भारताविरोधात दहशतवादी धोरणे आखणारा पाकिस्तानही दहशतवादापासून मुक्त नाही. ‘तेहरिक-ए-तालिबान’ ही संघटना पाकिस्तानची डोकेदुखी बनली आहे. पाकिस्तानात पेशावर येथील शाळेतील दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे झाली. मात्र, पाकिस्तानातील दहशतवाद पूर्ण संपलेला नाही. तो पुन्हा डोके वर काढत आहे. त्याविषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पाकिस्तानातील दहशतवादाची समस्या

भारताविरोधात दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देणारा पाकिस्तान स्वतःच दहशतवादाची शिकार झाला आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने, ९२४ जणांचा १५६६ दहशतवादी हल्ल्यात गेल्या १० महिन्यांत मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या काळात ३४१ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. २०१३ मध्ये मृतांचा आकडा २,४५१ इतका होता. १७१७ दहशतवादी हल्ले २०१३मध्ये झाले होते. दहशतवादी घटनांमध्ये २०२० मध्ये घट झाली होती. १४६ दहशतवादी हल्ल्यांमध्ये २२० जणांचा मृत्यू झाला होता. २०२१ पासून पाकिस्तानमधील दहशतवादी घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांच्या वाढीमागे विविध कारणे सांगितली जातात.

आणखी वाचा-विश्लेषण : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे आठ पदरीकरण कधी? फायदा काय? विलंब का?

पाकिस्तानमधील अस्थिरता

पाकिस्तानमध्ये राजकीय, आर्थिक पातळीवर अस्थिरता आहे. या वर्षी सुरुवातीला झालेल्या निवडणुकीनंतर शाहबाज शरीफ यांचे सरकार आले असले, तरी निवडणुकांमध्ये गडबड झाल्याची चर्चा आहे. सध्या तुरुंगात असलेले इम्रान खान यांचा पाठिंबा असलेल्या अपक्षांनीही चांगली कामगिरी केली आहे. काही ठिकाणी विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षाही अधिक मते बाद ठरविली गेली आहेत. या साऱ्यांतून इम्रान खान यांच्या समर्थकांनी पाकिस्तानात आंदोलन छेडले आहे. आर्थिक आघाडीवरही पाकिस्तानची स्थिती दयनीय आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला सात अब्ज अमेरिकी डॉलरचे कर्ज मंजूर केले असले, तरी ती तात्पुरती मलमपट्टी ठरू शकते. पाकिस्तानात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राजकीय-आर्थिक आणि सामाजिक स्तरावरील अस्थिरता दहशतवाद्यांच्या फायद्याची ठरते.

दहशतवादामागील कारणे

पाकिस्तानमधील दहशतवादामागे आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेच्या कारणांबरोबरच अफगाणिस्तानमध्ये नव्याने आलेल्या तालिबानी सरकारची पार्श्वभूमी आहे. तालिबानला पाकिस्तानने पाठिंबा दिला असला, तरी पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार तेथील ‘तेहरिक-ए-तालिबान’ संघटनेला फूस देत असल्याचा आरोप आहे. हा आरोप अर्थातच तालिबानने फेटाळून लावला. याखेरीज दुसरा शेजारी इराणशीही पाकिस्तानचे संबंध फारसे चांगले नाहीत. शेजारी देश असलेल्या भारताबद्दलचा पाकिस्तानचा द्वेष तर विख्यात आहे. अशा स्थितीत केवळ चीनच्या कुबड्यांचा आधार पाकिस्तानला आहे. याखेरीज पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांत आणि बलुचिस्तानात अस्थिरता आहे. यातील खैबर प्रांत सध्या तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांचे जन्मस्थान असलेला आहे. ही राजकीय किनारही या अस्थिरतेमागे आहे.

आणखी वाचा-दोन लाखांहून अधिक जणांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ विध्वंसाने त्सुनामीचा पूर्वइशारा देणारी प्रणाली कशी बदलली?

दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी

दहशतवादाने ग्रासलेल्या पाकिस्तानने दोनच दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये घुसून हवाई हल्ला केला. १५ जण मृत्युमुखी पडले. सात गावांना पाकिस्तानने लक्ष्य केले. पाकिस्तानने अद्याप जाहीरपणे असे हल्ले केल्याचे सांगितलेले नाही. तालिबानने मात्र हल्ल्यांना प्रत्युत्तराचा इशारा दिला आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात इराणने पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान प्रांतात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. पाकिस्ताननेही इराणवर प्रत्युत्तरादाखल हवाई हल्ले केले. याखेरीज २०२० पासून भारताने पाकिस्तानमधील २० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे वृत्त लोकसभा निवडणुकीपूर्वी ब्रिटनमधील एका प्रख्यात इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताला कॅनडा आणि अमेरिकेतील खलिस्तान्यांच्या हत्येचा, हत्येच्या प्रयत्नांच्या आरोपाची पार्श्वभूमी होती.

दहशतवाद संपणार का?

पाकिस्तानमध्ये अस्थिरता आहे, तोपर्यंत दहशतवाद पूर्णपणे संपुष्टात येणे कठीण आहे. तसेच, दहशतवाद्यांमध्ये विभागणी करून भारताविरोधातील दहशतवादाला खतपाणी आणि अफगाणिस्तानमधून पाकिस्तानला भेडसावणाऱ्या दहशशतवादाविरोधात कारवाई असा दुटप्पीपणा पाकिस्तान करीत आहे, तोपर्यंत या समस्येवर पूर्ण उपाय नाही. दुसऱ्यावर उगारलेले दहशतवादाचे अस्त्र पाकिस्तानवरच उलटले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही दहशतवादाची समस्या हाताळताना दुटप्पीपणा केला जातो. अशा दुटप्पीपणावर भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अनेकदा बोट ठेवले आहे. दहशतवादावर दुटप्पीपणा न करता दहशतवादाला फेकून दिले पाहिजे, अशी भूमिका भारताने मांडली आहे. दहशतवादाची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक सामायिक व्याख्याही आजतागायत तयार नाही, यातच या समस्येची गुंतागुंत दडलेली आहे.

आणखी वाचा-Indian Ocean Tsunami: २००४ च्या त्सुनामीची भीषणता २० वर्षांनी काय शिकवून गेली?

भारतासाठी पुढे काय?

अस्थिर पाकिस्तानचा धोका भारताला कायमच आहे. दहशतवादाशी थारा नसलेल्या पाकिस्तानशी संबंध ठेवण्यात कुठलीही आडकाठी नसल्याची भूमिका भारताने मांडली आहे. दहशतवादाला खतपाणी घालण्याचे धोरण पाकिस्तान सोडत नाही, तोपर्यंत पाकिस्तानचीच अधिकाधिक कोंडी होणार आहे. दहशतवाद्यांना टिपण्यासाठी सीमेचे बंधन भारताने यापूर्वीच मुक्त केले आहे. त्यामुळे दहशतवादाची वाकडी चाल खेळणाऱ्या पाकिस्तानला या समस्येवर खऱ्या अर्थाने उपाय योजावे लागतील. दहशतवादाला संपविण्यातच साऱ्यांचे हित आहे, याची जाणीव पाकिस्तानला होणे गरजेचे आहे.

prasad.kulkarni@expressindia.com