खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला. ट्रुडो यांच्या या दाव्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील राजकीय संबंध ताणले आहेत. ट्रुडो यांचा आरोप भारताने फेटाळला आहे. या दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची स्वत:च्या देशातून हकालपट्टी केली आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, भारत आणि कॅनडा यांच्यातील ताणलेल्या संबंधामुळे भारतात मसूर डाळीचे भाव वाढू शकतात. याचे नेमके कारण काय आहे? हे जाणून घेऊ या…

कॅनडा सर्वांत मोठा पुरवठादार

कॅनडा आणि भारत यांच्यातील सद्यस्थिती आणि घडामोडींवर डाळ मिलर आणि ट्रेडर्स लक्ष ठेवून आहेत. कारण या दोन्ही देशांच्या संबंधानुसार देशात मसूर डाळ महागणार की नाही? हे ठरणार आहे. कॅनडा भारतासाठी मसूर डाळ पुरवणारा सर्वांत मोठा देश आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही आयात वर्षाला ४ ते ५ लाख टन एवढी आहे. कॅनडाकडून मसूर डाळीची आयात थांबल्यास भारत ऑस्ट्रेलियाकडून ही डाळ आयात करू शकतो. मात्र यामुळे पुरवठा साखळी बिघडल्यामुळे मसूर डाळीची किंमत वाढू शकते.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathwada vidarbh farmers
विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
farmers anger continues in 70 constituencies over soybean msp
७० मतदारसंघांत सोयाबीन ‘रोष’
wpi inflation hits 4 month high in october on rising food prices
भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
In Vashis APMC market vegetable prices dropped due to increased arrivals
आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण

मसूर डाळ तुलनेने स्वस्त

चना डाळीनंतर मसूर ही डाळ सर्वाधिक स्वस्त आहे. सध्या देशाच्या वेगवेगळ्या भागांत मसूर डाळ ९१ ते ९५ रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. चना डाळीचा दर ७५ ते ८० रुपये प्रतिकिलो आहे. मूग आणि तूर डाळीचा दर तुलनेने अधिक आहे. मूगडाळ ११० रुपये प्रतिकिलो तर तूरडाळ १५० रुपये प्रतिकिलो आहे. मसूर डाळीच्या एकूण देशांतर्गत उत्पादनापैकी साधारण ७० टक्के उत्पादन हे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांत घेतले जाते. भारताला दरवर्षी साधारण १८ ते २० लाख टन मसूर डाळ लागते.

मसूर डाळीचा खप का वाढला?

या वर्षी भारताने साधारण ११ लाख टन मसूर डाळ आयात केली आहे. सध्या मसूर डाळीचा खप चांगलाच वाढला आहे. याबाबत इंदूर येथील मयूर कॉर्पोरेशन या डाळ मिलर आणि ट्रेडर कंपनीचे अध्यक्ष हर्षा राय यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार सध्या तूर डाळीचा भाव चांगलाच वाढला आहे. त्यामुळे लोक तूर डाळीऐवजी मसूर डाळ खरेदी करत आहेत. सध्या मसूर डाळीचाही खप वाढला आहे. त्यामुळे भविष्यात या डाळीचाही दर वाढण्याची शक्यता आहे, असे राय यांनी सांगितले.

४.८५ लाख टन मसूर डाळ केली आयात

ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा हे दोन देश भारतासाठी सर्वांत मोठा मसूर डाळ पुरवठादार आहेत. २०२२-२३ या आर्थिक वषात भारताने ऑस्ट्रेलियाकडून ३.५ लाख टन तर कॅनडा या देशाकडून ४.८५ लाख टन मसूर डाळ आयात केली. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताने ऑस्ट्रेलियाकडून २.६७ लाख टन तर कॅनडाकडून १.९० लाख टन मसूर डाळ आयात केली आहे.

एका महिन्यात मसूर डाळ १०० डॉलर्सने महागली

सध्या मात्र कॅनडा देशात मसूर डाळीचे उत्पादन कमी होणार आहे. चालू हंगामात कॅनडा देशात मसूर डाळीचे उत्पादन साधारण १५.४ लाख टन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी हाच आकडा २३ लाख टन होता. मसूर डाळीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्यामुळे आगामी काळात ही डाळ महागण्याची शक्यता आहे. सध्या मसूर डाळीचा दर ७६० ते ७७० डॉलर्स प्रतिटन झाला आहे. गेल्या एका महिन्यात हा दर १०० डॉलर्सने महागला आहे. याचा फटका भारतालाही बसू शकतो. सध्या भारत आणि कॅनडा देशातील संबंध ताणलेले आहेत. अशा स्थितीत मसूर डाळीच्या पुरवठ्यावर परिणाम पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भविष्यात भारतात मसूर डाळ महागण्याची शक्यता आहे.

कॅनडा-भारतात वाद कशामुळे?

काही दिवसांपूर्वी कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानचे समर्थन करणाऱ्या हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येविषयी भाष्य केले होते. त्याला कॅनडात या वर्षाच्या जून महिन्यात गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. भारताने त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलेले आहे. त्याच्या हत्येमागे भारताचा हात आहे, असा दावा ट्रुडो यांनी केला आहे. भारताने मात्र हा दावा फेटाळला आहे.

भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देणे तात्पुरते थांबवले

याच मुद्द्यावरून सध्या भारत आणि कॅनडा यांच्यात तणावाची स्थिती आहे. भारताने आरोप फेटाळल्यानंतर कॅनडाने भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्याला कॅनडा देश सोडण्याचा आदेश दिला. त्यानंतर भारतानेदेखील कॅनडाच्या समकक्ष अधिकाऱ्याला भारत देश सोडून जाण्यास सांगितले. सध्या भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याला तात्पुरती स्थगिती दिली आहे. तसेच कॅनडात वास्तव्यास असणाऱ्या भारतीय नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे सांगितले आहे.

भारत ऑस्ट्रेलियाकडून मसूर डाळ आयात करू शकतो, पण…

दरम्यान, या दोन्ही देशांत हीच परिस्थिती कायम राहिल्यास मसूर डाळीच्या पुरवठ्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मात्र कॅनडा या देशाची जागा ऑस्ट्रेलिया हा देश घेऊ शकतो. म्हणजेच कॅनडाकडून मिळणारी मसूर डाळ भारत ऑस्ट्रेलिया देशातून आयात करू शकतो. भारताकडे तसा पर्याय उपलब्ध आहे. मात्र मसूर डाळीच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी भारतासाठी योग्य नाही. कॅनडा हा मसूर डाळ पुरवणारा सर्वांत मोठा निर्यातदार आहे. त्यामुळे या बाजारपेठेवर कोणताही नकारात्मक परिणाम न पडू देणे, हे कॅनडाच्या हिताचे आहे. मात्र सध्यातरी घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवणे हाच पर्याय आहे.