जाण्यास अडसर निर्माण होतो. त्यामुळे उष्णता जमिनीच्या खालच्या भागात राहून रात्रीचे किमान तापमान वाढते. रात्रीही आकाश निरभ्र राहिल्यास किमान तापमान कमी होते. राज्यात सध्या असेच दुहेरी वातावरण निर्माण झाले आहे.

ही वाटचाल उन्हाळ्याच्या दिशेने आहे का?

राज्याची वाटचाल या महिन्यात हळूहळू उन्हाळ्याच्या दिशेने होत आहे. या कालावधीत काही भागात रात्रीचा हलका गारवा राहण्याची शक्यता आहे. यंदा राज्याच्या काही भागात उन्हाळ्यात सरासरीच्या अधिक तापमान राहण्याचा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागाने दि. १ मार्चला जाहीर केला आहे. त्यानुसार कोकण आणि घाट विभागामध्ये तापमान सरासरीच्या पुढे राहण्याची शक्यता अधिक आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांतही तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. मराठवाड्यातही तुरळक भागांत उन्हाचा चटका अधिक राहील.

हवामानाचा अंदाज काय?

राज्यात सध्या कमाल आणि किमान तापमानात वेगवेगळ्या भागांत तफावत आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पामुळे या आठवड्यात दक्षिणेकडील राज्यांत पावसाळी वातावरण राहणार आहे. काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातही बहुतांश भागांत बाष्प येणार आहे. परिणामी राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यातून राज्यातील दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. रात्रीही ढगाळ वातावरण असल्याने रात्रीच्या किमान तापमानात मात्र वाढ होईल. ढगाळ वातावरण दूर होताच दिवसाच्या तापमानाचा पारा पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे.

pavlas.mugutmal@expressindia.com

Story img Loader